वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०३ पृ. ४
  • चांगल्या कामात एक कित्ता व्हा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चांगल्या कामात एक कित्ता व्हा
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • ‘सर्वदा चांगले करीत राहा’
    आमची राज्य सेवा—२००२
  • “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा”
    आमची राज्य सेवा—२०१४
  • सर्व प्रकारच्या आचरणांत पवित्र व्हा
    आमची राज्य सेवा—२००४
  • यहोवाची वाट पाहा
    आमची राज्य सेवा—२००६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ७/०३ पृ. ४

चांगल्या कामात एक कित्ता व्हा

१. प्रांतीय अधिवेशनाच्या ठिकाणी आपण आपल्या वर्तनाकडे खास लक्ष देण्याची गरज का आहे?

१ प्रांतीय अधिवेशनांसाठी मोठ्या संख्येत आपण एकत्र जमतो तेव्हा, आपले कार्य आणि इतरांबरोबरची आपली वागणूक खासकरून आपल्याला पाहणाऱ्‍यांना लगेच दिसते. यास्तव, आपल्यातील प्रत्येकाने बायबलमधील या सल्ल्याकडे खास लक्ष द्यावे: ‘मर्यादशील असावे . . . सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे आपणाला दाखव.’ (तीत २:६, ७) “कोणीहि आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्‍याचेहि पाहा” या सल्ल्यानुसार वागण्याकरता अधिक परिश्रम करण्याची गरज आहे. (फिलिप्पै. २:४) “देवाचे गौरव करा” या आगामी प्रांतीय अधिवेशनादरम्यान कोणकोणत्या क्षेत्रांत आपण वरील उत्तेजन लागू करू शकतो हे पाहू या.

२ राहण्याची व्यवस्था करण्याच्या बाबतीत आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

२ राहण्याची व्यवस्था: राहण्याची व्यवस्था करताना आपल्याला चांगली कामे प्रदर्शित करण्याची एक उत्तम संधी मिळते. तुम्हाला जितक्या खोल्या लागतील तितक्याच खोल्यांचे कृपया आरक्षण करा. उचित डिपॉझिट देण्यास विसरू नका. हॉटेलमध्ये राहायला येतानाच्या आणि हॉटेलमधून जातानाच्या घाईगडबडीच्या काळात विशेषकरून आपण देवाच्या आत्म्याचे फळ प्रदर्शित करणे प्रशंसनीय आहे.—गलती. ५:२२, २३.

३ अधिवेशनाच्या ठिकाणी आपण यहोवाच्या गौरवात आणखी भर कशी टाकू शकतो?

३ अधिवेशनाच्या ठिकाणी: अधिवेशनांसाठी आपण भाड्याने वापरत असलेल्या ठिकाणांची, अनेक वर्षांपासून लोकांनी त्यांचा गैरवापर, मोडतोड केल्यामुळे, केरकचरा केल्यामुळे आणि इतर अप्रतिष्ठित प्रकारांमुळे दुर्दशा झालेली असते. शौचालये आणि त्याला जोडून असलेली संकुले, आपला पवित्र देव याच्या दर्जांना मुळीच शोभत नाहीत. हे बदलण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तुम्ही स्वेच्छेने शौचालये धुवून काढू शकता, सभागृह झाडून काढू शकता, बाकडे पुसू शकता आणि इतर आवश्‍यक कामे करू शकता. अधिवेशन स्थळाचा प्रत्येक कोपरा, आपल्या स्वच्छताप्रिय देवाचे व्यक्‍तिमत्व प्रतिबिंबित करेल याची खात्री करा. यामुळे पडणारी उत्तम छाप, यहोवाची “प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान” यांत आणखी भर टाकील.—अनु. २६:१९.

४, ५ मुले यहोवाला गौरव कसे आणू शकतात आणि पालकांची काय जबाबदारी आहे?

४ पालक आणि मुले: शिष्टाचार नसलेल्या बहुसंख्य युवकांच्या या जगात, आपली मुले वेगळी उठून दिसतात आणि यामुळे यहोवाची आणि त्याच्या संघटनेची स्तुती होते. परंतु कधीकधी मुलांवर योग्यप्रकारे लक्ष न ठेवल्यामुळे समस्या उद्‌भवल्या आहेत. (नीति. २९:१५) पालकांनी आपल्या मुलांना, हॉटेलमध्ये, स्वीमिंग पूल जवळ किंवा अधिवेशनाच्या ठिकाणी एकटे सोडू नये.

५ काही पालकांनी जेव्हा, अधिवेशनाच्या आधी आपल्या मुलांबरोबर बसून या गोष्टीची चर्चा केली की अधिवेशनाच्या वेळी त्यांच्याकडून कोणत्याप्रकारचे आचरण अपेक्षिले जाते, तेव्हा या पालकांना याचा खूप फायदा झाला. (इफिस. ६:४) ते आपल्या मुलांना हे समजण्यास मदत करतात, की खरे ख्रिस्ती प्रेम, “गैरशिस्त वागत नाही,” किंवा “स्वार्थ पाहत नाही.” (१ करिंथ. १३:५) प्रांतीय अधिवेशनाचा काळ, हा यहोवाकडून शिक्षण प्राप्त करण्यासाठी बाजूला राखलेला वेळ आहे व मुले आणि प्रौढ दोघेही, अधिवेशनाच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणी आपल्या आचरणाद्वारे या व्यवस्थेबद्दल आदर व्यक्‍त करू शकतात.—यश. ५४:१३.

६ आपल्या उत्तम आचरणाचा इतरांवर कोणता प्रभाव पडू शकतो?

६ आपले उत्तम आचरण, चुकीचे ग्रह दूर करण्यास व लोकांना खऱ्‍या उपासनेकडे आकर्षित करण्यास बराच हातभार लावू शकतात. (मत्त. ५:१६; १ पेत्र २:१२) प्रांतीय अधिवेशनाच्या वेळी ज्या ज्या लोकांशी आपला संपर्क येईल त्या त्या लोकांना, आपल्या आचरणाद्वारे आणि त्यांच्याबरोबरच्या आपल्या व्यवहाराद्वारे उत्तम साक्ष मिळो. अशाप्रकारे आपण ‘चांगल्या कामाचा कित्ता असे दाखवू’ आणि यहोवाचे गौरव करू.—तीत २:७.

[४ पानांवरील चौकट]

विचारशील असा

▪ तुम्हाला लागतील इतक्या खोलीचे आरक्षण करा

▪ हॉटेलमध्ये राहायला आल्यावर आणि सोडून जाताना सहनशीलतेने वागा

▪ अधिवेशन ठिकाण स्वच्छ ठेवण्यात सहकार्य करा

▪ आपल्या मुलांवर योग्य नजर ठेवा

▪ उचित बक्षीस द्या

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा