वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०० पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०००
आमची राज्य सेवा—२०००
km ९/०० पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता सप्टेंबर: लाईफ—हाऊ डिड इट गेट हियर? बाय एव्हल्यूशन ऑर बाय क्रिएशन? ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! चे अंक. पुनर्भेट करताना एखाद्या व्यक्‍तीला आस्था असल्याचे आढळल्यास वर्गणी करण्याचे प्रोत्साहन द्यावे. नोव्हेंबर: या महिन्यापासून किंग्डम न्यूज क्र. ३६ चे वितरण सुरू होईल. ज्या मंडळ्या त्यांच्या क्षेत्रांतील प्रत्येक घरात किंग्डम न्यूज क्र. ३६ देतात त्यांनी सोबत अपेक्षा माहितीपत्रक किंवा ज्ञान पुस्तकही द्यावे. लोकांजवळ आधीपासूनच यांपैकी एखादे प्रकाशन असल्यास अनंतकाळ जगा किंवा क्रिएशन पुस्तक तुम्ही देऊ शकता. डिसेंबर: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान आणि न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन.

▪ बहिष्कृत केलेल्या किंवा स्वतःहून मंडळीतून नाव कमी केलेल्या व्यक्‍तींना पुन्हा मंडळीत यायचे असेल तर वडील जन टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, १९९२, पृष्ठे १६-२१ वरील सूचना पाहू शकतात.

▪ मंडळीतील सर्वांनी, टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिकांच्या नवीन आणि पुन्हा हव्या असलेल्या तसेच स्वतःच्या व्यक्‍तिगत वर्गण्या मंडळीद्वारे पाठवाव्यात.

▪ सोसायटी प्रत्येक व्यक्‍तीच्या मागणीनुसार प्रकाशने अथवा छापील साहित्य पाठवत नाही. प्रिसायडिंग ओव्हरसियरने, संस्थेकडे साहित्य मागणी पाठवण्याआधी मंडळीत दर महिन्याला घोषणा करावी. यामुळे ज्यांना ज्यांना साहित्य हवे आहे ते, जो बांधव साहित्यांचे काम हाताळतो त्याला, हवी ती ऑर्डर देऊ शकतील. काही साहित्य खास विनंतीवरूनच मिळतील हेही कृपया लक्षात ठेवावे.

▪ मंडळीच्या प्रिसायडिंग ओव्हरसियरने किंवा त्याने नेमलेल्या एखाद्या बांधवाने सप्टेंबर १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.

▪ “देवाच्या वचनानुसार आचरण करणारे” हे प्रांतीय अधिवेशन या वर्षी लोणावळ्याऐवजी मुंबईला नोव्हेंबर ३-५, २००० या तारखांना होईल.

▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:

WT पब्लिकेशन्स इंडेक्स १९९९—इंग्रजी

▪ नवीन सीडी उपलब्ध:

सींग प्रेझेझ टू जेहोवा—(आठ सीडींचा संच) —इंग्रजी

▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

पे अटेन्शन टू डॅनिएल्स प्रॉफसी!—पंजाबी

देव आपल्याकडून काय अपेक्षितो?—सिंधी

भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!—मल्याळम, तामीळ

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा