प्रश्न पेटी
▪ आपण लोकांना देत असलेल्या प्रकाशनांसोबत आपला स्वतःचा ई-मेल ॲडरेस जोडणे उचित आहे का?
काही प्रचारक जेव्हा इतरांना मासिके अथवा पत्रिका देतात तेव्हा ते त्यावर आपला स्वतःचा ई-मेल ॲडरेसचा स्टॅम्प लावतात अथवा त्याचे लेबल चिकटवतात. अशारीतीने जे लोक ही प्रकाशने स्वीकारतात त्यांना जर अधिक माहिती हवी असेल तर ते प्रचारकाशी संपर्क साधू शकतात. या प्रयत्नांमागे, आस्थेवाईक लोकांना मदत करणे हा सदहेतू असतो. परंतु, आपले अधिकृत वेबसाईट मासिकांच्या व पत्रिकांच्या मागच्या पानावर छापलेले असतेच. तेव्हा, आपण देत असलेल्या प्रकाशनांवर स्वतःचा ई-मेल ॲडरेस न देणेच उत्तम.
एखादा प्रचारक क्षेत्रात खासकरून पुनर्भेटींच्या वेळी त्याला भेटणाऱ्या लोकांना एका वेगळ्या कागदावर स्वतःचा पत्ता देत असेल तर तो त्याचा व्यक्तिगत निर्णय आहे. जे लोक आस्था दाखवतात ते अधिक माहितीसाठी आपल्याला संपर्क साधेपर्यंत आपण थांबून राहण्यापेक्षा आपण पुढाकार घेऊन त्यांना जाऊन भेटले पाहिजे. लोकांबरोबर प्रत्यक्ष बोलताना आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल, की समोरच्या व्यक्तीला आपण सांगत असलेल्या संदेशात खरोखरच किती आस्था आहे.