वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०५ पृ. ५
  • कौटुंबिक आराखडा—कौटुंबिक अभ्यास

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कौटुंबिक आराखडा—कौटुंबिक अभ्यास
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • कुटुंब मिळून देवाच्या वचनाचा अभ्यास नियमितपणे करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • संतोषविणारा कौटुंबिक अभ्यास
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • बायबल अभ्यासात —पूर्णार्थाने सहभाग घेण्यासाठी कौटुंबिक सदस्यांचे सहकार्यवब
    आमची राज्य सेवा—१९९९
  • कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी उचलणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km ५/०५ पृ. ५

कौटुंबिक आराखडा—कौटुंबिक अभ्यास

१ ख्रिस्ती पालक या नात्याने तुम्ही आपल्या मुलांना जे सर्वात मोठे बक्षीस देऊ शकता, ते म्हणजे आपल्यासारखेच त्यांनाही यहोवावर प्रेम करायला शिकवणे. हे तुम्ही एका महत्त्वपूर्ण प्रसंगी अर्थात, आठवड्याच्या कौटुंबिक बायबल अभ्यासासाठी तुम्ही “घरी बसलेले असता” तेव्हा करू शकता. (अनु. ६:५-७) तुमचा विवाह सोबती सत्यात असो अथवा नसो, तुम्ही धार्मिक कारणामुळे विभाजित कुटुंबात राहात असला अथवा नसला किंवा एकटे पालक असला अथवा नसला तरी तुम्ही तुमच्या मुलांना नियमित कौटुंबिक अभ्यासाद्वारे तुमच्या आणि यहोवाच्या जवळ येण्यास मदत करू शकता.

२ सुरुवात कशी करायची: पहिले पाऊल म्हणजे, कुटुंब मिळून अभ्यास करण्याची रीत तुम्ही सुरू करू शकता. अभ्यास केव्हा करायचा हे तुम्हाला कळत नसेल तर, कुटुंबाबरोबर याबाबतची चर्चा करा. (नीति. १५:२२) तुमची मुले लहान असतील तर तुम्ही अल्प समयासाठी परंतु आठवड्यातून अनेकदा अभ्यास करण्याचे ठरवू शकता. आपल्या कुटुंबासाठी काय उत्तम आहे ते ठरवा. तुमच्या कौटुंबिक आराखड्यावर अभ्यासासाठी एक ठराविक वेळ नेमा आणि त्या वेळेला चिकटून राहण्याचा निर्धार करा.

३ तुम्ही कशाचा अभ्यास करू शकता? काही जण पुढच्या मंडळीच्या पुस्तक अभ्यासात किंवा टेहळणी बुरूज अभ्यासात अभ्यासल्या जाणाऱ्‍या लेखाची तयारी करतात. तर काही जण, विशेषकरून तरुणांसाठी तयार केलेल्या साहित्याचा अभ्यास करतात. एक लहान मुलगी व मुलगा असलेल्या एका पित्याने म्हटले: “आम्ही बायबल कथांचं माझं पुस्तक यातल्या दृश्‍यांची नाटकं बसवतो त्यामुळे, आमच्या मुलांसाठी अभ्यास हा आठवड्यातला सर्वात आवडीचा प्रसंग बनतो. यामुळे त्यांच्या कोवळ्या मनावर उमटणारी छाप आणि त्यांना जे आकलन होते ते, आम्ही किती परिच्छेदांची चर्चा करतो यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे.”

४ दर आठवडी अभ्यास करा: कौटुंबिक अभ्यास नियमित असला पाहिजे. आणि कुटुंबातील सदस्यांनी याची आनंदाने आतुरतेने वाट पाहिली पाहिजे. कधीकधी अनपेक्षित प्रसंग येतात तेव्हा अभ्यासाचा दिवस किंवा वेळ यांत बदल केले जाऊ शकतात. कधीकधी आवश्‍यकतेनुसार तुम्हाला विषय देखील बदलावे लागतील. तुम्हाला कोणतेही आवश्‍यक बदल करावे लागले तरी, यामुळे तुमच्या ठरलेल्या कौटुंबिक अभ्यासाच्या आराखड्यात जास्त काळ व्यत्यय येऊ नये. एका कुटुंबातील एका मुलीने असे म्हटले: “आमच्या अभ्यासाची वेळ बदलणार असेल तर बाबा बदललेली वेळ, फ्रीजवर चिकटवून ठेवायचे. त्यामुळे आम्हाला सर्वांना अभ्यास केव्हा होणार आहे हे माहीत व्हायचं.” नियमित कौटुंबिक अभ्यास चालू ठेवण्यासाठी केले जाणारे अशाप्रकारचे प्रयत्न खरोखरच किती प्रशंसनीय आहेत! आपल्या मुलांना ‘प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवण्याद्वारे’ तुम्ही आपल्या मुलांवर आणि आपला स्वर्गीय पिता, यहोवा याच्यावर तुम्हाला किती प्रेम आहे हे दाखवता.—इफिस. ६:४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा