वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९९ पृ. १
  • ‘नवा मनुष्य धारण करा’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘नवा मनुष्य धारण करा’
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • “प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला”
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • बाप्तिस्म्यानंतरही “नवीन व्यक्‍तिमत्त्व” विकसित करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • “जुनं व्यक्‍तिमत्व” काढून टाका!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • “देवाचे वचन सजीव व सतेज आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९९
km २/९९ पृ. १

‘नवा मनुष्य धारण करा’

१ आपल्याला सत्याची ओळख झाली आहे याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! जगीक लोकांच्या वहिवाटीची झळ आपल्याला लागू नये म्हणून आपण कशाप्रकारचे जीवन जगावे हे सत्याने आपल्याला शिकवले आहे. “देवाच्या जीवनाला पारखे” झाल्यामुळे या जगीक लोकांची “बुद्धी अंधकारमय झाली आहे.” (इफिस. ४:१८) आपल्याला मात्र जुना मनुष्य उतरवून नवा मनुष्य धारण करण्याद्वारे जगीक विचारसरणी पूर्णपणे बदलून टाकण्याचे शिक्षण सत्याने दिले आहे.—इफिस. ४:२२-२४.

२ जुन्या मनुष्यामुळे नैतिकतेचा सतत ऱ्‍हास होतो आणि सरतेशेवटी अशुद्ध होऊन मृत्यू ओढवतो. म्हणून राज्याचा संदेश ऐकणाऱ्‍यांना आपण क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा आणि शिवीगाळ या गोष्टी टाकून देण्याची कळकळीने विनंती करतो. आपण अंगावरचे मलिन वस्त्र उतरवून टाकतो अगदी त्याचप्रमाणे देवाची पसंती मिळवायची इच्छा राखणाऱ्‍यांनी दृढसंकल्प करून जुना मनुष्य पूर्णपणे उतरवून टाकला पाहिजे.—कलस्सै. ३:८, ९.

३ नवीन मनोवृत्ती: नवा मनुष्य धारण करणे यात नवीन मनोवृत्ती विकसित करणे देखील सामील आहे. (इफिस. ४:२३) योग्य दिशेने विचार करता यावा म्हणून नवीन मनोवृत्ती विकसित करण्यासाठी एखाद्या व्यक्‍तीला काय करावे लागेल? देवाच्या वचनाचा नियमित आणि मेहनती अभ्यास तसेच मननही. यामुळे त्या व्यक्‍तीची विचारसरणी बदलत जाते आणि मग ही व्यक्‍ती देव आणि ख्रिस्त यांच्या दृष्टिकोनातून विचार करू लागते. करुणा, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता आणि प्रीती यांसोबतच ख्रिस्ताचे इतर असंख्य गुण धारण केल्यामुळे त्या व्यक्‍तीचे जीवन अंतर्बाह्‍य बदलून जाते.—कलस्सै. ३:१०, १२-१४.

४ नवा मनुष्य धारण केल्यामुळे आपण जगापासून अलिप्त राहतो. आपली जीवनशैली, आपले जीवन आपला वेगळेपणा दाखवून देते. आपण खरे आणि इतरांची उभारणी होईल असेच बोलतो. आपण रागावर नियंत्रण ठेवतो आणि कडूपण, गलबला, निंदा आणि सर्व प्रकारचे दुष्टपण टाकून नीतिसंपन्‍न, ईश्‍वरी गुण विकसित करतो. क्षमाशील असण्यासाठी आपल्याकडून जी अपेक्षा केली जाते त्यापेक्षा अधिक आपण करतो. हे सर्व आपण स्वेच्छेने आणि मनापासून करतो.—इफिस. ४:२५-३२.

५ यहोवाने आपली सेवा स्वीकारावी असे आपल्याला वाटते तर धारण केलेला हा नवा मनुष्य आपण कधीच उतरवू नये. लोकांना सत्याकडे आणण्यासाठी आणि यहोवाचे गौरव करण्यासाठी या नव्या मनुष्याचा उपयोग करा कारण यहोवाच या आश्‍चर्यकारक, नवीन व्यक्‍तिमत्त्वाचा घडवणारा आहे.—इफिस. ४:२४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा