वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०३ पृ. ४
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km १/०३ पृ. ४

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! जाने.-मार्च

“बायबल भविष्यवाणी सूचित करते, की असा एक काळ येणार आहे जेव्हा “मी रोगी आहे” असे कोणीही म्हणणार नाही. [यशया ३३:२४ वाचा.] असा काळ आल्यास आपल्याला किती आनंद होईल, नाही का? [उत्तर ऐका.] पण, आज मानवजातीला अनेक रोगांनी पछाडले आहे, यात एड्‌सच्या साथीचाही समावेश होतो. सावध राहा! याच्या या अंकात, एड्‌सचे लोण कधी आटोक्यात येईल का? या प्रश्‍नाचे उत्तर देण्यात आले आहे.”

टेहळणी बुरूज जाने.१५

“आतापर्यंत झालेल्या रक्‍तपातावरून तुम्हाला असे वाटते का, की वाईटाने चांगल्यावर विजय मिळवला आहे? [उत्तर ऐका.] बायबल देवाविषयी काय म्हणते ते पाहा. [स्तोत्र ८३:१८ब वाचा.] देव सर्व पृथ्वीवर परात्पर आहे, मग वाईटाचा कधी विजय होईल का? [उत्तरासाठी थांबा.] या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर टेहळणी बुरूज याच्या या अंकात दिले आहे.”

सावध राहा! जाने.-मार्च

“आजकाल पुष्कळ तरुणांना मोबाईल फोनचे वेड लागले आहे. तुम्हाला काय वाटते, हे त्यांच्यासाठी चांगले आहे? [उत्तर ऐका.] बायबलमधील या वचनांतील सुज्ञतेकडे लक्ष द्या. [इफिसकर ५:१५, १६ वाचा.] सेल फोनचे बरेच फायदे असले तरीसुद्धा बहुतेक वेळा त्यामुळे आपला बहुमोल वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. मोबाईल फोनच्या वापराविषयी संतुलित दृष्टिकोन बाळगण्यास सावध राहा! याच्या या अंकात मदत पुरवली आहे.”

टेहळणी बुरूज फेब्रु.१

“आज पुष्कळ लोकांना बेकारीची चिंता लागली आहे आणि इतरजण कामाच्या ओझ्याखाली दबून गेले आहेत. कामाच्या ठिकाणी आनंदी व सुरक्षित राहणे शक्य आहे, असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐका. मग, यशया ६५:२१-२३ वाचा.] टेहळणी बुरूज याच्या या अंकात एका काळाविषयी सांगितले आहे जेव्हा सर्वांजवळ प्रतिफळदायी काम असेल.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा