वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ४/१ पृ. १६-२०
  • यहोवाचे भय धरा व त्याच्या पवित्र नामाचे गौरव करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे भय धरा व त्याच्या पवित्र नामाचे गौरव करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरी भय विजयी होते
  • यहोवाच्या भयाने हालचाल करणे
  • चांगल्यावर प्रीती करा, वाईटाचा द्वेष करा
  • यहोवाचे भय धरा व त्याची स्तुती करा
  • यहोवाचे अनंतकाल गौरव करीत राहा
  • यहोवाचे भय मानणारे हृदय उत्पन्‍न करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यहोवाचे भय बाळगण्यात आनंद मिळवण्याचे शिकणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवाचे भय धरा व त्याच्या आज्ञा पाळा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • मानवाचे नव्हे तर देवाचे भय का धरावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ४/१ पृ. १६-२०

यहोवाचे भय धरा व त्याच्या पवित्र नामाचे गौरव करा

“हे प्रभो [यहोवा, न्यू.व.], तुला कोण भिणार नाही? तुझ्या नामाचा महिमा कोण करणार नाही? कारण पवित्र [“निष्ठावंत,” न्यू.व.] असा काय तो तूच एक आहेस.”—प्रकटीकरण १५:४.

१, २. (अ) १९९१ मध्ये यहोवाने आकाशकपाटे कशी उघडली? (ब) एका विश्‍वासू मिशनऱ्‍याला आपल्या जीवनाच्या कोणत्या अनुभवामुळे “यहोवाची भीती बाळगा!” हा सल्ला देण्यास उद्युक्‍त केले? (तसेच पहा १९९१चे वार्षिक अहवाल पुस्तक, पृष्ठे १८७-९.)

यहोवाने ‘आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद वर्षिला.’ हे शब्द आधुनिक काळात यहोवाच्या साक्षीदारांना वारंवार लागू करता येऊ शकतात. (मलाखी ३:१०) उदाहरणार्थ, दक्षिण अमेरिकेतील सॅओ पौलो (ऑगस्ट १७-१९, १९९०), व ब्युनोस एअर्स ते पूर्वेकडे मनिला, ताईपेई व बँकॉक तसेच पूर्व युरोपात बुडापेस्ट, प्राग्यु व झाग्रेब (ऑगस्ट १६-१८, १९९१) पर्यंत भरविण्यात आलेल्या खास अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्‍या पाहुण्या साक्षीदारांचा तसेच स्थानिक अधिवेशन प्रतिनिधींचा आनंद ओसंडून वाहत होता.

२ या स्थळी बऱ्‍याच काळापासून विश्‍वासू राहणाऱ्‍या साक्षीदारांना परदेशातील प्रतिनिधींनी भेटणे केवढे उत्साहवर्धक होते! उदाहरणार्थ, बँकॉकमधील अधिवेशनात, थायलंड येथील एकाकी राज्य प्रचारक फ्रँक डेवर याने आपल्या ५८ वर्षांच्या मिशनरी सेवेचा अनुभव कथन केला. त्याची सेवा पॅसिफिक समुद्रधुनीपासून ते आग्नेय आशिया व चीनमध्येही घडली. त्याला जहाज फुटण्याचा, अरण्यातील वनपशूंचा सामना करण्याचा, उष्ण कटिबंधातील आजार, आणि जपानी युद्धनेत्यांकडील क्रुर राजवटीचा अनुभव आला. त्याला विचारण्यात आले की, तो अधिवेशन प्रतिनिधींना कोणता सल्ला देणार, तेव्हा त्याने साधे उत्तर दिले की, “यहोवाची भीती बाळगा!”

३. आम्ही ईश्‍वरी भय का दाखवावे?

३ “यहोवाची भीती बाळगा!” हे हितकारी भय बाळगणे आम्हा सर्वांना केवढे महत्त्वपूर्ण आहे! “परमेश्‍वराचे [यहोवा, न्यू.व.] भय ज्ञानाचा उगम होय.” (स्तोत्रसंहिता १११:१०) ही काही यहोवाबद्दल वाटणारी पीडादायक भीती नव्हे. उलटपक्षी, त्याचे भयप्रद ऐश्‍वर्य व ईश्‍वरी गुण याबद्दलचा हा कळकळीचा आदर देवाच्या वचनाच्या गाढ अभ्यासावर आधारलेला आहे. प्रकटीकरण १५:३, ४ मधील मोशाचे व कोकऱ्‍याचे गीत सांगतेः “हे सर्वसत्ताधारी प्रभु [यहोवा, न्यू.व.] देवा, तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत. हे राष्ट्राधिपते [“सनातन राजा,” न्यू.व.] तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे प्रभो [यहोवा, न्यू.व.] तुला कोण भिणार नाही? तुझ्या नामाचा महिमा कोण करणार नाही? कारण पवित्र [“निष्ठावंत,” न्यू.व.] असा काय तो तूच एक आहेस.” आपल्या उपासकांच्या निष्ठावंतपणाला अनुलक्षून यहोवाने आपणापुढे “परमेश्‍वराचे [यहोवा, न्यू.व.] भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही” लिहिली आहे. अशांना सार्वकालिक जीवन मिळेल.—मलाखी ३:१६; प्रकटीकरण २०:१२, १५.

ईश्‍वरी भय विजयी होते

४. कोणत्या प्राचीन मुक्‍ततेमुळे आपल्याला यहोवाचे भय बाळगण्याची चालना मिळावी?

४ फारोच्या मिसर देशातून इस्राएल लोक बाहेर पडले तेव्हा मोशाने, आपण केवळ यहोवाची भीती बाळगतो असे स्पष्टरित्या दाखवले. लवकरच इस्राएलांना तांबडा समुद्र व मिसरची प्रबळ लष्करी यंत्रणा याच्या कोंडीत धरण्यात आले. आता ते काय करणार? “मोशे लोकांस म्हणालाः ‘भिऊ नका; स्थिर उभे राहा आणि परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] आज तुमचे तारण करील ते पाहा. कारण जे मिसरी लोक तुम्ही आज पाहात आहात ते पुनः कधीही तुमच्या नजरेस पडावयाचे नाहीत. परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] तुम्हासाठी लढेल; तुम्ही उगे राहा.” यहोवाने अद्‌भूतरित्या पाण्याचे विभाजन घडवले. इस्राएली लोक कोरड्या समुद्राच्या जमिनीवरून चालत गेले. मग, पानी पुन्हा खाली आले. फारोची सर्व सेना समूळ नष्ट झाली. यहोवाने आपल्या देवभिरु राष्ट्राचा बचाव केला व त्याच वेळी देवाचा अपमान करणाऱ्‍या मिसरावर न्यायदंड बजावला. तसेच आज, तो आपल्या देवभिरु साक्षीदारांची सैतानी जगतामधून मुक्‍तता घडवून आणून आपला निष्ठावंतपणा दाखवील.—निर्गम १४:१३, १४; रोमकर १५:४.

५, ६. यहोशवाच्या काळातील कोणत्या घटना, आपण माणसांपेक्षा यहोवाची भीती बाळगली पाहिजे असे दाखवितात?

५ मिसरच्या निर्गमनानंतर मोशाने १२ जासूदांना वचनयुक्‍त देशात पाठविले. तेथील राक्षसी रहिवाश्‍यांना बघून दहा जासूद घाबरले, त्यामुळे त्यांनी इस्राएलांना त्या प्रदेशात प्रवेश करण्यापासून मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण बाकीचे दोघे, कालेब व यहोशवा यांनी कळविलेः “जो देश हेरीत आम्ही चोहोकडे फिरलो, तो अतिशयित उत्तम आहे. परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] आम्हावर प्रसन्‍न झाला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्‍या देशात आम्हास नेऊन तो देईल. तुम्ही परमेश्‍वराविरुद्ध [यहोवा, न्यू.व.] बंड मात्र करू नका; अथवा त्या देशाच्या लोकांची भीती धरू नका. ते आमचे भक्ष्य होणार, त्यांचा आधार तुटला आहे. आम्हाबरोबर परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] आहे; त्यांची भीती धरू नका.”—गणना १४:७-९.

६ तथापि, ते इस्राएली मानवाच्या भयाला बळी पडले. याचा परिणाम हा झाला की, ते त्या वचनयुक्‍त देशात जाऊ शकले नाही. पण यहोशवा व कालेब हे इस्राएलांच्या नव्या पिढीसह त्या निवडीच्या देशात प्रवेश करू शकले आणि त्यांनी द्राक्षमळे व जैतुनाच्या उपवनांची लागवड केली. इस्राएलांच्या जमलेल्या जनसमूहाला आपले निरोपाचे भाषण देताना यहोशवाने हा सल्ला दिलाः “परमेश्‍वराचे [यहोवा, न्यू.व.] भय धरा, त्याची सेवा सात्विक व खऱ्‍या मनाने करा.” तसेच यहोशवाने पुढे म्हटलेः “मी आणि माझे घराणे तर परमेश्‍वराची [यहोवा, न्यू.व.] सेवा करणार.” (यहोशवा २४:१४, १५) आपण आता देवाच्या नीतीमान नव्या जगात पाऊल टाकण्याच्या पावित्र्यात असताना सर्व कुटुंबप्रमुखांसाठी व इतर सर्वांसाठी ते शब्द किती प्रोत्साहनदायक आहेत!

७. दावीदाने देवाच्या भयाच्या महत्त्वपूर्णतेवर कसा जोर दिला?

७ गल्याथाला देवाच्या नामाद्वारे आव्हान देताना मेंढपाळ मुलगा दावीद यानेही यहोवाच्या भयाबद्दलचा उत्तम नमुना प्रस्तुत केला. (१ शमुवेल १७:४५, ४७) आपल्या मृत्युशय्येवर असताना दावीद हे म्हणू शकलाः “परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] आत्मा माझ्या द्वारे म्हणाला, त्याचे वचन माझ्या जिव्हेवर आले; इस्राएलाचा देव म्हणाला, इस्राएलाचा दुर्ग मला म्हणालाः ‘मानवांवर न्यायाने राज्य करणारा निर्माण होईल. सूर्योदयींच्या प्रभातेसारखा तो उदय पावेल, निरभ्र प्रभातेसारखा तो असेल.’” (२ शमुवेल २३:२-४) हे देवाचे भय या जगाच्या शासनकर्त्यांमध्ये अस्तित्वात नाही आणि यामुळे केवढे भयंकर परिणाम दिसत आहेत! पण जेव्हा “दाविदाचा पुत्र” येशू, यहोवाचे भय धरून या पृथ्वीवर आपली सत्ता गाजवील तेव्हा केवढे वेगळेच असेल!—मत्तय २१:९.

यहोवाच्या भयाने हालचाल करणे

८. यहोशाफाटाच्या वर्चस्वाखाली यहूदाची का भरभराट झाली, व हे आजच्या काळासाठी काय सूचित करते?

८ दाविदाच्या मृत्युनंतर साधारण शंभर वर्षांनी यहोशाफाट यहूदामध्ये राजा बनला. हा यहोवाचे भय मानून राज्य करणारा राजा होता. त्याने यहूदामध्ये ईश्‍वरशासित व्यवस्था पुनर्स्थापित केली, सर्व देशभर शास्ते नेमले आणि त्यांना या सूचना केल्याः “तुम्ही न्याय कराल तेव्हा तो मानवासाठी नाही तर परमेश्‍वरासाठी [यहोवा, न्यू.व.] करावयाचा आहे; न्याय करताना तो तुमच्याबरोबर असणार. तर परमेश्‍वराची [यहोवा, न्यू.व.] भीती तुमच्याठायी असू द्या. तुम्ही जे कराल ते संभाळून करा, कारण आपला देव परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] याच्याकडे काही अधर्म नाही. तो काणाचे तोंड पाहून न्याय करीत नाही की लाच घेत नाही . . . परमेश्‍वराचे [यहोवा, न्यू.व.] भय बाळगून खऱ्‍या व निष्कपट मनाने [“अंतःकरणाने,” न्यू.व.] असे करा.” (२ इतिहास १९:६-९) अशाप्रकारे यहूदा देशाची यहोवाच्या भयात समृद्धी झाली. आजही देवाच्या लोकांना कनवाळू देखरेख्यांद्वारे लाभ मिळत आहे.

९, १०. यहोशाफाटाने यहोवाचे भय बाळगून कसा विजय संपादित केला?

९ तथापि, यहूदा देशाला शत्रू होते. यांनी देवाच्या राष्ट्राला नष्ट करण्याच्या युक्त्या योजिल्या. अम्मोन, मवाब व सेईर डोंगर याकडील लष्करी बळ समूहाने यहूदी प्रदेशात घुसले आणि त्यांची यरुशलेमास भीती घातली. ते खूपच प्रबळ लष्कर होते. यहोशाफाटाने यहोवाकडे प्रार्थना केली. यावेळी “सर्व यहूदी आपली मुलेबाळे व स्त्रिया यांजसह परमेश्‍वरासन्मुख [यहोवा, न्यू.व.] उभे राहिले.” मग, या प्रार्थनेचे उत्तर देताना, यहोवाचा आत्मा यहजीएल या लेव्यावर उतरला. त्याने म्हटलेः “परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] तुम्हास सांगत आहे की, ‘हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका; कचरू नका. कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे. उद्या त्यांच्याशी सामना करावयास जा . . . या लढाईत तुम्हास लढावे लागणार नाही. हे यहूदा, हे यरुशलेमा, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] तुमचे कसे तारण करील ते पाहा. घाबरू नका, कचरू नका. उद्या त्याजवर चाल करून जा. कारण परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] तुमच्याबरोबर आहे.”—२ इतिहास २०:५-१७.

१० दुसऱ्‍या दिवशी यहूदाचे लोक भल्या पहाटेच उठले. त्यांना आज्ञा झाल्याप्रमाणे ते शत्रूशी सामना करण्यास निघाले तेव्हा यहोशाफाट उठून उभा राहिला व म्हणालाः “अहो यहूद्यांनो, अहो यरुशलेम निवासी जनहो, ऐका. तुमचा देव परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] याच्यावर विश्‍वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल. त्याच्या संदेष्ट्यांवर विश्‍वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.” शस्त्रधारी सैन्याच्या आघाडीवर यहोवास गीत गाणाऱ्‍यांनी समूहात असे म्हटलेः “परमेश्‍वराचा [यहोवा, न्यू.व.] धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे.” यहोवाने ही दया, शत्रूला घोटाळ्यात पाडून व्यक्‍त केली. ते इतके गोंधळून गेले की त्यांनी एकमेकांचीच हत्या केली. यहूदाचे लोक अरण्यात टेहळणीच्या बुरुजाकडे आले तेव्हा त्यांना केवळ शत्रूची शवे सर्वत्र पडलेली आढळली.—२ इतिहास २०:२०-२४.

११. भयासंबंधाने राष्ट्रे देवाच्या लोकांपेक्षा कशी वेगळी आहेत?

११ या अद्‌भूत मुक्‍ततेबद्दल शेजारच्या राष्ट्रांनी ऐकले तेव्हा त्यांच्यावर “देवाचा धाक” बसला. पण दुसऱ्‍या बाजूस बघता, यहोवाचे भय मानणाऱ्‍या राष्ट्राला “चोहोकडून आराम” मिळाला. (२ इतिहास २०:२९, ३०) याचप्रमाणे, यहोवा हर्मगिद्दोनात आपला न्यायदंड बजावील तेव्हा राष्ट्रांना “देवाचा धाक” व दंडाज्ञा बजावणाऱ्‍या त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचा धाक पडेल; आणि यांना ईश्‍वरी क्रोधाच्या मोठ्या दिवशी टिकाव धरता येणार नाही.—प्रकटीकरण ६:१५-१७.

१२. आरंभीच्या काळी यहोवाच्या भयाने कसे आशीर्वादित केले?

१२ यहोवाचे हितकारक भय समृद्ध आशीर्वाद आणते. नोहाने “भक्‍तीभाव धरून आपल्या घराच्या तारणासाठी विश्‍वासाने तारू तयार केले.” (इब्रीयांस ११:७) तसेच पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांच्या बाबतीत असे लिखित आहे की, छळाचा काळ संपल्यावर मंडळीला “स्वस्थता प्राप्त झाली, आणि तिची वृद्धी होऊन ती प्रभुच्या [यहोवा, न्यू.व.] भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालून वाढत गेली.” हेच आज पूर्व युरोपात घडत आहे.—प्रे. कृत्ये ९:३१.

चांगल्यावर प्रीती करा, वाईटाचा द्वेष करा

१३. यहोवाकडील आशीर्वादांचा अनुभव आपल्याला केवळ कसा मिळू शकेल?

१३ यहोवा हा सर्वतोपरि चांगला आहे. “परमेश्‍वराचे [यहोवा, न्यू.व.] भय धरणे म्हणजे दुष्कर्मांचा द्वेष करणे होय.” (नीतीसूत्रे ८:१३) येशूबद्दल असे लिहिण्यात आले आहेः “तुला न्यायाची आवड व अधर्माचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरुपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.” (इब्रीयांस १:९) येशूप्रमाणेच यहोवाचे आशीर्वाद मिळविण्याची आमची इच्छा आहे तर मग आम्ही वाईटाचा, अनैतिकता, हिंसाचार, आणि या सैतानी गर्विष्ठ जगाच्या लोभाचा त्याग केला पाहिजे. (पडताळा नीतीसूत्रे ६:१६-१९.) यहोवा ज्यावर प्रीती करतो त्यावर आम्ही आपली प्रीती केली पाहिजे व तो ज्याचा द्वेष करतो त्याचा द्वेष केला पाहिजे. यहोवास असंतुष्ट करणाऱ्‍या कसल्याही गोष्टी आपणाकडून घडू नयेत म्हणून त्याचे भय मानले पाहिजे. “यहोवाचे [यहोवा, न्यू.व.] भय बाळगिल्याने मनुष्य दुष्कर्मांपासून दूर राहतात.”—नीतीसूत्रे १६:१६.

१४. येशू आपणापुढे कसा कित्ता सादर करतो?

१४ येशूने आम्हासाठी, त्याच्या पावलांस अनुसरावे म्हणून कित्ता सोडला. “त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख सोशीत असता धमकाविले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्‍यांकडे ते सर्व सोपवून दिले.” (१ पेत्र २:२१-२३) यहोवाचे भय धरुन आपण देखील सैतानी जगाकडून येणारी निंदा, थट्टा, छळ सहन करू शकतो.

१५. जे शरीराला वधितात त्यापेक्षा आपण यहोवाचे भय का मानावे?

१५ मत्तय १०:२८ मध्ये येशूचा आपल्याला हा सल्ला आहेः “जे शरीराला वधितात, पण आत्म्याला वधावयास समर्थ नाहीत त्यांस भिऊ नका, तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात [“गेहेन्‍ना,” न्यू.व.] नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या.” यहोवाची भीती धरणाऱ्‍यांना शत्रूद्वारे जरी ठार व्हावे लागले तरी मृत्युच्या वेदना अल्पकालीन आहेत. (होशेय १३:१४) पुनरुत्थान झाल्यावर ती व्यक्‍ती म्हणू शकेलः “अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?”—१ करिंथकर १५:५५.

१६. येशूने यहोवाचे भय दाखवून त्याचे कसे गौरव केले?

१६ यहोवाच्या नीतीमत्तेवर प्रीती करणाऱ्‍यांना व जे वाईट त्याचा द्वेष करणाऱ्‍यांना येशूने स्वतः उत्तम उदाहरण दिले आहे. त्याने यहोवाचे भय मानले होते हे त्याने आपल्या अनुयायांना म्हटलेल्या अंतिम उद्‌गारांवरुन कळते. ते बोल योहान १६:३३ मध्ये याप्रकारे आढळतातः “या गोष्टी मी तुम्हास अशासाठी सांगितल्या आहेत की, माझ्या ठायी तुम्हास शांती मिळावी. जगात तुम्हास क्लेश होतील; तरी धीर धरा. कारण मी जगाला जिंकिले आहे.” योहानाचा अहवाल पुढे म्हणतोः “या गोष्टी बोलल्यावर येशूने वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हटलेः ‘हे पित्या, वेळ आली आहे, पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. . . . जी मनुष्ये जगातून तू मला दिली त्यांस मी तुझे नाम प्रकट केले.”—योहान १७:१-६.

यहोवाचे भय धरा व त्याची स्तुती करा

१७. आपल्याला येशूच्या उदाहरणाचे कोणत्या मार्गाने अनुकरण करता येईल?

१७ येशूच्या धैर्यवान उदाहरणाचे आज आपल्याला अनुकरण करता येईल का? होय, यहोवाचे भय मानून निश्‍चितपणे तसे करता येईल! येशूने आम्हाला यहोवाचे नामांकित नाव व गुण कळविले आहेत. यहोवास सेनाधीश प्रभू असे त्याचे भय मानल्यामुळे आपण त्याला इतर सर्व देवांपेक्षा, ख्रिस्ती धर्मजगताच्या नामरहित गूढ अशा त्र्यैक्यापेक्षाही उंचावीत असतो. येशूने यहोवाचे हितकर भय मानून सेवा केली आणि मर्त्य मानवाच्या भीतीच्या पाशात अडकण्याचे नाकारले. “त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात, स्वतःला मरणापासून तारावयास जो शक्‍तीमान त्याजजवळ मोठ्या आक्रोशाने व अश्रु गाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सुभक्‍तीमुळे ऐकण्यात आली.” आपण देखील सार्वकालिक तारणाचे ध्येय स्वतःपुढे ठेवून, आपल्याला ज्या गोष्टी सहन कराव्या लागतील त्यापासून आज्ञांकितपणा शिकून घेत असता येशूप्रमाणे यहोवाचे भय धरू या.—इब्रीयांस ५:७-९.

१८. ईश्‍वरी भय मानून आपण देवाची पवित्र सेवा कशी करू शकतो?

१८ इब्रीयांना लिहिलेल्या याच पत्रात पुढे पौलाने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना हा सल्ला दिलाः “यास्तव न हालणारे राज्य मिळणारे जे आपण ते उपकार मानू; तेणेकरून देवाला प्रिय होईल अशी त्याची सेवा सद्‌भक्‍तीने व सद्‌भयाने करू.” आज, “मोठा लोकसमुदाय” देखील या पवित्र सेवेत सहभागी होत आहे. त्यात कशाचा समावेश आहे? यहोवाने आपला पुत्र येशू ख्रिस्ती याचे यज्ञार्पण देण्यात जी विपुल दया प्रदर्शित केली त्याची चर्चा केल्यावर पौल म्हणतोः “आपण त्याच्याच द्वारे देवाला उपकारस्मरणरुपी यज्ञ निरंतर अर्पावा; हा यज्ञ त्याचे नाम स्वीकारणाऱ्‍या ओठांचे फळ असा आहे.” (इब्रीयांस १२:२८; १३:१२, १५) यहोवाच्या विपुल दयेची कदर बाळगून आपल्याला शक्य असणारा प्रत्येक तास त्याच्या पवित्र सेवेत देण्याची इच्छा झाली पाहिजे. उरलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे निष्ठावंत सहकारी या नात्याने मोठा लोकसमुदाय आज त्या सेवेचा मोठा भाग पूर्ण करीत आहेत. ते आपल्या तारणाचे श्रेय देव व ख्रिस्त यांना देतात व ते देवाच्या राजासनापुढे लाक्षणिकरित्या उभे राहून त्याची “अहोरात्र पवित्र सेवा करीत” आहेत.—प्रकटीकरण ७:९, १०, १५.

यहोवाचे अनंतकाल गौरव करीत राहा

१९, २०. “यहोवाच्या दिवशी” कोणते दोन प्रकारचे भय दिसून येतील?

१९ यहोवाच्या नामाचे पवित्रीकरण होण्याचा वैभवी दिवस जलदपणे जवळ येत आहे! “‘पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील. तो येणारा दिवस त्यांस जाळून टाकील. . . . ’ असे सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] म्हणतो.” (मलाखी ४:१, ५) तो दुष्टांच्या हृदयात “दहशत” भरवील, आणि ते “निभावणारच नाहीत.”—यिर्मया ८:१५; १ थेस्सलनीकाकर ५:३.

२० तथापि, यहोवाचे लोक एका वेगळ्याच भयाने प्रेरित आहेत. “सार्वकालिक सुवार्ता” घोषित करण्याची आज्ञा असलेला देवदूत यांना मोठ्या वाणीने हे फर्मावतोः “देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण त्याची न्यानिवाडा करावयाची घटिका आली आहे.” (प्रकटीकरण १४:६, ७) हर्मगिदोनची दाहकत सैतानी जगाला जाळून टाकीत असता, त्या न्यायकाळात आपण सद्‌भयाने उभे राहू शकू. आमच्या अंतःकरणावर यहोवाचे हितकर भय कायमचे कोरले जाईल. तद्वत, आम्हाला, ‘यहोवाच्या नावाचा धावा केलेले बचावलेल्यात राहतील,’ त्यामध्ये आढळण्याची कृपापसंती लाभो!—योएल २:३१, ३२; रोमकर १०:१३.

२१. यहोवाचे भय कोणत्या आशीर्वादांप्रत निरवील?

२१ पुढे अद्‌भुत आशीर्वाद येतील. यामध्ये अनंतकाळच्या पल्ल्याची “आयुष्याची अधिक वर्षे”ही असतील! (नीतीसूत्रे ९:११; स्तोत्रसंहिता ३७:९-११, २९) तेव्हा, आमची आशा कोणतीही असली, राज्याचे वतन मिळविण्याची वा पृथ्वीवरील वातावरणात सेवा करण्याची, तरी आता आपण देवाची पवित्र सेवा त्याला ईश्‍वरी भयाने व सद्‌भयाने सादर करीत राहू या. त्याचे पवित्र नाम आपण सतत गौरवीत राहू या. यामुळे कोणता आशीर्वादित परिणाम घडेल? आम्ही आपल्या अंतःकरणी यहोवाची भीती बाळगा! हा सूज्ञ सल्ला लावून घेतल्यामुळे आम्हाला सदासर्वदा धन्यता प्राप्त होईल.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ “यहोवाचे भय” याचा काय अर्थ होतो?

▫ देवाच्या भयाने प्राचीन काळातील लोकांना कसा लाभ मिळवून दिला?

▫ येशूने ईश्‍वरी भयाचा कोणता नमुना आम्हापुढे मांडला?

▫ आपण यहोवाच्या भयात आपली सचोटी कशी राखू शकतो?

[१६ पानांवरील चित्रं]

प्रकटीकरणाच्या पुस्तकात येशूचे भाऊ “मोशाचे गीत,” यहोवाची स्तुती करणारे गीत गात असल्याचे दिसत आहे

[१८ पानांवरील चित्रं]

यहोशाफाटाच्या सैन्याने यहोवाचे भय मानून विजय मिळविला

[२० पानांवरील संक्षिप्त आशय]

यहोवाचे भय मानणाऱ्‍यांना अनंतकाळासाठी आयुष्याची अधिक वर्षे हे वरदान मिळेल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा