वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०० पृ. ८
  • तर्क करण्याची कला कशी विकसित करावी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तर्क करण्याची कला कशी विकसित करावी
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • “पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरु कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या, आणि चर्चेसाठी बायबल विषय या पुस्तिकांचा तुम्ही उपयोग करीत आहात का?”
    आमची राज्य सेवा—२००८
  • पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करा
    आमची राज्य सेवा—१९९१
  • प्रभावी प्रस्तावना
    आमची राज्य सेवा—१९९०
  • पुनर्भेटीमध्ये रिझनिंग पुस्तकाचा उपयोग करा
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km २/०० पृ. ८

तर्क करण्याची कला कशी विकसित करावी

१ “तर्क” या शब्दाचा अर्थ, “दुसऱ्‍याच्या आचारविचारावर प्रभाव पडेल अशाप्रकारे बोलणे” असा होतो. क्षेत्र सेवेत प्रभावी होण्याकरता लोकांशी तर्क करण्याची क्षमता आपल्याला विकसित करण्याची गरज आहे. (प्रे. कृत्ये १७:२-४) पण, उत्तम तर्कशक्‍ती आपल्याला कशी विकसित करत येईल?

२ प्रथम मनन करा: तुम्ही बायबलमधील सत्यांचा अभ्यास करता तेव्हा त्यावर विचार करणे लाभदायक ठरेल. एखादा विषय गहन असल्यास त्यावर संशोधन करा आणि मिळालेल्या माहितीवर मनन करा. दिलेल्या स्पष्टीकरणावर समाधान न मानता या स्पष्टीकरणाला बायबलमधील वचने कशाप्रकारे पुष्टी देतात हे देखील चांगल्याप्रकारे समजून घ्या.

३ सेवेसाठी तयारी करा: सेवेची तयारी करताना पुढील टप्पे विचारात घ्या. प्रथम, बायबलचे सत्य विभिन्‍न अभिरूची आणि विभिन्‍न पार्श्‍वभूमी असलेल्या लोकांना कशाप्रकारे समजावून सांगता येईल याचा विचार करा. मग, लोकांची आस्था वाढवण्यासाठी एखादा विचारप्रवर्तक प्रश्‍न विचारा. त्यानंतर, बायबलचा एखादा मुद्दा संभाषणाला जोडून त्यावर तर्कवितर्क कसा करता येईल याचा विचार करा. मग, क्षेत्रात लोक कोणते प्रश्‍न विचारतील याचा अंदाज बांधून त्यांवर कशी चर्चा करता येईल याचा पूर्वविचार करा. आणि शेवटी तुम्ही घरमालकाला जे प्रकाशन देणार आहात त्यातून संभाषणाशी संबंधित असलेला एखादा मुख्य मुद्दा निवडा आणि आपल्या संभाषणाला तो कसा जोडता येईल याचा विचार करा.

४ येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करा: शास्त्रवचनांच्या आधारावर लोकांशी तर्कवितर्क करण्यात येशू ख्रिस्ताशिवाय आणखीन कोणाचे उत्तम उदाहरण असू शकते! त्याने कशाप्रकारे लोकांना शिकवले याचे परीक्षण करण्यासाठी लूक १०:२५-३७ मधील अहवाल विचारात घ्या. उत्तम तर्क करण्यासाठी पुढील पद्धत विचारात घ्या: (१) लोकांनी विचारलेल्या प्रश्‍नांची त्यांना थेट बायबलमधून उत्तरे द्या. (२) आपले मनोगत व्यक्‍त करण्याचे त्यांना उत्तेजन द्या. ते अर्थपूर्ण उत्तरे देतात तेव्हा त्यांची प्रशंसा करा. (३) घरमालकाने विचारलेला प्रश्‍न आणि तुम्ही दाखवत असलेली शास्त्रवचने यांतील संबंध त्यांना स्पष्टपणे दाखवा. (४) एखादे व्यावहारिक उदाहरण द्या. त्यामुळे घरमालकाला त्याच्या प्रश्‍नाचे नेमके उत्तर मिळाले आहे याची तुम्हाला खात्री होईल.—पाहा मार्च १, १९८६, टेहळणी बुरूज, (इंग्रजी) पृष्ठे २७-८, परिच्छेद ८-१०.

५ आपल्यापाशी असलेल्या साधनांचा उपयोग करा: रिझनिंग फ्रॉम द स्क्रिप्चर्स पुस्तक खास क्षेत्र सेवेत वापरण्यासाठी प्रकाशित केलेले होते. त्यात सुचवलेल्या प्रस्तावना, संभाषणाला खीळ घालणाऱ्‍यांना द्यावयाची उत्तरे आणि युक्‍तिवाद करण्याचे मुद्दे आपली तर्कशक्‍ती विकसित करण्यास साहाय्यक ठरतात. रिझनिंग पुस्तक एक उपयुक्‍त साधन असून सेवेला जाताना नेहमी हे पुस्तक जवळ ठेवा. तसेच, बायबलविषयी लोकांशी चर्चा करताना त्याचा आवर्जून उपयोग करा. या पुस्तकाचा सर्वोत्तम उपयोग कसा करता येईल याची माहिती पुस्तकाच्या पृष्ठ ७-८ वर दिली आहे; त्याची उजळणी करा.

६ उत्तम तर्कशक्‍ती विकसित केल्यास प्रचाराच्या आणि शिक्षणाच्या कामात तुम्ही अधिक प्रवीण व्हाल. त्यामुळे तुम्हाला स्वतःला आणि क्षेत्रातील लोकांना देखील भरभरून आशीर्वाद मिळतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा