“आवेशी राज्य उद्घोषक” प्रांतीय अधिवेशनाचा पूर्ण लाभ घेणे
१ प्रेरणादायक कार्यक्रम: आपल्या अलीकडच्या प्रांतीय अधिवेशनात आपण किती प्रेरणादायक कार्यक्रमाचा आनंद लुटला! आपण सर्व एकाच उद्देशासाठी तेथे एकत्र जमलो होतो अर्थात देवाच्या राज्याची आवेशाने घोषणा करण्यास सज्ज होण्यासाठी. “घोषणा करणे” या वाक्यांशाची व्याख्या पहिल्या वक्त्याने कशी केली ते तुम्हाला आठवते का? “यहोवा आपल्याबरोबर आहे हे जाणून निडर राहा,” या भाषणात आपल्याला कोणते संशोधन करण्याचे उत्तेजन देण्यात आले होते? आतापर्यंत तुम्ही कोणत्या जीवन कथांचे परीक्षण केले आहे?
२ “विविध परीक्षांनी आपल्या विश्वासाचा दर्जा पारखला जातो” असे शीर्षक असलेल्या परिसंवादात, यहोवा आपल्या लोकांचा छळ का होऊ देतो त्याची तीन कारणे सांगण्यात आली होती. ती कोणकोणती होती हे तुम्ही सांगू शकाल का? आपल्या ख्रिस्ती तटस्थतेसाठी शास्त्रवचनात कोणता आधार आहे? आपल्या तटस्थ भूमिकेमुळे येऊ शकणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यास स्वतःला तयार करण्यासाठी आपल्याला कोणते उत्तेजन देण्यात आले होते? विश्वासूपणे परीक्षांचा सामना केल्याने आपण यहोवाची स्तुती कशी करतो?
३ “संकटकाळी स्थिर राहा” असे शीर्षक असलेल्या नाटकातील कोणत्या दृश्यांनी तुम्हाला विशेषतः मजबूत केले? आपण यिर्मयाप्रमाणे कसे होऊ शकतो?
४ “या जगाचे दृश्य बदलत आहे” या जाहीर भाषणात, देवाच्या भय-प्रेरक दिवसांपर्यंत नेणारे कोणते उल्लेखनीय बदल घडणार असल्याचे वर्णन करण्यात आले होते? “आवेशी राज्य उद्घोषक या नात्याने भरपूर सत्कृत्ये करा” हे समाप्तीचे भाषण ऐकताना, त्यातील माहिती तुम्ही तुमच्या व्यक्तिगत सेवेशी कशी जोडली?
५ लागू करण्याजोगे मुख्य मुद्दे: “कृतज्ञ असा,” या भाषणात वर्णन केल्याप्रमाणे आपण आपली मनापासूनची कृतज्ञता यहोवाला कशी व्यक्त करू शकतो? “राज्य उद्घोषकांचा ज्वलंत आवेश” या प्रमुख भाषणात आपल्याला कोणाच्या आवेशाचे अनुकरण करण्याचे उत्तेजन देण्यात आले होते? आपल्याला कोणते आत्म-परीक्षण करण्यास सांगण्यात आले होते?
६ “मीखाची भविष्यवाणी यहोवाच्या नामात चालत राहण्यास आपल्याला दृढ करते” या परिसंवादात, कोणत्या तीन अपेक्षांवर जोर देण्यात आला होता ज्या आपण यहोवाची मर्जी प्राप्त करण्याकरता पूर्ण केल्या पाहिजेत? या अपेक्षा पूर्ण करण्याजोग्या आहेत का? (मीखा ६:८) “आपल्या हृदयाचे रक्षण करून शुद्धाचरण ठेवा” या भाषणात सांगितल्याप्रमाणे कोणकोणत्या मार्गांनी आपण स्वतःला शुद्ध ठेवले पाहिजे? “भुलथापांपासून सावधान” या भाषणात, कोणकोणत्या बाबतीत आपण स्वतःची फसवणूक होण्यापासून सावध राहू शकतो आणि इतरांची फसवणूक करण्याचे टाळू शकतो हे सांगण्यात आले होते?
७ “आपल्या सेवाकार्याचा सन्मान करणारे राज्य उद्घोषक” या परिसंवादात मांडण्यात आलेले कोणते व्यावहारिक मुद्दे तुम्ही आपल्या सेवेत उपयोगात आणू लागला आहात? “आध्यात्मिक संभाषण उभारणीकारक आहे,” या भाषणात फिलिप्पैकर ४:८ वर चर्चा करण्यात आली होती. हे वचन आपल्याला आपले संभाषण आध्यात्मिक गोष्टींवर ठेवण्यास कशाप्रकारे मदत करते आणि असे आपण केव्हा केले पाहिजे?
८ “संकटकाळी यहोवावर पूर्ण भरवसा,” या भाषणात, आपण दुःखद घटनांचा, आर्थिक अडचणींचा, आजारपणाचा, कौटुंबिक समस्यांचा आणि आपला पिच्छा न सोडणारी आपली कमतरता यांचा सामना कसा करू शकतो यावर चर्चा करण्यात आली होती. अशा परिस्थितींमध्ये असताना, आपला यहोवावर भरवसा आहे हे आपण कसे दाखवू शकतो?
९ नवीन आध्यात्मिक खजिना: एकमात्र खऱ्या देवाची उपासना करा (इंग्रजी) हे नवीन पुस्तक मिळाल्यामुळे आपल्याला खूप आनंद झाला. या पुस्तकाच्या उद्देशाविषयीची घोषणा ऐकल्यावर तुम्हाला कसे वाटले? दुसरे अभ्यासाचे पुस्तक म्हणून हे आपल्याला शिष्य बनवण्याच्या कार्यात कशाप्रकारे उपयुक्त ठरेल?
१० त्यानंतर आपल्याला, यहोवाच्या समीप या (इंग्रजी) हे आणखी एक सुंदर पुस्तक मिळाले. या पुस्तकाची काही खास वैशिष्ठ्ये कोणती आहेत? तुम्हाला खासकरून त्यातील कोणती चित्रे आवडली? हे पुस्तक वाचल्यावर तुम्ही यहोवाच्या समीप आला का? या पुस्तकाचा आणखी कोणाला फायदा होऊ शकतो?
११ “आवेशी राज्य उद्घोषक” या प्रांतीय अधिवेशनाने आपल्याला, या कठीण काळाचा सामना करण्यासाठी लागणारे आध्यात्मिक उत्तेजन दिले आहे. या उल्लेखनीय आध्यात्मिक तरतूदीचा पूर्णपणे लाभ घेण्याकरता आपण, जे काही सांगण्यात आले होते ते आठवणीत ठेवण्याचा, आपल्याला जे काही मिळाले त्याबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा आणि आपण जे काही शिकलो त्याचा आपल्या जीवनात उपयोग करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू या. (२ पेत्र ३:१४) असे केल्याने आपल्याला, एकनिष्ठ राहण्यास तसेच आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे अनुकरण करून आवेशी राज्य उद्घोषक होण्यास शक्ती मिळेल; आणि हे सर्व आपण यहोवाच्या गौरवासाठी करू.—फिलिप्पै. १:९-११.