वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०० पृ. ७
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • माहितीयुक्‍त साहित्य, स्पष्टपणे सादर केलेले
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
  • श्रोत्यांशी संपर्क व टिपणीचा उपयोग
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
  • तुमच्या श्रोत्यांची खात्री पटवा, त्यांच्याशी विवाद करा
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
  • पवित्र शास्त्राकडे लक्ष वेधवणे
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km ९/०० पृ. ७

प्रश्‍न पेटी

▪ भाषण देताना, वक्‍ता वचने वाचण्याचे उत्तेजन देतो तेव्हा श्रोत्यांनी ती वचने आपापल्या बायबलमधून उघडून पाहणे फायद्याचे का आहे?

भाषणाचा विषय आणि भाषणात बायबलमधील एखाद्या अध्यायाच्या एक एक वचनाचे स्पष्टीकरण या आधारावर आपल्या श्रोत्यांना आपण किती वचने उघडून वाचायला सांगू शकतो हे वक्‍त्‌याने ठरवले पाहिजे.

आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे; भाषणादरम्यान शास्त्रवचने वाचण्याचे एक कारण म्हणजे, जे काही सांगितले जाते ते शास्त्रवचनांत आहे याची खात्री करणे. (प्रे. कृत्ये १७:११) आणि दुसरे कारण म्हणजे, ज्या विषयाची चर्चा चालली आहे त्याविषयाच्या शास्त्रवचनीय पुराव्याचे परीक्षण करणे. या दोन गोष्टींमुळे वक्‍त्‌याचा आणि श्रोत्यांचा विश्‍वास आणखी मजबूत होतो. वक्‍ता एखादे वचन वाचत असतो तेव्हा श्रोत्यांनी ते वचन आपल्या बायबलमधून पाहिल्यास त्यांची आणखी खात्री पटेल. आपल्या बायबलमधून वचने काढून वाचण्यासोबत, नोट्‌स घेतल्याने व वक्‍त्‌याच्या सर्व बोलण्याकडे लक्ष दिल्यानेही खूप फायदा होतो.

एखाद्या विषयावरील संस्थेच्या रुपरेषेत पुष्कळ वचनांचा उल्लेख केलेला असला तर तो, वक्‍त्‌याच्या संदर्भासाठी असतो. वक्‍ता आपल्या भाषणाची तयारी करत असताना ती वचने पडताळून पाहू शकतो. त्या वचनांची पार्श्‍वभूमी काय आहे, भाषणातील एखाद्या मुद्याला ते वचन कसे आधार देते हे समजण्यासाठी ती वचने दिलेले असतात. त्यामुळे त्यांतील कोणती वचने श्रोत्यांना आपल्यासोबत वाचावयास लावावे हे वक्‍त्‌याने आधीच ठरवावे. तो इतर काही वचनांचा सारांश देऊ शकतो. श्रोत्यांनी बायबल उघडून ती वचने पाहण्याची गरज नाही.

भाषण देतेवेळी, वक्‍त्‌याने सरळ बायबल उघडून वचन वाचावे. कागदावर लिहून किंवा कंम्प्युटरवर छापून आणलेले वचन वाचू नये. वक्‍ता जेव्हा श्रोत्यांना एखादे वचन वाचावयास सांगतो तेव्हा त्याने बायबलच्या पुस्तकाचे नाव, अध्याय आणि वचन (वचने) सर्वांना समजेल अशारितीने स्पष्ट उच्चारावीत. वचन का वाचले जात आहे त्याबाबतीत काही प्रश्‍न असेल किंवा काही विवेचन असल्यास वक्‍त्‌याने थोडा वेळ थांबावे जेणेकरून श्रोत्यांना आपल्या बायबलमधून ते वचन काढायला वेळ मिळेल. बायबल पुस्तकाचा, अध्यायाचा आणि वचनाचा पुन्हा एकदा उल्लेख केल्यास श्रोत्यांना संदर्भ लक्षात राहील. अमुक वचन कोणत्या पानावर आहे हे सांगण्याची गरज नाही, कारण श्रोत्यांमधील सर्वांकडे असलेल्या बायबल आवृत्त्या वेगवेगळ्या असतात. भाषणादरम्यान श्रोत्यांना बायबलमधून वचन उघडण्यास सांगितल्याने त्यांना देवाच्या वचनांतील सामर्थ्याचा फायदा होऊ शकतो.—इब्री. ४:१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा