वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०३ पृ. ३
  • यहोवाचे गौरव करण्याकरता एकत्र जमणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे गौरव करण्याकरता एकत्र जमणे
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • मोठ्या मंडळीत यहोवाचे उपकारस्मरण करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • सन १९९९ “देवाचे भविष्यसूचक वचन” प्रांतीय अधिवेशने
    आमची राज्य सेवा—१९९९
  • आध्यात्मिक अन्‍नाचा आस्वाद घेण्याची एक आनंददायक संधी
    आमची राज्य सेवा—२००८
  • “सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या”
    आमची राज्य सेवा—२००४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ७/०३ पृ. ३

यहोवाचे गौरव करण्याकरता एकत्र जमणे

१. अधिवेशनाचे शीर्षक काय आहे आणि यहोवा आपल्या स्तुतीस पात्र का आहे?

१ यहोवा देव सर्वसमर्थ आहे, बुद्धीत अगम्य आहे, न्यायात परिपूर्ण आहे आणि प्रेमाचे मूर्त स्वरूप आहे. निर्माणकर्ता, जीवन-दाता, विश्‍वाचा सार्वभौम या नात्याने तोच केवळ आपल्या उपासनेच्या पात्र आहे. (स्तो. ३६:९; प्रकटी. ४:११; १५:३, ४) या वर्षाचे, “देवाचे गौरव करा” हे प्रांतीय अधिवेशन, एकमात्र खरा देव म्हणून त्याची स्तुती करण्याचा आपला दृढनिश्‍चय आणखी पक्का करील.—स्तो. ८६:८-१०.

२, ३. चांगल्या योजनेमुळे आपल्याला अधिवेशनात लाभ कसा घेता येऊ शकतो?

२ चांगल्या योजनेची आवश्‍यकता: यहोवाने आपल्यासाठी तयार केलेल्या आध्यात्मिक मेजवानीचा पूर्ण आस्वाद लुटण्यासाठी चांगल्या योजनेची आवश्‍यकता आहे. (इफिस. ५:१५, १६) तुम्ही, तुमच्या राहण्याची, जाण्या-येण्याची आणि अधिवेशनासाठी सुटीची व्यवस्था केली का? या महत्त्वाच्या गोष्टींना, नंतर पाहू असे म्हणून पुढे ढकलू नका. सुटी विचारण्यास तुम्ही दिरंगाई केल्यास, या आनंदी प्रसंगाचा काही भाग तुम्ही कदाचित चुकवाल. आपण सर्वांनी प्रत्येक कार्यक्रमासाठी उपस्थित असले पाहिजे.

३ प्रत्येक दिवशी अधिवेशनाच्या ठिकाणी लवकर येण्याचे ध्येय ठेवा. यामुळे तुम्हाला सुरवातीच्या गीताआधी बसण्यासाठी जागा शोधता येईल आणि सादर केल्या जाणाऱ्‍या कार्यक्रमासाठी आपले मन तयार करता येईल. अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी, सकाळी आठ वाजता सर्वांना आत प्रवेश दिला जाईल. तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि तुमच्याबरोबर प्रवास करणाऱ्‍या बंधूभगिनी यांच्याव्यतिरिक्‍त इतरांसाठी जागा धरू नका.

४. आपण सर्वांनी अधिवेशनाला येताना दुपारचे जेवण सोबत आणावे अशी विनंती का करण्यात आली आहे?

४ सर्वांना अशी विनंती केली जाते, की त्यांनी दुपारी अधिवेशनाचे ठिकाण सोडून बाहेर जेवणासाठी जाण्याऐवजी आपल्यासोबत दुपारचे जेवण आणावे. या व्यवस्थेला तुम्ही सहकार्य दिल्यामुळे, शांतीपूर्ण वातावरण राहील आणि सर्वांना सहविश्‍वासू बंधूभगिनींबरोबर संगती करण्यास अधिक वेळ मिळेल. (स्तो. १३३:१-३) कृपया हे लक्षात ठेवा, की अधिवेशनाच्या ठिकाणी, काचेच्या बाटल्या, इत्यादी आणि मद्यार्क आणण्यास परवानगी नाही.

५. अधिवेशनासाठी आपण आपले अंतःकरण कसे तयार करू शकतो?

५ ऐका आणि शिका: देवाचे वचन ग्रहण करण्यासाठी एज्राने मनापासून प्रार्थना केली. (एज्रा ७:१०) यहोवाच्या शिकवणुकींकडे त्याने लक्ष दिले. (नीति. २:२) अधिवेशनाच्या शीर्षकावर मनन करण्याद्वारे व आपल्या कुटुंबासोबत त्याची चर्चा करण्याद्वारे आपणही अधिवेशनाला जाण्याआधीच आपले अंतःकरण तयार करू शकतो.

६. कार्यक्रमावरील आपले लक्ष एकाग्र ठेवण्यास कोणत्या गोष्टी आपल्याला मदत करू शकतील? (चौकोन पाहा.)

६ मोठ्या सभागृहात सहसा आपले लक्ष विचलित करणारी दृश्‍ये, आवाज असतात. यांमुळे वक्‍त्‌याच्या बोलण्यावरून आपले लक्ष सहजरीत्या विचलित होऊ शकते. आपले लक्ष विचलित होते तेव्हा आपण मौल्यवान माहिती गमावतो. आपले लक्ष एकाग्र करण्यास आपल्याला साहाय्य करू शकणाऱ्‍या काही सूचना सोबतच्या चौकानात दिल्या आहेत.

७, ८. आपण इतरांचा विचार कसा करू शकतो आणि आपला दृढनिश्‍चय काय असला पाहिजे?

७ इतरांचा विचार करा: कार्यक्रम सुरू असताना, इतरांचे लक्ष विचलित न करता, तुमच्याच जागेवर बसून तुम्ही कॅमेरा, कॅमकॉर्डर्सचा उपयोग करू शकता. सेल फोन आणि पेजर देखील सेट करून ठेवणे आवश्‍यक आहे जेणेकरून इतरांना त्यांचा त्रास होणार नाही. परंतु, काही ठिकाणी असे पाहण्यात आले आहे, की काही बंधूभगिनी कार्यक्रम चालू असताना विनाकारण इकडे-तिकडे फिरून इतरांचे लक्ष विचलित करतात. इतर काही, कार्यक्रमाला उशिरा आल्यामुळे कार्यक्रमाच्या सुरवातीची काही मिनिटे इतर बांधवांचे लक्ष विचलित झाले आहे. अशा वेळी, कृपया सेवकांना सहकार्य द्या आणि अध्यक्ष आपल्याला बसायला सांगतात तेव्हा खाली बसा.

८ यहोवाचे गौरव करण्यासाठी एकत्र जमण्याची आपण किती आतुरतेने वाट पाहत आहोत! प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याद्वारे, लक्षपूर्वक ऐकण्याद्वारे व आपण जे ऐकतो ते आपल्या जीवनात लागू करण्याद्वारे यहोवाचे गौरव करण्याचा आपण दृढनिश्‍चय करू या!—अनु. ३१:१२.

[३ पानांवरील चौकट]

अधिवेशनांत ऐकताना

▪ भाषणांच्या शीर्षकावर मनन करा

▪ बायबलमधून वचने उघडून पाहा

▪ संक्षिप्त नोंदी घ्या.

▪ लागू करण्याजोग्या मुद्द्‌यांची खास नोंद करा

▪ जे काही शिकता त्याची उजळणी करा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा