वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ht अध्या. २८ पृ. ३८-४२
  • श्रोत्यांशी संपर्क व टिपणीचा उपयोग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • श्रोत्यांशी संपर्क व टिपणीचा उपयोग
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
  • मिळती जुळती माहिती
  • माहितीयुक्‍त साहित्य, स्पष्टपणे सादर केलेले
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२०००
  • तुमच्या श्रोत्यांची खात्री पटवा, त्यांच्याशी विवाद करा
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
  • उत्साह व उबदारपणा दाखवणे
    ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
अधिक माहिती पाहा
ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
ht अध्या. २८ पृ. ३८-४२

अभ्यास २८

श्रोत्यांशी संपर्क व टिपणीचा उपयोग

१. श्रोत्यांशी संपर्क ठेवण्याबद्दलच्या मोलासंबंधाने, तसेच याबाबतीत टिपणीचा उपयोग कोणती भूमिका करतो याचे स्पष्टीकरण द्या.

१ तुमचा श्रोत्यांशी चांगला संपर्क असणे हे शिक्षण देण्यामध्ये अधिक लाभदायक ठरते. ते त्यांचा आदर मिळवते, आणि तुम्हास अधिक कार्यक्षमपणे शिक्षण देण्यास साहाय्य करते. श्रोत्यांशी असणारा तुमचा संपर्क हा तुम्हाला त्यांच्या इतक्या जवळ नेण्यास हवा की, वक्‍ता या नात्याने तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया लगेच उमगली पाहिजे. श्रोत्यांबरोबर तुमचा असा संपर्क आहे की नाही हे ठरविण्यात टिपणीचा उपयोग अधिक महत्त्वाचा भाग पार पाडतो. भरपूर टिपणी अडथळा बनू शकतात; पण टिपणीचा चतुरपणे केला जाणारा वापर, ती परिस्थिती सांगते त्यानुसार जरुरीपेक्षा मोठ्या असल्या तरी ते विचलित करणारे ठरत नाही. याचे कारण असे की, कुशल वक्‍ता रुपरेषेकडे वारंवार किंवा चुकीच्या वेळी बघून आपल्या श्रोत्यांचा संपर्क तोडीत नाही. तुमच्या भाषण सल्ला पत्रकात याकडेच लक्ष देण्यात येते, व या गुणाला “श्रोत्यांशी संपर्क, टिपणीचा उपयोग,” असे संबोधण्यात आले आहे.

२-५. श्रोत्यांशी कशामुळे प्रभावी दृष्टी संपर्क ठेवता येतो?

२ श्रोत्यांशी दृष्टी संपर्क. दृष्टी संपर्क म्हणजे तुमच्या श्रोत्यांना बघणे. याचा अर्थ निव्वळ श्रोत्यांकडे पाहणे नव्हे तर, श्रोत्यांमधील विशिष्ट जनांकडे बघणे. याचा अर्थ, त्यांच्या चेहऱ्‍यावरील भाव न्याहाळणे आणि त्यानुरुप प्रतिक्रिया दाखवणे हा आहे.

३ तुमच्या श्रोत्यांना बघणे म्हणजे कोणाला बघायचे राहू नये म्हणून एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत आपली नजर अर्थशून्य रितीने फिरवणे नव्हे. श्रोत्यांमधील एकाकडे पाहा आणि त्याजशी एक किंवा दोन वाक्ये बोला. मग, दुसऱ्‍याकडे बघा व त्याच्याशी देखील एकदोन वाक्ये बोला. एकाकडे टक लावून पाहू नका की ज्यामुळे त्या माणसाला अवघडल्यासारखे वाटायला लागेल, तसेच सगळ्या श्रोतेजणात केवळ थोडक्यांशीच संपर्क ठेवू नका. सबंध श्रोतेजणाशी वर नमूद केल्याप्रमाणे संपर्क ठेवा, आणि एकाशी बोलत असता त्याजकडे खरेपणाने बोलून त्याच्या प्रतिक्रिया लक्षात घ्या व मग दुसऱ्‍याकडे वळा. तुमच्या टिपणी पोडियमवर किंवा तुमच्या हातात किंवा पवित्र शास्त्रात ठेवा की ज्यामुळे केवळ एक कटाक्ष टाकल्याने तुम्हाला त्याकडे लगेच पाहता येईल. तुमच्या टिपणीकडे बघण्यासाठी तुम्हाला आपले डोके वळवावे लागत असल्यास श्रोतेजणासोबतचा तुमचा संपर्क तुटेल.

४ तुमचा सल्लागार, तुम्ही टिपणीचा कितीदा वापर केला त्याकडेच नव्हे तर, तुम्ही केव्हा त्याजवर नजर टाकलीत त्याकडे देखील लक्ष देईल. विषयाचा कळस गाठत असताना तुम्ही तुमच्या टिपणीकडे पाहात राहिल्यास तुमच्या श्रोतेजणाच्या प्रतिक्रिया तुम्हाला कळणार नाहीत. तुम्ही सतत टिपणीचा परामर्श घेत राहिल्यास श्रोतेजणासोबत तुमचा संपर्क तुटेल. हे, एकतर अस्वस्थ स्थितीला किंवा भाषण सादर करण्याची अपूरी तयारी झाल्याचे सूचित करते.

५ कधी कधी अनुभवी वक्त्यांना हस्तलिखित प्रतींद्वारे संपूर्ण भाषण देण्याची नेमणूक असते व यावेळी अर्थातच, श्रोत्यांशी दृष्टी संपर्क सहसा मर्यादित बनतो. पण चांगली तयारी केल्यामुळे त्या साहित्याची त्यांना उत्तमप्रकारे ओळख झालेली असल्यास, आपल्या जागेवरुन न हलता श्रोत्यांकडे अधूनमधून पाहता येऊ शकते आणि हे प्रभावी वाचन करण्याला अधिक उत्तेजक ठरते.

६-९. श्रोत्यांशी संपर्क साधण्याचा आणखी एक मार्ग दर्शवा, आणि कोणते धोके टाळण्यास हवे तेही सांगा.

६ थेटपणे संबोधण्याद्वारे श्रोत्यांशी संपर्क. हे श्रोत्यांशी दृष्टी संपर्क ठेवण्याइतकेच महत्त्वाचे आहे. त्यात, तुम्ही श्रोत्यांना ज्या प्रकाराने संबोधता त्या शब्दांचा समावेश आहे.

७ एखाद्या व्यक्‍तीसोबत खाजगी रितीने बोलत असता तुम्ही त्याला थेटपणे “तुम्ही,” “तुमचे” किंवा “आपण,” “आमचे” अशा तऱ्‍हेने संबोधता. जेथे शक्य आहे तेथे मोठ्या सभागृहाला देखील तुम्ही असेच संबोधू शकता. तुमचे भाषण हे एकावेळी एकदोघांशी होणारे संभाषण आहे असा दृष्टिकोन ठेवा. तुम्ही त्यांचे जवळून निरीक्षण करा की, जणू ते तुमच्याशी बोलले होते असे समजून तुम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ शकता. यामुळे तुमच्या वक्‍तव्याचा उत्कृष्ट नमुना दिसून येईल.

८ तरी सावधानीचा एक इशारा. आपल्या श्रोत्यांशी अगदीच जवळीक साधण्याचा धोका टाळा. क्षेत्रसेवेमध्ये दारावरील व्यक्‍तीसोबत जसे सन्माननीय भाषण करता तसेच येथे देखील एकादोघांकडे पाहून बोलावे, त्यांच्याशी अगदीच सलगी राखण्याचे कारण नाही. तरीपण तुमचे बोलणे थेट स्वरुपाचे असावे.

९ आणखी एक धोका. तुम्ही ज्या पद्धतीने व्यक्‍तिगत संबोधन करता त्याबद्दल निर्णायक असले पाहिजे, त्यामुळे तुमच्या श्रोत्यांना अवघडल्यासारखे होता कामा नये. उदाहरणार्थ, गुन्हेगारीबद्दल तुम्ही भाषण देत असल्यास तुम्ही श्रोत्यांना असे संबोधणार नाही की, ज्यामुळे तेच गुन्हेगार असल्याचा तर्क केला जाईल. किंवा सेवा सभेत तुम्ही कमी तासांबद्दल चर्चा करत असल्यास भाषणात स्वतःला सामील करून सतत “तुम्ही” या सर्वनामापेक्षा “आपण” या अर्थी संबोधणे उचित ठरेल. अशा प्रकारचा धोका विचारशीलपणा व समंजसपणामुळे सहजपणे टाळता येऊ शकतो.

१०, ११. टिपणीचा वापर करण्याचे शिकून घेण्यासंबंधाने कशाने आम्हाला उत्तेजन देण्यास हवे?

१० टिपणीचा उपयोग. नवीन वक्‍ते टिपणीचा आधार घेऊन आरंभ करतात. बहुधा ते भाषण लिहून काढतात व मग एकतर ते वाचून दाखवतात किंवा आपल्या स्मरणातून सांगतात. तुमचा सल्लागार आरंभाला याकडे लक्ष देणार नाही, पण जेव्हा तुम्ही, भाषण सल्ला पत्रकातील “टिपणीचा उपयोग” या गुणाकडे येता तेव्हा ते तुम्हाला तुमच्या टिपणीमधून भाषण देण्याचे उत्तेजन देतील. तुम्ही यात प्रावीण्य मिळवल्यास, जाहीर वक्‍ता या नात्याने बरीच मोठी प्रगती साध्य केल्याचे तुम्हाला दिसेल.

११ वाचता न येणारी मुले व प्रौढ लोक देखील भाषणे देतात, कल्पना सुचवण्यासाठी ते दाखल्यांचा उपयोग करतात. तुम्ही देखील राज्य सेवा यात शास्त्रवचनांची जी सादरता सुचवण्यात आलेली आहे, त्यानुरुप साध्या टिपणीद्वारे आपल्या भाषणाची तयारी करू शकता. क्षेत्रसेवा करीत असता तुम्ही हस्तलिखित प्रत समोर न धरता नेहमी बोलत असता. हीच गोष्ट प्रशालेत देखील तुम्ही करू शकता, यासाठी तुमच्या मनाची आधी पक्की तयारी झाली पाहिजे.

१२, १३. टिपणी कशी तयार करावी याचे प्रस्ताव द्या.

१२ या गुणावर काम करण्याचा उद्देश, हस्तलिखित प्रत बनवण्याचे टाळण्याची मदत करावी हा असल्यामुळे, तयारी करताना व भाषण देताना तुम्ही तुमचे भाषण तोंडपाठ करू नये हे बरे. तसे केल्यास, या अभ्यासाचा हेतूच साध्य होणार नाही.

१३ तुम्ही शास्त्रवचनांचा उपयोग करता तेव्हा स्वतःला क्रियाविशेषणात्मक प्रश्‍न, कसे? कोण? केव्हा? कोठे? इत्यादी विचारा. मग, हे तुमच्या साहित्यामध्ये बसल्यावर हे प्रश्‍न तुमच्या टिपणीचा भाग म्हणून वापरा. भाषण देताना केवळ शास्त्रवचन वाचा व मग स्वतःला किंवा घरमालकाला योग्य आहे तेथे हे प्रश्‍न विचारा व त्यांचे उत्तर द्या. हे खूप सोपे असू शकते.

१४, १५. कोणत्या गोष्टीने आम्हाला निराश करता कामा नये?

१४ भाषणात आपण काहीतरी विसरु याची काळजी नवीन वक्त्यांना वाटत असते. तथापि, तुम्ही आपल्या भाषणाचा विकास तर्कशुद्ध पद्धतीने मांडला तर एखादा विचार तुमच्याकडून दुर्लक्षिला गेल्यास ते कोणाच्या लक्षातही येणार नाही. या पातळीवर, साहित्याचा उरक हा प्रमुख मुद्दा नाही. तर तुमच्या टिपणीवरुन भाषण कसे द्यावे हे शिकणे अधिक महत्त्वाचे आहे.

१५ हे भाषण देताना, आपण आधी शिकून घेतलेल्या बहुतेक गुणांना हरवून बसलो आहोत असे तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे. पण गोंधळून जाऊ नका. कारण, एकदा हस्तलिखित प्रतीमधून बोलण्याचे शिकून घेतले की, तुम्हाला पूर्वीचे सर्व गुण परतल्याचे आणि तुम्ही अधिक निष्णातपणे भाषण देत असल्याचे आढळेल.

१६, १७. टिपणी बनवताना आपण काय ध्यानात ठेवावे?

१६ सेवा प्रशालेत दिल्या जाणाऱ्‍या भाषणासाठी वापरण्यात येणाऱ्‍या टिपणीबद्दल थोडेसे. त्यांचा उपयोग, पाठ केलेल्या कल्पना म्हणून दाखवण्यासाठी नव्हे तर, त्या आठवून देण्यासाठी करावा. टिपणी त्रोटक असावी. ती नीट, व्यवस्थित आणि वाचता येण्याजोगी असावी. तुमच्या भाषणाची रचना पुनर्भेटीवर आधारलेली आहे तर तुमची टिपणी न दिसण्याजोगी, तुमच्या पवित्र शास्त्रात दडवलेली असावी. पण तेच तुमचे भाषण व्यासपीठावरील आहे आणि तुम्ही पोडियम वापरणार आहात तर मग, टिपणीबद्दल काही समस्या उद्‌भवण्यास नको. पण, तुम्हास खात्री नसल्यास, तशी तयारी करावी.

१७ आणखी एक मदत म्हणजे, तुमच्या टिपणीच्या वर भाषणाचे शीर्षक लिहावे. प्रमुख मुद्दे डोळ्यांना स्पष्ट दिसण्याजोगे लिहावेत. ते सर्व मोठ्या अक्षरात लिहा किंवा त्यांना अधोरेखीत करा.

१८, १९. टिपणीचा वापर करण्याचा सराव आम्हाला कसा करता येईल?

१८ तुम्ही भाषण देण्यासाठी कमी टिपणी वापरत आहात याचा अर्थ तुमच्या तयारीत काटछाट करावी हा नव्हे. पहिल्यांदा ते भाषण सविस्तरपणे लिहून काढा आणि पूर्ण स्वरुपाची टिपणी तुमच्या इच्छेप्रमाणे बनवा. मग, त्यावरुन दुसरी, त्रोटक टिपणी तयार करा. ही ती टिपणी आहे जिचा तुम्ही भाषण देताना उपयोग कराल.

१९ आता दोन्ही टिपणी तुमच्यापुढे ठेवा आणि संक्षिप्त टिपणीकडे बघून पहिल्या मुख्य मुद्यावर तुम्हाला जेवढे काही बोलता येईल तेवढे बोला. आता, सविस्तर टिपणीकडे नजर टाकून कोणत्या गोष्टी सांगावयाच्या राहून गेल्या ते बघा. पुढे संक्षिप्त टिपणीतील दुसऱ्‍या मुद्याकडे वळा आणि तसेच करा. काही काळातच तुम्हाला संक्षिप्त टिपणी इतकी पाठ होऊन जाईल की, तिजकडे नुसते बघून तुम्हाला सविस्तर टिपणीमध्ये असणाऱ्‍या सर्व गोष्टी सांगता येतील. सराव व अनुभवाद्वारे तुम्हाला आयत्या वेळेचे भाष्य करण्याचा लाभ कळून येईल आणि जरुरी आहे तेव्हाच तुम्ही तुमच्या हस्तलिखित प्रतीकडे वळाल. तुमच्या बोलण्याच्या वेळी तुम्हाला काळजीतून मुक्‍त झाल्यासारखे वाटायला लागेल आणि श्रोतेजण देखील मोठ्या आदराने तुमच्या भाषणाचे श्रवण करतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा