तुम्ही धैर्याने सुवार्तेची घोषणा करता का?
१ पेत्र आणि योहानाला विरोधकांनी अटक केली, धमकी दिली तरीही ते धैर्याने राज्याच्या संदेशाची घोषणा करत राहिले. (प्रे. कृत्ये ४:१७, २१, ३१) परंतु, धैर्याने सुवार्तेची घोषणा करण्याचा आज आपल्याकरता काय अर्थ होतो?
२ धैर्याने साक्ष देणे: “धैर्य” या शब्दासाठी एक समानार्थी शब्द आहे “धीटपणा.” त्याचा अर्थ “निर्भयता, मनोधैर्य आणि सहनशक्ती” असा होतो. खऱ्या ख्रिश्चनांकरता, धैर्याने सुवार्तेची घोषणा करण्याचा अर्थ उचित संधी मिळते तेव्हा निर्भयतेने सुवार्ता सांगणे होय. (प्रे. कृत्ये ४:२०; १ पेत्र ३:१५) म्हणजेच सुवार्तेची आपल्याला लाज वाटत नाही. (स्तोत्र ११९:४६; रोम. १:१६; २ तीम. १:८) या शेवटल्या काळात राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याची कामगिरी पूर्ण करण्यासाठी धैर्य असणे आवश्यक आहे. आपल्याजवळ धैर्य असल्यास लोक भेटतील तेथे त्यांना सुवार्ता सांगण्यासाठी आपण प्रेरित होऊ.—प्रे. कृत्ये ४:२९; १ करिंथ ९:२३.
३ शाळेत धैर्य: भीतीमुळे किंवा लाज वाटत असल्यामुळे तुम्हाला शाळेतल्या सोबत्यांना सुवार्ता सांगायला कठीण जाते का? काही वेळा, तर हे एक आव्हान वाटेल. परंतु, तुम्ही जर धैर्यासाठी यहोवाकडे प्रार्थना केली तर तो तुम्हाला शक्ती देईल. (स्तोत्र १३८:३) धैर्यामुळे तुम्ही यहोवाचे साक्षीदार म्हणून स्वतःची ओळख देऊ शकाल आणि थट्टेचा सामना करू शकाल. परिणामस्वरूप, शाळेमध्ये इतरांना सुवार्ता सांगितल्याने ऐकणाऱ्यांचा कदाचित बचाव होऊ शकेल.—१ तीम. ४:१६.
४ कामाच्या ठिकाणी धैर्य: सहकर्मचारी तुम्हाला यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखतात का? तुमच्यासोबत काम करणाऱ्यांना तुम्ही सुवार्ता सांगितली नाही तर कदाचित त्यांना ती कधीच ऐकायला मिळणार नाही. शिवाय, तुम्ही धैर्य दाखवले तर ख्रिस्ती सभा आणि अधिवेशनांसाठी तुम्हाला सुटी देखील मिळेल.
५ परीक्षेतही धैर्यवान: विरोधाचा सामना करतेवेळी धैर्य दाखवणे फार महत्त्वाचे आहे. (१ थेस्सलनी. २:१, २) आपल्याला धमक्या दिल्या जातात, आपली थट्टा केली जाते किंवा आपला छळ केला जातो तेव्हा आपल्या विश्वासानुरूप वागण्यास धैर्य आपली मदत करते. (फिलिप्पै. १:२७, २८) यहोवा देवाच्या नियमांचे पालन करण्यासंबंधी हातमिळवणी करण्यासाठी आपल्यावर दबाव येतो तेव्हा देखील धैर्य आपल्याला बळकटी देते. आणि इतरजण भांडणे काढतात तेव्हा आपल्याला शांती कायम राखण्यास धैर्य बळ देते.—रोम. १२:१८.
६ तर मग, कोणत्याही अडचणींमध्ये आपण सातत्याने व धैर्याने सुवार्तेची घोषणा करत राहू या.—इफिस. ६:१८-२०.