वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०३ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सावध राहा! एप्रिल-जून
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००५
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००४
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ४/०३ पृ. ८

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! एप्रिल-जून

“सावध राहा! याच्या या अंकात, आपल्या काळातील एका विदारक वास्तविकतेचा—बाल वेश्‍याव्यवसायाचा अहवाल देण्यात आला आहे. मुलांचे शोषण करण्याचा हा शोचनीय प्रकार लवकरच थांबवला जाणार आहे, असे बायबल अभिवचन देते. [नीतिसूत्रे २:२१, २२ वाचा.] मुलांचे शोषण होण्यामागे कोण कारणीभूत आहे तसेच हे कसे थांबवले जाणार आहे हे या मासिकात सांगितले आहे.”

टेहळणी बुरूज एप्रिल१५

“अलीकडील वर्षांमध्ये, पुष्कळ लोक नैतिक मूल्यांचा ऱ्‍हास होत चालल्याचे पाहत आहेत. तुमचेही याकडे लक्ष गेले आहे का? [उत्तरासाठी थांबा आणि मग स्तोत्र ११९:१०५ वाचा.] आध्यात्मिक मूल्य राखल्यास जीवनातील अनेक खाचखळग्यातून लोक वाचतील. खरी आध्यात्मिक मूल्ये कोठे सापडतील हे या मासिकात सांगितले आहे.”

सावध राहा! एप्रिल-जून

“शाळेत जाणाऱ्‍या मुलांना शिकवले जाते, की प्रामाणिकपणा हाच सर्वात उत्तम मार्ग होय. तरीसुद्धा, तुम्हाला काय वाटते, परीक्षांत मुले कॉपी का करतात? याचा त्यांना फायदा होतो का? [उत्तरासाठी थांबा आणि इब्री लोकांस १३:१८ वाचा.] सावध राहा! याच्या या अंकात [पृष्ठ १७ काढा] कॉपी करण्यात काय हरकत आहे? या प्रश्‍नाचे उत्तर दिले आहे.”

टेहळणी बुरूज मे१

“काही प्रश्‍नांची उत्तरे मानवाला देता येत नाहीत. हे उदाहरण पाहा. [ईयोब २१:७ वाचा.] तुमच्या मनात असा एखादा प्रश्‍न आहे का जो तुम्हाला देवाला विचारावासा वाटतो? [उत्तरासाठी थांबा.] पृथ्वीवरील सर्व भागांतील लोकांना जीवनातील सर्वात गंभीर असलेल्या तीन प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे कशी मिळाली आहेत, ते या मासिकात सांगितले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा