संदेष्ट्यांचे अनुकरण करा—आमोस
१. आमोसचे उदाहरण आपल्याकरता प्रोत्साहन देणारे का आहे?
१ आपले शिक्षण कमी झाले आहे किंवा आपण गरीब घराण्यातील आहोत म्हणून प्रचार कार्य करण्याच्या योग्यतेचे नाही असे तुम्हाला कधी वाटले आहे का? असे वाटत असल्यास तुम्हाला आमोसच्या उदाहरणावरून धैर्य मिळेल. तो एक मेंढपाळ आणि हंगामी मजूर होता, पण तरीही यहोवाने त्याला एक महत्त्वपूर्ण संदेश सांगण्याची शक्ती दिली. (आमो. १:१; ७:१४, १५) त्याचप्रमाणे आज यहोवा दीन आणि नम्र लोकांचा उपयोग करून घेतो. (१ करिंथ. १:२७-२९) आपण आपल्या प्रचार कार्यासंबंधी संदेष्टा आमोसकडून आणखी कोणत्या गोष्टी शिकू शकतो?
२. प्रचार कार्यात विरोध होत असताना आपण ठाम का राहिले पाहिजे?
२ विरोध होत असतानाही ठाम राहा: इस्राएलच्या उत्तरेकडील दहा गोत्रांच्या राज्याचा याजक अमस्या वासरांचा उपासक होता. तो जेव्हा आमोसचा संदेश ऐकतो तेव्हा जणू त्याला म्हणतो: ‘तू तुझ्या घरी जा! आम्हाला काही सांगू नकोस! आम्हाला आमचा धर्म आहे.’ (आमो. ७:१२, १३) आमोस संदेष्ट्याचे काम बंद पाडण्याची विनंती राजा यरोबामला करताना अमस्या आमोसच्या संदेशाची चुकीची माहिती त्याला देतो. (आमो. ७:७-११) पण आमोस अजिबात घाबरत नाही. आज, काही पाळक यहोवाच्या साक्षीदारांचा छळ करण्यासाठी राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळवतात. पण यहोवा आपल्याला आश्वासन देतो की आपल्यावर चालवण्याकरता घडवलेले कोणतेही हत्यार आपल्यावर चालणार नाही.—यश. ५४:१७.
३. आपल्या संदेशाचे दोन पैलू कोणते आहेत?
३ देवाच्या न्यायाबद्दल आणि भविष्यातील आशीर्वादांबद्दल घोषणा करा: आमोस या त्याच्या नावावर असलेल्या बायबलमधील पुस्तकात त्याने इस्राएलच्या उत्तरेकडील दहा गोत्रांवर येणाऱ्या न्यायदंडाची भविष्यवाणी केली असली तरी पुस्तकाच्या शेवटी तो पुर्नस्थापनेविषयी यहोवाने दिलेल्या अभिवचनाबद्दल आणि अमाप आशीर्वादांबद्दल सांगतो. (आमो. ९:१३-१५) आपणही देवाच्या येणाऱ्या न्यायनिवाड्याच्या दिवसाबद्दल बोलतो, पण हे आपण घोषित करत असलेल्या राज्याच्या सुवार्तेचा केवळ एक भाग आहे. (२ पेत्र ३:७; मत्त. २४:१४) यहोवा हर्मगिदोनाद्वारे दुष्टाईचा अंत करेल तेव्हाच पृथ्वीला नंदनवन बनण्याचा मार्ग मोकळा होईल.—स्तो. ३७:३४.
४. आपण यहोवाची इच्छा पूर्ण करू शकतो याची खातरी का बाळगू शकतो?
४ अनेक विरोधी असणाऱ्या या जगात सुवार्तेचा प्रचार करताना यहोवाला आपण केलेल्या समर्पणानुसार जगताना व त्याची इच्छा पूर्ण करताना आपल्याला अनेक परीक्षांना तोंड द्यावे लागते. (योहा. १५:१९) पण, यहोवाने जसे आमोसला मदत केली तसेच तो आपल्यालाही त्याची इच्छा पूर्ण करण्याच्या योग्यतेचे बनण्याकरता ज्याची गरज आहे ते पुरवेल याची खातरी आपण बाळगू शकतो.—२ करिंथ. ३:५.