वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०५ पृ. ७
  • शब्दांविना साक्ष

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शब्दांविना साक्ष
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • सत्कर्मांमुळे यहोवाचा गौरव होतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • सदाचरणाद्वारे साक्ष देणे
    आमची राज्य सेवा—१९९८
  • तुम्ही देवाच्या आत्म्याला तुमचे मार्गदर्शन करू देत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km ८/०५ पृ. ७

शब्दांविना साक्ष

१ यहोवाची भौतिक सृष्टी, एकही शब्दाचा उच्चार न करता त्याच्या अदृश्‍य गुणांविषयी आपल्याला पुष्कळ काही सांगून जाते. (स्तो. १९:१-३; रोम. १:२०) तसेच, आपले उत्तम वर्तन, ख्रिस्ती गुण आणि सभ्य पेहराव शब्दांविना साक्ष देतात. (१ पेत्र २:१२; ३:१-४) आपण ज्याप्रकारे वागतो त्याद्वारे “आपला तारणारा देव ह्‍याच्या शिक्षणास शोभा” आणण्याची आपल्या प्रत्येकाची इच्छा असली पाहिजे.—तीत २:१०.

२ पण अपरिपूर्ण मानव बायबल शिक्षणाला आकर्षक कसे बनवू शकतो? फक्‍त देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनाने व पवित्र आत्म्याच्या शक्‍तीनेच हे शक्य आहे. (स्तो. ११९:१०५; १४३:१०) देवाचे वचन “सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण” आहे. (इब्री ४:१२) ते आपल्या आत भेदून जाते आणि आपल्याला नवीन मनुष्यत्व धारण करण्यास साहाय्य करते. (कलस्सै. ३:९, १०) पवित्र आत्मा आपल्यात, दयाळुपणा, चांगुलपणा, सौम्यता, आत्म-संयम यांसारखे आकर्षक गुण उत्पन्‍न करतो. (गलती. ५:२२, २३) आपण प्रत्येक जण, देवाच्या वचनाला आणि पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात कार्य करू देत आहोत का?—इफिस. ४:२०; १ थेस्सलनी. २:१३.

३ इतरांच्या लक्षात येते: आपण जेव्हा यहोवाच्या दर्जांनुसार जगायचा व त्याचे गुण प्रतिबिंबित करायचा प्रयत्न करतो तेव्हा हे इतरांच्या लक्षात येते. या उदाहरणाचा विचार करा. एक मनुष्य ठेंगणा असल्यामुळे त्याच्याबरोबर काम करणारे लोक त्याची थट्टा करायचे. पण त्याच कार्यालयात काम करणारी एक भगिनी मात्र या मनुष्याशी अदबीने व आदराने वागायची. यामुळे या मनुष्याने तिला विचारले, की ती इतरांपासून इतकी वेगळी का आहे? तिने त्याला सांगितले, की ती आपल्या जीवनात बायबल तत्त्वांचे अवलंबन करीत असल्यामुळे ती आदराने वागते. तिने त्याला अद्‌भुत राज्य आशेविषयी देखील सांगितले. या मनुष्याने बायबलचा अभ्यास सुरू केला आणि प्रगती करून कालांतराने बाप्तिस्माही घेतला. तो जेव्हा आपल्या मायदेशी गेला तेव्हा त्याचे उत्तम आचरण पाहून त्याच्या नातेवाईकांना नवल वाटले व त्यांच्यापैकीही अनेकांनी सत्य स्वीकारले.

४ नोकरीच्या ठिकाणी, शाळेत किंवा नातेवाईकांबरोबर, शेजाऱ्‍यांबरोबर आपण उठतो-बसतो तेव्हा, आपले वर्तन आणि आपण देत असलेली साक्ष यांमुळे लोक देवाचे गौरव करतील.—मत्त. ५:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा