वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०३ पृ. ८
  • पुनर्भेटींमुळे बायबल अभ्यास मिळतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पुनर्भेटींमुळे बायबल अभ्यास मिळतात
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • पुनर्भेटी करण्यास धैर्य एकवटा
    आमची राज्य सेवा—१९९७
  • पुनर्भेटी घेण्याचे आव्हान
    आमची राज्य सेवा—१९९२
  • पुनर्भेटींची जबाबदारी स्वीकारा
    आमची राज्य सेवा—१९९२
  • प्रभावकारी पुनःर्भेंटी घेण्याद्वारे आस्था वाढवा
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ४/०३ पृ. ८

पुनर्भेटींमुळे बायबल अभ्यास मिळतात

१. पुनर्भेटीचे कार्य इतके महत्त्वपूर्ण का आहे?

१ येशूने आपल्या अनुयायांवर केवळ प्रचार करण्याचीच नव्हे तर ‘शिष्य बनवण्याची . . . व त्यांना शिकवण्याची’ कामगिरी सोपवली. (मत्त. २८:१९, २०) प्रचारक केवळ प्रचार करतो परंतु शिक्षक त्याहून जास्त करतो. तो शिकवतो, स्पष्टीकरण देतो आणि पुरावे सादर करतो. इतरांना शिकवण्याचा एक मार्ग म्हणजे, बायबलचा अभ्यास सुरू करण्याच्या हेतूने आस्थेवाईक लोकांना पुनर्भेट देणे.

२. आपण कोणाला पुनर्भेट दिली पाहिजे?

२ आपण कोणाला पुनर्भेट दिली पाहिजे? साहित्य स्वीकारणाऱ्‍यांना किंवा सुवार्ता ऐकताना थोडीशी देखील आस्था दाखवणाऱ्‍यांना आपण पुनर्भेट दिली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एखाद्या आस्थेवाईक व्यक्‍तीला भेटल्यास, तिचा पत्ता किंवा टेलिफोन नंबर घ्या जेणेकरून तुम्ही त्या व्यक्‍तीची आस्था आणखी वाढवू शकाल. बायबल अभ्यास सुरू करण्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. बायबलचा अभ्यास करण्यास तुम्ही देत असलेले आमंत्रण स्वीकारणाऱ्‍यांना शोधत राहा, तुम्हाला निश्‍चितच कोणीतरी भेटेल.—मत्त. १०:११.

३, ४. प्रभावी पुनर्भेटी करण्यात काय समाविष्ट आहे?

३ व्यक्‍तिगत आस्था दाखवा: प्रभावी पुनर्भेट करण्यासाठी पहिल्याच भेटीत तयारी करणे आवश्‍यक आहे. घरमालकाला कोणत्या गोष्टींत आवड आहे हे यशस्वी सुवार्तिक ताडतील आणि मग त्या आधारावर पुढील चर्चा करतील. काहींना, पुढील भेटीसाठी घरमालकाची आस्था जागृत करण्यासाठी पहिल्या भेटीनंतर त्याला एखादा प्रश्‍न विचारणे फायदेकारक वाटले आहे. लोकांमध्ये आपल्याला मनापासून आस्था असल्यामुळे, घरी आल्यानंतर देखील आपण त्यांच्याविषयी विचार करीत राहतो व विनाविलंब त्यांना लगेच भेटण्यास प्रवृत्त होतो. शक्य असेल तर घरमालकाची आस्था ताजी आहे तोपर्यंत म्हणजे एखाद दोन दिवसांत त्यांना पुन्हा भेटण्याचा प्रयत्न करा.

४ पुनर्भेट देताना, पहिल्या भेटीत तुम्ही ज्या विषयावर चर्चा केली होती त्यावर संभाषण पुढे वाढवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जाल त्या प्रत्येक वेळी शास्त्रवचनांतून निदान एक तरी वचन वाचून दाखवण्याचे ध्येय ठेवा आणि घरमालकाचे म्हणणे ऐकण्यास तयार असा. घरमालकास ओळखण्याचा प्रयत्न करा. मग, नंतरच्या भेटींमध्ये त्याला वाटणाऱ्‍या चिंतांविषयी देवाच्या वचनातील सत्य सांगण्याचा प्रयत्न करा.

५. बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी कोणत्या सोप्या पद्धतींचा अवलंब करता येऊ शकतो?

५ बायबल अभ्यास सुरू करण्याची जाणीव ठेवा: बायबल अभ्यास सुरू करण्याच्या हेतूने पुनर्भेटी करा. हे कसे करता येईल? तुम्ही एक लक्षवेधक मुद्दा सांगू इच्छित आहात असे म्हणून, घरमालकाला आवडेल असा ज्ञान पुस्तकातला किंवा अपेक्षा माहितीपत्रकातला एखादा परिच्छेद काढा. परिच्छेद वाचा, प्रश्‍न विचारा आणि परिच्छेदात दिलेल्या एक किंवा दोन शास्त्रवचनांची चर्चा करा. हे तुम्ही दारात उभे राहूनसुद्धा पाच ते दहा मिनिटांत करू शकता. शेवटी आणखी एखादा प्रश्‍न विचारून, चर्चा पुढे चालू ठेवण्यासाठी पुढल्या भेटीची व्यवस्था करा.

६. पुनर्भेटींचे महत्त्व आपल्याला समजले आहे हे आपण कसे दाखवू शकतो?

६ लोक दाखवत असलेली आस्था वाढवणे, हा आपल्या सेवेचा महत्त्वपूर्ण पैलू आहे. यास्तव, तुमच्या साप्ताहिक आराखड्यात पुनर्भेटींसाठी वेळ काढा. असे केल्याने तुमची सेवा प्रभावी होईल शिवाय तुम्हालाही खरा आनंद मिळेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा