दारात उभे राहून व टेलिफोनवर बायबल अभ्यास सुरू करणे
१, २. कामात असलेल्या लोकांना मदत करण्याकरता आपण आपल्या बायबल अभ्यास कार्यक्रमात थोडा फेरबदल कसा करू शकतो?
१. आज लोकांना वेळ नाही. तरीपण पुष्कळ लोकांना आध्यात्मिक गोष्टींत आवड आहे. अशा लोकांची आध्यात्मिक भूक आपण कशाप्रकारे शमवू शकतो? (मत्त. ५:३) पुष्कळ प्रचारक, दारात उभे राहून किंवा टेलिफोनवरही बायबल अभ्यास सुरू करू शकले आहेत. तुम्ही देखील अशाचप्रकारे तुमची सेवा वाढवू शकता का?
२ बायबल अभ्यास सुरू करण्याकरता, आपण संधी मिळेल तेव्हा बायबल अभ्यास सादर करण्यास तयार असले पाहिजे. हे आपण कसे आणि कोठे करू शकतो?
३. पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास कसा करायचा याचे प्रदर्शन का करून दाखवावे, व हे कसे करता येईल?
३. दारात: बायबलविषयी बोलण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीला तुम्ही भेटता तेव्हा, तुम्ही आगाऊ ज्याची तयारी केली आहे असा एखादा परिच्छेद काढा जसे की अपेक्षा माहितीपत्रकातील पहिल्या पाठाचा पहिला परिच्छेद आणि अभ्यास सुरू करा. परिच्छेद वाचा, प्रश्न विचारा आणि एक किंवा दोन शास्त्रवचनांवर चर्चा करा. हे सर्व तुम्ही अवघ्या पाच ते दहा मिनिटांत अगदी दारात उभे राहूनही करू शकता. घरमालकाला ही चर्चा आवडली असेल तर पुढील परिच्छेदांची दुसऱ्या एखाद्या वेळेला चर्चा करण्यासाठी वेळ ठरवा. पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास सुरू करण्याविषयी असलेल्या सूचना आमची राज्य सेवा याच्या जानेवारी २००२ अंकाच्या पृष्ठ ६ वर पाहायला मिळतील.
४. पुनर्भेटी करताना आपण दारात उभे राहूनही बायबल अभ्यास कसा सुरू करू शकतो?
४. पुनर्भेटी करतानासुद्धा बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी अशाच पद्धतीचा तुम्ही उपयोग करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही अपेक्षा माहितीपत्रक देऊ शकता आणि त्यातील दुसऱ्या पाठातील १ आणि २ परिच्छेदांतून देवाच्या नावाविषयी चर्चा करू शकता. पुढील भेटीत तुम्ही ३ आणि ४ परिच्छेदांचा उपयोग करून यहोवाच्या गुणांविषयी बायबल काय सांगते त्याची चर्चा करू शकता. पुढच्या चर्चेत तुम्ही ५ आणि ६ परिच्छेदांची चर्चा करू शकता आणि पृष्ठ ५ वरील चित्राचा उपयोग करून, बायबलचा अभ्यास यहोवाविषयी अधिक जाणून घ्यायला कसा मदत करू शकतो, यावर जोर देऊ शकता. हे सर्व अगदी दारात उभे राहूनही होऊ शकते.
५, ६. (क) काही लोक फोनवरून बायबलचा अभ्यास करण्यास का तयार होतील? (ख) फोनवरून अभ्यास सुरू करण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीचा उपयोग करू शकतो?
५. टेलिफोनद्वारे: काही लोक, अमोरा-समोर भेटण्याऐवजी टेलिफोनवरून बोलणे पसंत करतात. पुढील अनुभव पाहा: घरोघरचे कार्य करत असताना, एक भगिनी एका तरुण स्त्रीला भेटली जी एक आई आहे आणि तिच्या करिअरमुळे तिला वेळच मिळत नाही. ही भगिनी तिला पुन्हा घरी भेटू शकली नाही तेव्हा तिने तिला फोन करायचे ठरवले. या तरुण स्त्रीने भगिनीला सांगितले, की बायबलवर चर्चा करण्यासाठी तिच्याकडे खरोखरच वेळ नव्हता. भगिनी तिला म्हणाली: “१०-१५ मिनिटांत तुम्ही काही तरी नवीन शिकू शकता, आणि तेही फोनवरूनच!” “तसं आहे तर मग ठीक आहे,” असे त्या स्त्रीने उत्तर दिले. लगेच फोनवरूनच नियमित बायबल अभ्यासाला सुरुवात झाली.
६ तुम्ही ज्यांना भेटता ते फोनवरून अभ्यास करायला तयार असतील का? आताच वर्णन केलेल्या पद्धतीचा तुम्ही उपयोग करू शकता किंवा मग असे म्हणू शकता: “वाटल्यास, आपण फोनवरून बायबलची चर्चा करू शकतो. चालेल का?” इतरांच्या परिस्थितीनुसार आपण आपला बायबल अभ्यास कार्यक्रम सुरू ठेवून त्यांना “देवाविषयीचे ज्ञान” प्राप्त करण्यास मदत करू शकतो.—नीति. २:५; १ करिंथ. ९:२३.