किंगडम न्यूज क्र. ३६ मुळे उत्पन्न झालेल्या आस्थेला खतपाणी घालणे
१ किंगडम न्यूज क्र. ३६ च्या तुमच्या कोट्याचे तुमचे वितरण करून झाले का? या पत्रिकेत एक अगदी समयोचित प्रश्न विचारला आहे ज्यावर आपण सर्व विचार करू शकतो: “नव्या युगात तुमचे काय भविष्य असेल?” वर्ष २००० जसजसे जवळ येऊ लागले तसतसे, नवीन सहस्रक कसे असेल यावर प्रत्येकाने भिन्नभिन्न मत मांडले. किंगडम न्यूज क्र. ३६ लोकांच्या काही अपेक्षांची चर्चा करते व आपल्याला आठवण करून देते, की जगाची परिस्थिती पाहिल्यावर आपल्याला आशेचा कोणताही किरण दिसत नाही. लोकांना हवी असलेली शांती आणि सुरक्षितता त्यांना फक्त एकाच सहस्त्रकात म्हणजे फक्त येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यातच मिळेल. त्याचे राज्य हे निश्चित येईल असा आपल्याला भरवसा असल्यामुळेच आपण किंगडम न्यूज क्र. ३६ सर्वांना देण्यास प्रवृत्त होतो.
२ किंगडम न्यूजला लोकांचा प्रतिसाद: याआधीच्या किंगडम न्यूज वितरणाला आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे किंगडम न्यूज क्र. ३६ चे वितरण करायला आपल्याला आणखी प्रोत्साहन मिळते. किंगडम न्यूज क्र. ३५ विषयी कॅनडा शाखा दफ्तराने असे लिहिले: “या खास मोहिमेत सर्व प्रचारकांनी व पायनियरांनी आवेशाने भाग घेतला आणि त्यांना उत्तेजनात्मक अनुभवही आले.” आम्हाला खात्री आहे की कॅनडातील आपल्या बांधवांप्रमाणे तुम्हीही किंगडम न्यूज क्र. ३६ चे आवेशाने वितरण केले असावे!
३ किंगडम न्यूज क्र. ३६ च्या वितरणाची मोहीम नोव्हेंबर ३०, २००० रोजी समाप्त होईल. त्यामुळे तुमच्या मंडळीकरता नेमण्यात आलेल्या सर्व क्षेत्रात तुम्ही या ट्रॅक्टचे वितरण केले आहे का? क्षेत्र अजून संपले नसेल तर तुमच्या मंडळीतील वडील कदाचित तुम्हाला डिसेंबर महिन्यातही या ट्रॅक्टचे वितरण करायला सांगतील.
४ आतापर्यंत तुम्ही किंगडम न्यूज क्र. ३६ चे वितरण केल्यावर तुम्हाला कोणकोणते अनुभव आले? कदाचित काही लोक, अपेक्षा माहितीपत्रक आणि/किंवा गृह बायबल अभ्यास यांबद्दल जास्त माहितीसाठी विनंती करण्याकरता ट्रॅक्टच्या मागचे कूपन भरून संस्थेला पाठवतील. पण बहुतेक लोक फक्त सुरवातीलाच सहस्रकाच्या विषयावर आस्था दाखवतील; पण कोणी यहोवाचा साक्षीदार त्यांच्याकडे जाईपर्यंत कदाचित ते पाऊल उचलणार नाहीत. त्यामुळे, पहिल्या भेटीतच आवड दाखवणाऱ्या सर्व लोकांना आपण पुन्हा भेटले पाहिजे. केव्हा भेटले पाहिजे? होता होईल तितक्या लवकर. आपण सांगितलेला संदेश त्यांच्या मनात ताजा आहे तोपर्यंत त्यांना भेटलो तर बरे होईल.
५ किंगडम न्यूज क्र. ३५ चे वितरण केल्यानंतर आलेले पुढील अनुभव पाहा. आर्यलँडमधील एका पायनियरने एका हॉटेलच्या मालकिणीला हे ट्रॅक्ट दिले. तिला ट्रॅक्टमधला संदेश खूपच आवडला. तिने साक्षीदार बहिणीला पुन्हा बोलवले. दोन दिवसांनंतर साक्षीदार बहीण तिच्याकडे गेली आणि तिच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला. डेन्मार्कमध्ये एका घराला कुलूप होते म्हणून हे ट्रॅक्ट दाराच्या फटीतून आत टाकण्यात आले. त्या घराची मालकीण पुन्हा घरी आल्यावर तिने लगेच शाखा दफ्तराला ट्रॅक्टमागील कूपन भरून पाठवले आणि मग संस्थेने स्थानीय मंडळीला ते पाठवले. आठवड्याच्या आत दोन भगिनी तिच्या घरी गेल्या, बायबल अभ्यासाची व्यवस्था केली आणि ती स्त्री राज्य सभागृहात होणाऱ्या सभेला त्या आठवड्यात उपस्थित देखील राहिली!
६ पुनर्भेट करताना काय बोलायचे: किंगडम न्यूज ट्रॅक्ट दिल्यावर पुनर्भेट करणे खूप सोपे आहे. हा आपल्या सेवेचा अगदी आनंद देणारा भाग आहे. पुनर्भेटीला जाताना किंगडम न्यूज क्र. ३६ ची तुमची प्रत नेलेली बरी. घरमालकाकडे त्याची प्रत नसेल तर तुम्ही त्याला तुमची प्रत दाखवू शकता. सुचवलेल्या पुढील प्रस्तावांचा तुम्ही उपयोग करू शकता.
७ तुम्ही आधी पण घरमालकाशी बोलला होता याची त्याला आठवण करून दिल्यावर तुम्ही म्हणू शकता:
◼ “मी मागे आलो होतो तेव्हा जाताना तुम्हाला “नव्या युगात तुमचे काय भविष्य असेल?” या शीर्षकाची एक पत्रिका देऊन गेलो होतो. त्यामध्ये तुम्ही वाचलं असेल, की फार लवकर ख्रिस्त येशू त्याचे हजार वर्षांचे राज्य सुरू करील आणि या पृथ्वीवर बागेसारखी परिस्थिती आणील. [किंगडम न्यूज क्र. ३६ मधील परादीसची चित्रे दाखवा.] ट्रॅक्टच्या मागच्या पानावर एक कूपन आहे त्यावर देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकाबद्दल सांगितले आहे. याविषयीच्या अधिक माहितीकरता तुम्ही विचारणा करू शकता.” मग, हे माहितीपत्रक दाखवा. त्यातून ५ वा धडा काढा आणि पहिला प्रश्न वाचल्यावर १ आणि २ परिच्छेद वाचा. आणि मग घरमालकाला उत्तर विचारा. एखाद-दुसरे वचन वाचून त्यावर चर्चा करा. शक्य असेल तर दुसरा प्रश्न वाचून मग परिच्छेदही वाचा. पुन्हा येऊन चर्चा केल्यास आवडेल का असे घरमालकाला विचारा.
८ ट्रॅक्ट दिल्यानंतर, डिसेंबरमध्ये आपल्याला “ज्ञान” पुस्तक सादर करायचे आहे. तेव्हा तुम्ही म्हणू शकता:
◼ “मी मागे तुमच्याकडे आलो होतो तेव्हा ‘नव्या युगात तुमचे काय भविष्य असेल?’ ही पत्रिका तुम्हाला देऊन गेलो होतो. पत्रिकेत मोफत गृह बायबल अभ्यासाविषयी सांगितले आहे. आम्ही कोणत्या पुस्तकातून हा अभ्यास करतो ते मी तुम्हाला दाखवायला पुन्हा आलो आहे. [ज्ञान पुस्तक दाखवा. पृष्ठे १८८-९ काढा.] बायबलमध्ये ज्या हजार वर्षांबद्दल सांगितले आहे त्या कालावधीत या चित्रात तुम्ही पाहता तशी परिस्थिती संपूर्ण पृथ्वीवर येईल. अशा परिस्थितीत तुम्हाला अनंतकाळ जगायचे असेल तर देवाचे अचूक ज्ञान घेणे आवश्यक आहे. ते ज्ञान बायबलमध्ये आहे. आपण बायबलचा अभ्यास कसा करू शकतो हे मी तुम्हाला या पुस्तकातून दाखवतो.”
९ किंगडम न्यूज क्र. ३६ या ट्रॅक्टचे वितरण केल्यामुळे आपल्याला क्षेत्र सेवेत आणखी भाग घ्यायची व एक महान साक्ष द्यायची प्रेरणा मिळाली आहे. आणि यामुळे क्षेत्रातील अनेक लोकांची आस्था जागृत झाली असावी. लोकांच्या मनात जागृत झालेल्या आस्थेला खतपाणी घालण्यासाठी आपण करत असलेल्या संयुक्त प्रयत्नांना यहोवा नक्की यश देईल आणि आपण जास्तीतजास्त मेंढरासमान लोकांना भेटू.—मत्त. १०:११; प्रे.कृत्ये १३:४८, ४९, ५२.