माघार घेऊ नका!
१. कशाप्रकारे आपण बरे करण्यास “माघार” घेत नाही?
१ देवाच्या राज्य सुवार्तेच्या प्रचार कार्यात सक्रियपणे भाग घेऊन आपण, आपल्याला नेमण्यात आलेल्या क्षेत्रातील लोकांचे बरे करण्यास “माघार” घेत नाही. (नीति. ३:२७) देवाच्या राज्य शासनात आपण उपभोगणार असलेल्या सुकाळाच्या बातमीपेक्षा आणखी दुसरी कोणतीही बातमी आनंदविणारी नाही. तुम्ही अनौपचारिक साक्ष देऊन किंवा प्रकाशने देऊन अगदी उदारपणे राज्याच्या आशेविषयी सांगत असाल; तरीपण, तुमच्याजवळ एखादा बायबल अभ्यास नसेल तर एक बायबल अभ्यास मिळवण्याचे ध्येय ठेवायला काय हरकत आहे?
२. कोणत्या एका अडखळणामुळे आपण बायबल अभ्यास संचलित करण्यापासून माघार घेऊ शकतो?
२ कधीकधी बायबल अभ्यास संचलित न करण्याचे एक सर्वात मोठे अडखळण, आपल्या स्वतःच्या मनात येणारे विचार, हे असू शकतात. काही जण आत्मविश्वास नसल्यामुळे किंवा मग त्यांच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बायबल अभ्यास संचलित करण्यापासून माघार घेतात. बायबल अभ्यासाच्या कार्यात भाग घेण्यास आपण माघार घेऊ नये म्हणून खाली काही गोष्टी सुचवल्या आहेत ज्यांचे अवलंबन केल्यास तुम्हाला फायदा होईल.—मत्त. २८:१९; प्रे. कृत्ये २०:२०.
३. आपण बायबल शिकवण्यास पात्र का आहोत?
३ आत्मविश्वासाची कमी: कदाचित तुमचे शिक्षण कमी झाले असेल किंवा मग बायबल अभ्यास संचलित करण्यास आपल्याला जमणार नाही अशा भावना तुमच्या मनात वेगळ्या कारणासाठी येत असतील. पहिल्या शतकातील प्रभावी ख्रिस्ती सेवक “निरक्षर व अज्ञानी” होते. ते इतरांना सत्य कसे काय शिकवू शकले? ते “येशूच्या सहवासात” असायचे. (प्रे. कृत्ये ४:१३) महान शिक्षक येशू याच्याकडून ते अनेक गोष्टी शिकले. येशूच्या शिकवणी व शिकवण्याच्या पद्धती आपल्यासाठी शास्त्रवचनांत जपून ठेवण्यात आल्या आहेत. तुमचे कमी शिक्षण झालेले असले तरी, तुम्हाला मिळत असलेले आध्यात्मिक शिक्षण अतुल्य आहे.—यश. ५०:४; २ करिंथ. ३:५.
४. आमोसच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?
४ यहोवाने चुका करणाऱ्या शासकांची किंवा मोठ्या हुद्दयावर असलेल्यांची कानउघाडणी करण्यासाठी कधीकधी संदेष्ट्यांचा उपयोग केला. यांपैकी एक संदेष्टा होता आमोस, जो गरीब होता. स्वतः आमोसच याची कबूली देतो: “मी संदेष्टा नाही किंवा संदेष्ट्याचा पुत्र नाही; तर मी गुराखी, उंबराच्या झाडांची निगा करणारा आहे.” (आमो. ७:१४) तरीपण, वासराची उपासना करणाऱ्या अमस्या याजकाला यहोवाच्या न्यायदंडाची घोषणा करण्यास आमोसने माघार घेतली नाही. (आमो. ७:१६, १७) आपण देवाचे कार्य करीत आहोत व त्याने दिलेले काम पूर्ण करण्याची पात्रता तो आपल्याला नक्की देईल, ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे.—२ तीम. ३:१७.
५. आपली धावपळीची जीवनशैली असली तरीसुद्धा आपण निदान एक तरी बायबल अभ्यास संचलित करण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?
५ धावपळीची जीवनशैली: तुमची धावपळीची जीवनशैली असली तरी, सेवेत नियमितरीत्या भाग घेण्यासाठी तुम्ही निश्चितच वेळ काढत असाल. बायबल अभ्यास संचलित करणे हा, सेवेतील सर्वात आनंदविणारा पैलू बनू शकतो. यहोवाचे वचन एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कसे कार्य करते, हे पाहणे एक सुहक्कच आहे. (इब्री ४:१२) आपण जेव्हा एखाद्याला, ‘सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचण्यास’ मदत करण्याकरता आत्मत्याग करतो तेव्हा यहोवाला हे पाहून खूप आनंद होतो. (१ तीम. २:४) एक व्यक्ती पूर्वीचे चुकीचे आचरण थांबवून आध्यात्मिक प्रगती करते तेव्हा देवदूतांना देखील आनंद होतो.—लूक १५:१०.
६. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणता मोठा विशेषाधिकार मिळाला आहे?
६ “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे,” अशी देवाची इच्छा आहे. (१ तीम. २:४) देवाच्या इच्छेच्या सामंजस्यात कार्य करण्याचा किती मोठा विशेषाधिकार आपल्याला मिळाला आहे. तेव्हा आपण बायबल अभ्यास संचलित करण्यास माघार घेऊ नये.