फेब्रुवारीसाठी सेवा सभा
फेब्रुवारी १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १५४ (१)
१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. सगळ्यांना आपला क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्या.
१७ मि: “सर्व वयोगटांतील लोकांना कौटुंबिक सौख्यानंद पुस्तक द्या.” दोन किंवा तीन कार्यक्षम प्रचारकांसोबत वडील याची चर्चा करतात. बायबलच्या सल्ल्याचे पालन करण्यातच कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य दडलेले आहे याची इतरांना जाणीव करून देण्यास मदत करण्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. (कौटुंबिक सौख्यानंद, पृष्ठे ९-१२ पाहा.) सुचवलेल्या प्रस्तावनेचे एखादे प्रात्यक्षिक दाखवा. पुनर्भेटीसाठी काळजीपूर्वक योजना कशी करावी ते दाखवा.
१८ मि: ‘नवा मनुष्य धारण करा.’ इफिसकर ४:२०-२४ चे विश्लेषण करणारे भाषण. (मार्च १, १९९३, टेहळणी बुरूज, पृष्ठे १४-१८, परिच्छेद ४-१७.) जुने व्यक्तिमत्त्व काढून आपण नवे व्यक्तिमत्त्व कसे धारण करतो याचे स्पष्टीकरण द्या.
गीत ४ (२) आणि समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी ८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १२ (९)
१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.
१५ मि: स्थानिक गरजा.
२० मि: “महान सृष्टीकर्ता आपली काळजी वाहतो!” प्रश्नोत्तरे. देवाच्या अस्तित्वावर शंका घेणाऱ्यांना किंवा देव अस्तित्वातच नाही असे मानणाऱ्यांना मदत करण्यासाठी निर्माणकर्ता पुस्तकाचा उपयोग कसा केला जाऊ शकतो याचे स्पष्टीकरण द्या. बायबल अभ्यास चालवण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग करायचा नसला तरी बायबल जे काही सांगते त्याचे परीक्षण करण्यास लोकांना प्रेरित करण्यासाठी एक प्रभावशाली साधन म्हणून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. (निर्माणकर्ता पुस्तक, पृष्ठे १८९-९१ पाहा.) या पुस्तकाबद्दल आपले वैयक्तिक मनोगत काय किंवा इतरांना हे पुस्तक देण्यात आलेले अनुभव प्रचारकांना विचारा.
गीत १७३ (२३) आणि समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी १५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ४० (५)
१० मि: स्थानिक घोषणा. ईश्वरशासित वृत्त.
१८ मि: ईश्वरशासित सेवा प्रशालेत नाव नोंदवल्याने आपल्याला काय फायदा होतो? प्रशाला पर्यवेक्षक श्रोत्यांसोबत चर्चा करतो. वक्तृत्व कौशल्याचे प्रशिक्षण देणे, केवळ हाच प्रशालेचा एकमेव उद्देश नाही. त्यापासून आपल्याला इतर मार्गांनीही फायदा होतो. (प्रशाला मार्गदर्शनपुस्तक, पृष्ठे १२-१३ पाहा.) इतरांशी दळणवळण कसे राखावे हे आपण शिकतो. कारण प्रशालेत आपल्याला सुस्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने बोलण्यास शिकवले जाते. आपल्या विश्वासांसंबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यात आणि बायबलवर आधारित आपले निर्णय स्पष्ट करण्यात आपण तरबेज बनतो. बायबलविषयीचे आपले ज्ञान वाढते आणि त्यामुळे परिणामकारकरित्या इतरांना साक्ष देण्यास आपल्याला मदत होते. आपण आपल्या चुका मान्य करण्यास आणि सल्ला स्वीकारण्यास शिकतो; आणि याचा परिणाम असा होतो, की आपण इतरांसोबत अधिक शांतीने व्यवहार करतो. प्रशालेत मिळणाऱ्या एकंदर प्रशिक्षणामुळे देवाचे सेवक या नात्याने “समर्थ” होण्यास आपल्याला मदत मिळते.—२ करिंथ. ३:५, ६.
१७ मि: “बायबल अभ्यासात—पूर्णार्थाने सहभाग घेण्यासाठी कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य.” एका कुटुंबाची चर्चा. कुटुंब या नात्याने बायबल वाचन करणे आणि अभ्यास करणे याविषयी मे १५, १९९६, टेहळणी बुरूज, पृष्ठे १४-१५ आणि जानेवारी १, १९९३, टेहळणी बुरूज, पृष्ठे २७-२८ मध्ये दिलेल्या उपयुक्त सूचना ते कशा लागू करत आहेत याचे ते विश्लेषण करतात.
गीत ५७ (९) आणि समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी २२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १७० (२१)
१० मि: स्थानिक घोषणा.
१५ मि: अपार्टमेंट्समध्ये साक्षीकार्य करताना. (तुमच्या क्षेत्रात कमी अपार्टमेंट्स असल्यास मे १९९५ ची आमची राज्य सेवा यातील “घरी नसलेल्यांची नोंद का ठेवावी?” या लेखाची चर्चा करा.) दोन किवा तीन प्रचारकांसोबत चर्चा. शहरांमध्ये, जिथे परवानगीशिवाय कुणालाही बिल्डिंग्समध्ये जाऊ न देण्याची वॉचमनला सक्त ताकीद दिली जाते तिथे अपार्टमेंट्समध्ये राहणाऱ्या लोकांना आपला संदेश पोहंचवण्यासाठी निरनिराळे मार्ग शोधा. बिल्डिंगच्या प्रेसिडेंटकडून किंवा सेक्रेटरीकडून मंडळी अधिकृत परवानगी मागू शकते. परवानगी दिल्यास अगदी सुव्यवस्थितपणे काही प्रचारक सर्व फ्लॅट्समध्ये कार्य करू शकतात. पण, परवानगी नसल्यास प्रत्येक टपाल पेटीत पत्रिका टाकण्यासाठी वॉचमन एखाददोन प्रचारकांना कदाचित आत सोडू शकेल. घरमालकांची नावे मिळाली तर टेलिफोनद्वारे साक्ष देण्यास मदत होऊ शकते. लोकांशी संपर्क साधणे शक्य नसते तेव्हा घरमालकांना पत्र लिहिले जाऊ शकते किंवा रस्त्यांवर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना साक्ष दिली जाऊ शकते. तुमच्या क्षेत्रात, अपार्टमेंट्समध्ये राहणाऱ्या लोकांशी संपर्क साधण्याकरता उपयोगात आणलेली आणि ज्याद्वारे उत्तम परिणाम साध्य झाले आहेत त्या पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखवा.
२० मि: शिष्य बनविण्याच्या कार्यात आनंद कसा मिळवावा. फेब्रुवारी १५, १९९६, टेहळणी बुरूज, पृष्ठे १९-२२ वर आधारित भाषण.
गीत ९१ (२१) आणि समाप्तीची प्रार्थना.