घोषणा
▪ साहित्य सादरता ऑगस्ट: खालीलपैकी कोणतेही ३२-पानी माहितीपत्रक वापरले जावे: भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करितो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखर आपली काळजी करतो का?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), आणि मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी). सप्टेंबर: तुमची काळजी वाहणारा सृष्टीकर्ता आहे का? (इंग्रजी) हे पुस्तक सादर करावे. पर्यायी सादरता म्हणून जीवन—ते कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी) हे पुस्तक किंवा कोणतेही १९२ पानी जुने पुस्तक सादर केले जाऊ शकते. घरमालकाने पुस्तक स्वीकारले नाही तर जागृत राहा! हे माहितीपत्रक द्यावे. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांच्या प्रती द्याव्यात. घरमालकाने आस्था दाखवल्यास कृपया अपेक्षा माहितीपत्रक द्यावे. नोव्हेंबर: थोर शिक्षकाकडून शिका पुस्तक (इंग्रजी). आपल्याला मुले नाहीत असे घरमालकाने सांगितल्यास, ज्ञान पुस्तक किंवा तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका द्यावी.
▪ ऑक्टोबर महिन्यात पाच शनिवार-रविवार असल्यामुळे साहाय्यक पायनियरींग करायला हा महिना अगदी उत्तम आहे.
▪ या अंकाच्या आमची राज्य सेवा यातील पृष्ठ ५ आणि ६, २००६ सालच्या विभागीय व खास दिवस संमेलनांच्या संबंधाने वापरण्यासाठी जपून ठेवावे.
▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने सप्टेंबर १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. राज्य सभागृहाच्या दुरुस्तीसाठी किंवा बांधकामासाठी बँकेत वेगळ्या खात्यावर पैसे गोळा केले जात असतील तर या जमाखर्चाचा देखील अहवाल तयार करण्यात यावा. जमाखर्च अहवाल तयार झाल्यावर, पुढील जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.
▪ व्यक्तिगत पत्रव्यवहारासाठी शाखा दफ्तराच्या पत्त्याचा उपयोग करू नये, अशी आठवण करून दिली जाते. आस्थेवाईक लोकांना, घरी नसलेल्या लोकांना किंवा ज्यांच्यापर्यंत जाणे कठीण आहे अशा लोकांना साक्ष देण्याकरता लिहिलेल्या पत्रांवर व पाठवलेल्या प्रकाशनांवर उत्तरासाठी म्हणून शाखा दफ्तराच्या पत्त्याचा उपयोग करू नये. प्रचारकाने आपल्या स्वतःच्या घरचा पत्ता द्यावा कारण वैयक्तिकपणे प्रत्येक प्रचारक करत असलेली सेवा मुळात देवाची सेवा आहे. (मत्त. २८:१९, २०; रोम. १०:१४, १५) पण प्रचारकाला वाटत असेल, की पत्राने साक्ष देते वेळी आपला स्वतःचा पत्ता देणे बरोबर नाही तर त्याने स्वतःचे नाव आणि पत्ता मात्र राज्य सभागृहाचा द्यावा. आमची राज्य सेवा, मे २००२ अंकातील प्रश्न पेटी पाहा.
▪ मंडळीतील प्रत्येक सामान्य पायनियरसाठी पायनियर नियुक्ती पत्र (S-202) आहे, याची मंडळीच्या सचिवांनी खात्री करावी. नसल्यास, कृपया शाखा दफ्तराला लिहा. (कृपया जुलै ५, १९९९ तारखेचे सर्व वडीलवर्गासाठी असलेले पत्र पाहा.)
▪ ऑगस्ट ३१, २००५ किंवा त्यानंतर लवकरात लवकर साहित्य व मासिकांची वार्षिक मोजणी केली जावी. ही वार्षिक मोजणी दर महिन्यात लिटरेचर कोऑर्डिनेटर जी मोजणी करतात त्यासारखीच आहे. एकूण संख्या लिटरेचर इन्व्हेन्टरी (S-18) फॉर्मवर भरावी. मासिकांची एकूण संख्या, मॅगझीन सर्व्हंट सांगू शकतील. कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या सचिवांनी इन्व्हेन्टरीची तपासणी करावी. त्यांनी व कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी फॉर्मवर सह्या कराव्यात. प्रत्येक कोऑर्डिनेटिंग मंडळीला तीन लिटरेचर इन्व्हेन्टरीचे (S-18) फॉर्म्स मिळतील. मूळ फॉर्म भरून कृपया सप्टेंबर ६ च्या आत शाखा दफ्तराला पाठवावा. फॉर्मची कार्बन प्रत मंडळीच्या फाईलसाठी ठेवावी. तिसरी प्रत हिशेबासाठी वापरू शकता.
▪ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
यहोवाचे गुणगान गा—फक्त संगीत —इंग्रजी
केवळ संगीत असलेले गीतपुस्तक (Ssbly) स्वर नसलेले लहान आकाराचे पुस्तक आहे.
▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
आपण मेल्यावर आपले काय होते? —उर्दू