वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०० पृ. १
  • यहोवाचे भय सतत बाळगा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे भय सतत बाळगा
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचे भय मानणारे हृदय उत्पन्‍न करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यहोवाचे भय बाळगण्यात आनंद मिळवण्याचे शिकणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मानवाचे नव्हे तर देवाचे भय का धरावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • यहोवाचे भय धरा व त्याच्या पवित्र नामाचे गौरव करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km १२/०० पृ. १

यहोवाचे भय सतत बाळगा

१ “परमेश्‍वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय.” (स्तोत्र १११:१०) ते आपल्याला सत्कर्म करण्यास चालना देते आणि दुष्कर्मांपासून दूर राहण्यास मदत करते. (नीति. १६:६) असे भय असणे म्हणजे निर्माणकर्त्याबद्दल गाढ श्रद्धा असणे. या भयामुळेच आपण देवाला नाखूष करणाऱ्‍या किंवा त्याच्या आज्ञांचे उल्लंघन करणाऱ्‍या गोष्टींचा धिक्कार करू. म्हणूनच हे भय आपण स्वतःमध्ये निर्माण करावे आणि सतत बाळगावे.—नीति. ८:१३.

२ सैतानाच्या जगाचा आत्मा त्याच्या दुष्ट मार्गांनुसार चालण्यासाठी आपल्यावर दररोज दबाव आणत असतो. (इफिस. ६:११, १२) आपण अपरिपूर्ण आहोत शिवाय पापी देखील आहोत यांमुळे वाईट गोष्टींकडेच आपला जास्त कल असतो. (गलती. ५:१७) म्हणून, यहोवाला आज्ञाधारक राहण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी आणि जीवन मिळवण्यासाठी आपण सतत देवाचे भय बाळगले पाहिजे.—अनु. १०:१२, १३.

३ इब्री लोकांस १०:२४, २५ येथे एकमेकांना अधिकाधिक उत्तेजन देण्यासाठी एकत्र येण्याची सूचना देण्यात आली आहे. या शेवटल्या दिवसांमध्ये आपल्याला आपला बचाव करायचा असल्यास, नियमितपणे सभांना उपस्थित राहणे फार आवश्‍यक आहे. देवाला नाराज करण्याचे भय बाळगल्यामुळे सभांना उपस्थित राहायला आणि सभांना महत्त्व द्यायला आपल्याला प्रेरणा मिळेल. देवाचे भय बाळगणाऱ्‍या लोकांना ख्रिस्ती सभांमध्ये भाग घेणे एक पवित्र विशेषाधिकार वाटतो.

४ राज्य सुवार्तेची घोषणा करण्याच्या आज्ञेचे पालन करूनही आपण देवाचे भय बाळगतो हे दाखवू शकतो. (मत्त. २८:१९, २०; प्रे. कृत्ये १०:४२) यहोवाचे भय बाळगण्यास आणि त्याला अधीनता दाखवण्यास इतरांची मदत करणे हे सुवार्ता सांगण्याच्या कार्याचे मुख्य ध्येय आहे. आणि हे ध्येय पुनर्भेटी देऊन, गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करून आणि इतरांना देवाच्या आज्ञा शिकवून साध्य करता येते. अशाप्रकारे, आपण यहोवाचे भय आणि शेजाऱ्‍याविषयी प्रेम प्रदर्शित करतो.—मत्त. २२:३७-३९.

५ देवाचे भय बाळगत नसलेल्या लोकांना आध्यात्मिक गोष्टींची कदर नसते. यामुळे ते जगाच्या विषारी वायुचे किंवा मनोवृत्तीचे बळी ठरतात. (इफिस. २:२) आपण मात्र “आदर व भय” बाळगून “देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा” करण्याचा पक्का निर्धार करुया. (इब्री. १२:२८) अशा तऱ्‍हेने यहोवाचे भय सतत बाळगणाऱ्‍यांसाठी असलेले आशीर्वाद आपल्याला मिळतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा