मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज जाने. १
“पृथ्वीवरून अन्याय नाहीसा होऊन न्याय प्रस्थापित होईल असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घेतल्यावर लूक १८:७ वाचा. मग पृष्ठ १७ वरील लेख उघडून दाखवा.] देव स्वतः कशाप्रकारे न्याय प्रस्थापित करणार आहे याविषयी या लेखात खुलासा केला आहे.”
सावध राहा! जाने.-मार्च
“काही जणांना वाटते की जगात जे काही घडते त्याकरता देवच जबाबदार आहे. एखादी दुर्घटना घडते तेव्हा ते म्हणतात की नक्कीच देवाने काहीतरी चांगल्या कारणासाठीच असे घडू दिले असावे. तुम्हाला काय वाटते? [उत्तर ऐकून घ्या. मग याकोब १:१३ वाचा.] दुःखाचे मूळ कारण आणि त्याचा अंत करण्याकरता देव सध्या काय करत आहे याविषयी बायबलमध्ये जे सांगितले आहे त्याबद्दल या मासिकात तुम्हाला वाचायला मिळेल.”
टेहळणी बुरूज फेब्रु. १
“पुढील शब्दांचे पालन सर्वांनी केले तर समाजात जगणे काहीसे सुसह्य होईल असे तुम्हाला वाटते का? [इफिसकर ४:२५ वाचा आणि उत्तर ऐकून घ्या.] बऱ्याच लोकांना वाटते की विशिष्ट परिस्थितीत खोटे बोलणे चुकीचे नाही. या मासिकात, नेहमी खरे बोलल्यामुळे कोणते चांगले परिणाम घडतात याविषयी सांगितले आहे.”
सावध राहा! जाने.-मार्च
“सध्याच्या जगात सर्वत्र अनैतिकता पसरली आहे. काहीजण म्हणतात की, दोन व्यक्तींचे एकमेकांवर प्रेम असल्यास त्यांच्यामधील लैंगिक संबंध चुकीचे नाहीत. तुम्हाला याविषयी काय वाटते? [उत्तर ऐकून घ्या आणि मग १ करिंथकर ६:१८ वाचा. मग पृष्ठ १८ वरील लेख उघडून दाखवा.] या लेखात विवाहपूर्व लैंगिक संबंधांविषयी शास्त्रवचनीय दृष्टिकोन मांडला आहे.”