वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०७ पृ. १
  • शाखा दफ्तराचे पत्र

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शाखा दफ्तराचे पत्र
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • शाखा कार्यालयात कोणते काम केले जाते?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
  • शाखा दफ्तराचे पत्र
    आमची राज्य सेवा—२००५
  • आमच्या पायनियरांविषयी रसिकता दाखविणे
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km ९/०७ पृ. १

शाखा दफ्तराचे पत्र

प्रिय राज्य प्रचारकांनो:

भारतातील शाखा दप्तराच्या क्षेत्रामध्ये २००७ सेवा वर्षादरम्यान राज्याच्या कार्यात झालेली प्रगती अतिशय आनंददायक आहे! मार्च महिन्यात आपण सामान्य पायनियरांच्या संख्येत १,६२८ असा विक्रमी उच्चांक गाठला व एप्रिल महिन्यात सहायक पायनियरांची संख्या ४,२१२ होती. पायनियरांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रचार कार्यावर अतिशय चांगला प्रभाव पडत आहे. मार्च महिन्यात अहवाल दिलेल्या २७,१५३ प्रचारकांनी २५,३९० बायबल अभ्यास चालवले. काही क्षेत्रांत आपल्या बांधवांना विरोधाला तोंड द्यावे लागत असूनही ते राज्य प्रचाराचे कार्य नेटाने करत आहेत.

“धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्‍या वाईट गोष्टींचा कधी अंत होईल का?” या राज्य वार्ता क्र. ३७ हस्तपत्रिकेच्या जवळजवळ ९.५ लाख प्रती भारत शाखेच्या सबंध क्षेत्रात वितरीत करण्यात आल्या. आस्थेवाईक व्यक्‍तींनी राज्य वार्ता या पत्रिकेच्या मागील कूपन पाठवून जागृत राहा! हे माहितीपत्रक पाठवण्याची व बायबल अभ्यासांची विनंती केली. स्मारकविधीच्या निमंत्रण पत्रिका वितरित करण्याची मोहीमही अतिशय यशस्वी ठरली. या वर्षी स्मारकविधीची उपस्थिती ७३,१९३ होती.

या मोहिमांच्या माध्यमाने आपण प्रामाणिक अंतःकरणाच्या व्यक्‍तींना बायबल खरोखर काय शिकवते हे समजून घेण्यास मदत करू इच्छितो. (मत्त. २८:१९, २०) तुमच्या प्रचार कार्यात, जे कोणी थोडीही आस्था दाखवतात त्यांचे नाव व पत्ता घ्या आणि बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने त्यांची पुन्हा भेट घ्या. या महत्त्वाच्या कार्यात तुमच्या खांद्याला खांदा लावून कार्य करण्यास आम्हाला आनंद वाटतो. ख्रिस्ती प्रीती व सदिच्छा.

तुमचे बंधू,

भारत शाखा दप्तर

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा