वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०५ पृ. १
  • शाखा दफ्तराचे पत्र

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शाखा दफ्तराचे पत्र
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • शाखा दफ्तराचे पत्र
    आमची राज्य सेवा—२००७
  • शाखा कार्यालयात कोणते काम केले जाते?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
  • शाखा दफ्तराचे पत्र
    आमची राज्य सेवा—२००६
  • प्रिय राज्य प्रचारकांनो:
    आमची राज्य सेवा—२००३
आमची राज्य सेवा—२००५
km ९/०५ पृ. १

शाखा दफ्तराचे पत्र

प्रिय राज्य प्रचारकांनो:

मागील दोन-तीन वर्षांत बऱ्‍याच मंडळ्यांना व विभागांना एकमेकांशी जोडण्यात आल्यामुळे त्यांचे दृढीकरण झाले आहे. मागच्या सेवा वर्षातच १४ मंडळ्या बंद करून त्यांना आसपासच्या मंडळ्यांत विलीन करण्यात आले. मागच्या दोन सेवा वर्षांचा हिशेब लावल्यास एकूण ३६ मंडळ्यांत असा फेरबदल करण्यात आला. अधिकाधिक बांधव सेवा विशेषाधिकार मिळवण्यास पात्र होण्याकरता प्रयत्न करत आहेत. यामुळे आता प्रत्येक मंडळीत सरासरी तीन वडील व चार सेवा सेवक आहेत.

मंडळ्यांत बांधवांची संख्या वाढल्यामुळे साहजिकच चांगल्या राज्य सभागृहांची गरज उत्पन्‍न झाली आहे. आम्हाला हे कळवण्यास आनंद वाटतो की मागच्या सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत शाखा दफ्तरातील प्रतिनिधींनी एकूण १० वेगवेगळ्या ठिकाणी नव्या राज्य सभागृहांच्या समर्पण कार्यक्रमांत सहभाग घेतला आहे. यांपैकी दोन ठिकाणी, दोन राज्य सभागृहांची सोय असलेल्या इमारतींचे समर्पण करण्यात आले. या सर्व कार्यामुळे भविष्यातील वाढीकरता भक्कम पाया तयार झाला आहे.

बेंगळूरमधील बेथेल गृह, कार्यालय व मुद्रणालय आता स्थिरस्थावर झाले असून भविष्यात अपेक्षित असलेल्या भव्य विस्ताराकरता सुसज्ज आहे. या वर्षाच्या सुरुवातीला नव्या यंत्रसामग्रीची स्थापना करण्यात आली. यांपैकी दोन नवी रॅपिडा मुद्रणयंत्रे आता ताशी १२,००० नियतकालिके तयार करतात. पूर्वीच्या यंत्रांच्या तुलनेत ही संख्या जवळजवळ दुप्पट आहे. नवीन पेपर कटर्स, फोल्डर्स, ट्रिमर्स, व स्टिचिंग लाईन यंत्रे देखील बसवण्यात आली. या सर्व यंत्रसामग्रीमुळे येत्या अनेक वर्षांपर्यंत आपल्या क्षेत्राकरता पुरेसे साहित्य मुद्रित करण्याची सोय झाली आहे.

नव्या यंत्रसामग्रीची स्थापना करण्यात मदत करण्याकरता सहा बांधव व त्यांच्या पत्नींनी मिळून बनलेले आंतरराष्ट्रीय पथक भारतात आले होते. आपल्या क्षेत्रातील पाच प्रशिक्षित टेक्निशियन्सनी या बांधवांना मदत केली. या स्वयंसेवकांच्या अनुभवाचे व आत्मत्यागाचे बेथेल कुटुंबातील सर्वांनी कौतुक केले आणि या बांधवांची परतण्याची वेळ आली तेव्हा आम्ही जड अंतःकरणाने त्यांचा निरोप घेतला.

सुनामीग्रस्त बांधवांना मदत पुरवण्याकरताही आंतरराष्ट्रीय पातळीवर एकजूट प्रयत्न करण्यात आले. सबंध देशातील बांधवांनी व परदेशात राहणाऱ्‍या भारतीयांनी मोठ्या मनाने साहाय्य केले, जेणेकरून एका आठवड्यातच आम्ही सुनामीग्रस्त बांधवांना, विशेषतः अंदमान व निकोबार येथे सुनामीचा सर्वात जास्त फटका बसलेल्या क्षेत्रातील बांधवांना भेटून त्यांना साहाय्य सामग्री पुरवू शकलो. यानंतरही सुयोग्य विभागीय पर्यवेक्षक व बांधकाम कर्मचाऱ्‍यांनी वेळोवेळी या बांधवांची भेट घेऊन, या विपत्तीत आपले सर्वकाही गमवलेल्या बांधवांना सातत्याने साहाय्य पुरवले. सुनामीग्रस्त क्षेत्रांतील बंधूभगिनींनी, त्यांचे नुकसान भरून काढण्याकरता हातभार लावलेल्या सर्वांना त्यांचे मनःपूर्वक आभार कळवण्याची आम्हाला विनंती केली आहे. आपण एक प्रेमळ ख्रिस्ती बंधूसमाजाचे भाग आहोत हा खरोखर आपल्याकरता किती मोठा बहुमान आहे!—१ पेत्र २:१७.

राज्याच्या कार्यांच्या विस्ताराकरता करण्यात आलेले हे सर्व आवेशी प्रयत्न खरोखर वाखाणण्याजोगे आहेत! तुम्ही दिलेल्या आर्थिक साहाय्याचीही आम्ही मनापासून कदर करतो. (नीति. ३:९, १०) यहोवाच्या “गौरवाची स्तूति व्हावी” म्हणून आपल्या सर्व एकजूट प्रयत्नांवर पुढेही त्याचा विपुल आशीर्वाद राहो.—इफिस. १:१२.

तुमचे बांधव,

भारत शाखा दफ्तर

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा