प्रश्न पेटी
◼ बहिष्कृत व्यक्तीचा मंडळीत पुन्हा स्वीकार करण्याची घोषणा केली जाते तेव्हा तिचे टाळ्या वाजवून स्वागत करणे उचित आहे का?
यहोवा परमेश्वर दयेचा आणि करुणेचा सागर असल्यामुळे पश्चात्तापी आत्मा दाखवणाऱ्या व्यक्तीला कृपापसंती दाखवण्यासाठी आणि ख्रिस्ती मंडळीत तिचा स्वीकार करण्यासाठी त्याने बायबल-आधारित तरतूद केली आहे. (स्तोत्र ५१:१२, १७) मनस्वी पश्चात्ताप करणाऱ्या अशा व्यक्तीला मंडळीत पुन्हा घेतले जाते तेव्हा तुम्ही अजूनही तिच्यावर प्रीती करता याची तिला खात्री करून देण्याचे उत्तेजन आपल्याला देण्यात येते.—२ करिंथ. २:६-८.
मंडळीमध्ये आपल्या एखाद्या नातेवाईकाचा किंवा जवळच्या व्यक्तीचा पुन्हा स्वीकार केल्याची घोषणा केली जाते तेव्हा अत्यानंद होणे साहजिक आहे. परंतु, अशा वेळी देखील शांत, सुसभ्य आत्मा दाखवला जावा. या संदर्भात ऑक्टोबर १, १९९८ च्या टेहळणी बुरूज मासिकात पृष्ठ १७ वर असे म्हटले आहे: “तथापि, आपण हे लक्षात ठेवण्यास हवे, की एखाद्या व्यक्तीला मंडळीतून काढले जाते किंवा तिला पुन्हा मंडळीत घेतले जाते त्याची विशिष्ट कारणे मंडळीतील पुष्कळांना माहीत नसतात. याशिवाय मंडळीत असेही लोक असतील ज्यांच्याविरुद्ध पश्चात्तापी व्यक्तीने अपराध केला असेल किंवा पुष्कळ काळापर्यंत मनात अढी राहील असे दुःख त्यांना दिले असेल. यास्तव, अशा प्रकरणांत दुसऱ्यांच्या भावनांची कदर करत असताना हे उचित आहे, की एखाद्याला मंडळीत पुन्हा घेतल्याची घोषणा केली जाते तेव्हा सर्वांच्यासमोर त्याचे स्वागत करण्याऐवजी आपण व्यक्तिगतरीत्या त्याला भेटू शकतो.”
थोडक्यात, सत्यापासून दूर गेलेली व्यक्ती पुन्हा सत्यात येते हे पाहून अतिशय आनंद होत असला तरी मंडळीत तिच्या पुनःस्वीकाराची घोषणा केली जाते तेव्हा तिचे टाळ्या वाजवून स्वागत करणे उचित ठरणार नाही.