“प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला”
“सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.”—इफिसकर ४:२४.
१. यहोवाच्या उपासकांना कोणत्या प्रकारचा आशीर्वाद आहे? का?
यहोवा देव हा “ज्योतिमंडळाचा पिता” आहे, आणि “त्याच्याठायी मुळीच अंधार नाही.” (याकोब १:१७; १ योहान १:५) त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त याने स्वतःबद्दल म्हटलेः “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.” (योहान ८:१२) त्यामुळेच यहोवाचे खरे उपासक, त्याच्या पुत्राचे अनुयायी—मानसिकरित्या, नैतिकरित्या, आणि आध्यात्मिकरित्या ज्ञानाने तेजोमय—होण्याचा आशीर्वाद अनुभवत आहेत—आणि ते “जगात ज्योतीसारखे चकाकत” आहेत.—फिलिप्पैकर २:१५.
२. देवाचे लोक व जग यातील कोणता विरोधाभास भाकीत केला होता?
२ फार पूर्वी, यशया संदेष्टाला ही तफावत दाखविण्यास प्रेरित केले होते की: “पाहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे; पण तुजवर परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] उदय पावत आहे, त्याचे तेज तुजवर दिसत आहे.” वस्तुतः देवापासून पारखी झालेली सर्व मानवजात “काळोखातील जगाचा अधिपती” याच्या प्रभावाखाली व अधिपत्याखाली आली आहे असे म्हटले गेले आहे.—यशया ६०:२; इफिसकर ६:१२.
३. पौलाच्या समयोचित सल्ल्याबद्दल आम्ही गाढ आस्था राखण्याचे काय कारण आहे?
३ सहख्रिश्चनांनी अशाप्रकारच्या अंधकारापासून मुक्त असावे यासाठी प्रेषित पौलाला खूप काळजी वाटत होती. त्याने आर्जविले की “परराष्ट्रीय . . . चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये” तर “प्रकाशाच्या प्रजेसारखे चालावे.” (इफिसकर ४:१७; ५:८) ते यामध्ये कसे यशस्वी होऊ शकतील हे देखील त्याने स्पष्ट केले. आज, राष्ट्राला झाकून टाकलेला अंधकार व विषण्णता ही आणखी दाट बनत आहे. जग नैतिक व आध्यात्मिकतेत भिकेस लागले आहे व त्यात आणखी खोल रूतत चालले आहे. यहोवाच्या उपासकांना वाढत्या भीतिजनक युद्धास लढावे लागत आहे. यासाठीच, पौल जे काही सांगणार आहे त्यात आम्ही अत्यंत आस्थेवाईक आहोत.
ख्रिस्ताविषयी शिकणे
४. “तुम्ही अशाप्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही” असे जेव्हा पौल म्हणाला तेव्हा त्याच्या मनात काय होते?
४ जगाच्या अशुद्धतेसंबंधी व निष्फळ ध्येयांविषयीचे वर्णन केल्यानंतर, प्रेषित पौलाने त्याचे लक्ष पुन्हा इफिस येथील सहख्रिश्चनांकडे वळवले. (कृपया इफिसकर ४:२०, २१ वाचा.) त्या शहरामध्ये प्रचार करण्याचे व शिक्षण देण्याचे काम करीत पौलाने जवळजवळ तीन वर्षे घालविली होती, त्यामुळे मंडळीतील अनेकांबाबत त्याला व्यक्तिगतरित्या माहिती असावी. (प्रे. कृत्ये २०:३१-३५) या कारणामुळे, जेव्हा त्याने म्हटले की, “तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही,” तेव्हा त्याला असलेल्या माहितीच्या आधाराने त्याने म्हटले की, इफिस येथील ख्रिश्चनांना १७ ते १९ वचनात त्याने सांगितलेल्या असभ्य वर्तनाला मुभा देणाऱ्या सत्याच्या कसल्याही विपर्यस्त गोष्टींना शिकविण्यात आलेले नव्हते. त्यांना अचूकतेने व योग्य पद्धतीने येशू ख्रिस्ताच्या उदाहरणाद्वारे खऱ्या ख्रिश्चनांच्या जीवनमार्गाची शिकवण देण्यात आली होती हे त्याला माहीत होते. याकारणास्तव, ते येथून पुढे परराष्ट्रीय चालतात त्याप्रमाणे अंधारातून चालत नव्हते, तर ते प्रकाशाची प्रजा असे होते.
५. केवळ वरकरणी सत्यात असणे व सत्य आपणात असणे यात कोणता फरक आहे?
५ यास्तव, योग्य रीतीने “ख्रिस्ताविषयी शिकणे” हे केवढ्या महत्त्वाचे आहे बरे! याचा अर्थ ख्रिस्ताविषयी शिकण्याचे चुकीचे मार्ग देखील आहेत असा आहे का? खरे म्हणजे, होय. अगोदरच इफिसकर ४:१४ मध्ये पौलाने बांधवांना याप्रकारे सावध केलेः “आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिकवणरुपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.” खात्रीने असे काहीजण होते ज्यांनी ख्रिस्ताविषयी शिकून घेतले पण अजूनही ते जगाच्या मार्गाप्रमाणे चालत होते आणि इतरांनाही तसे करण्याकरता त्यांचे मन वळवित होते. याद्वारे, सत्य आम्हामध्ये खरेच असण्याऐवजी काही म्हणतात त्याप्रमाणे केवळ सत्यामध्ये आहोत असे म्हणण्यात आपल्याला धोका दिसत नाही का? पौलाच्या दिवसात जे वरकरणी समज बाळगून होते ते इतरांच्या प्रभावाने लगेच व सहजपणे वाहवत जात असत आणि हे आजही खरे आहे. असे होऊ नये यासाठी, ‘येशूच्याठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये शिक्षण’ मिळविण्याची इफिसकरांना गरज होती असे पौलाने सांगितले.—इफिसकर ४:२१.
६. आपण आज ख्रिस्तापासून कसे शिकू, ऐकू व शिक्षण घेऊ शकतो?
६ “शिकणे,” “ऐकणे” व “शिक्षण घेणे” ह्या वाक्यप्रयोगाचा पौलाने उपयोग केला त्याद्वारे शाळेमध्ये अभ्यास व बोध, याचा उपक्रम जसा राबविला जातो त्याला सूचित करते. अर्थात, आज आपण थेटपणे स्वतः येशूकडून ऐकत, शिकत अथवा शिक्षण घेत नाही, पण तो आपल्या “विश्वासू व बुद्धिमान दासां”द्वारे सबंध जगभरात पवित्र शास्त्र अभ्यासाची मोहीम चालवत आहे. (मत्तय २४:४५-४७; २८:१९, २०) दास वर्गामार्फत वेळेवर पुरविले जाणारे आध्यात्मिक अन्न आपण नियमितपणे घेतो व व्यक्तिगतरित्या अथवा मंडळीमध्ये परिश्रमी अभ्यास, त्यावर मनन करतो आणि जे काही शिकतो ते आचरणात आणतो तेव्हाच योग्यपणे व अचूकपणे “ख्रिस्ताविषयी शिकतो” असे म्हणता येईल. यास्तव, आपण सर्व तरतुदींचा पूर्ण उपयोग करण्याची खात्री बाळगू या, जेणेकरून आम्ही खरेपणाने म्हणू शकू की आम्ही “त्याचे ऐकले व त्याप्रमाणे त्याच्यामध्ये शिक्षण मिळालेले आहोत.”
७. “येशूच्या ठायी सत्य आहे” या पौलाच्या शब्दात कोणता अर्थ सूचित होतो?
७ शिक्षणाच्या कार्यपद्धतीवर जोर दिल्यानंतर, इफिसकर ४:२१ मध्ये पौल पुढे जे सांगतो ते लक्षवेधी आहे. तो म्हणतोः “येशूच्या ठायी जे सत्य आहे.” पौलाने येशूचे वैयक्तिक नाव त्याच्या स्वतःच्या लिखाणात खूप दुर्मिळ वापरले आहे या वस्तुस्थितीकडे काही पवित्र शास्त्र भाष्यकर्ते लक्ष वेधवतात. खरे म्हणजे, इफिसकरास पत्र लिहिताना या एकाच ठिकाणी तसा वापर प्रथम केला आहे. याला येथे काही खास अर्थ आहे का? कदाचित येशूने एक मनुष्य या नात्याने जे उदाहरण घालून दिले त्याकडे पौल लक्ष वेधवीत असेल. येशूने एकदा स्वतःविषयी जे सांगितले होते ते आठवाः “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे.” (योहान १४:६; कलस्सैकर २:३) येशू म्हणालाः “मीच . . . सत्य आहे,” कारण तो ते केवळ बोलत व शिकवत नव्हता तर त्याप्रमाणे राहात होता व त्याचा मूर्तिमंत नमुना होता. होय, खरे ख्रिश्चनत्व ही केवळ कल्पना नाही तर जीवनाचा मार्ग आहे. “ख्रिस्ताविषयी शिकणे” यामध्ये सत्याने जगण्यास त्याचे अनुकरण करावयास शिकणे याचा समावेश आहे. येशूचा नमुना तुम्ही तुमच्या जीवनात अनुसरता का? तुम्ही त्याच्या पावलाचे दररोज जवळून अनुकरण करता का? केवळ असे केल्यानेच आपण प्रकाशाची प्रजा या नात्याने चालू शकतो.
“जुना मनुष्याचा त्याग”
८. इफिसकर ४:२२, २४ मध्ये पौलाने कोणते उदाहरण वापरले आहे, आणि ते यथायोग्य का आहे?
८ “ख्रिस्ताविषयी शिकण्यात” व प्रकाशाची प्रजा या नात्याने चालण्यात आम्ही कसे यशस्वी होऊ शकतो हे दाखविताना, पौल पुढे इफिसकर ४:२२-२४ सांगतो, की तीन वेगवेगळ्या पायऱ्या आहेत ज्याला आम्ही अनुसरावे. यातील पहिली ही आहे की: “तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे.” (इफिसकर ४:२२) “त्याग करणे” (“काढून टाकणे” किंगडम् इंटरलिनीयर) आणि “धारण करणे” (वचन २४) हे वाक्यप्रयोग एखादे वस्त्र घालणे व काढणे असे चित्र मनासमोर उभे करते. हे एक रूपक आहे ज्याचा उपयोग पौलाने वारंवार केला आहे, आणि हे प्रभावी आहे. (रोमकर १३:१२, १४; इफिसकर ६:११-१७; कलस्सैकर ३:८-१२; १ थेस्सलनीकर ५:८) जेवणाच्या वेळेस किंवा कशाने तरी आमचे कपडे डागाळले अथवा धूळीने माखले तर आपण ते संधी मिळताच प्रथम बदलतो. तर मग अशाप्रकारे, आमच्या आध्यात्मिक स्थितीला मळण्यापासून दूर राखण्याची आम्ही काळजी बाळगणार नाही का?
९. कोणी एखादी व्यक्ती जुने मनुष्यत्व कसे त्यागू शकते?
९ मग, एखादा, जुन्या मनुष्यपणाचा कसा त्याग करु शकतो? “त्याग करणे” हे क्रियापद मूळ भाषेत सामान्य भूतकाळात आहे. ते, क्रिया केवळ एकदाच किंवा कायम स्वरुपाने घडते असे दाखविते. हे आम्हास सांगते की “जुने मनुष्यपण” (“जुना मनुष्य,” किंगडम इंटरलिनियर) त्याच्या “पूर्वीच्या आचरणासोबत” निश्चित, निर्णायक व पक्क्या रितीने आणि पूर्णपणे लागले गेले पाहिजे. ही अशी गोष्ट नाही की, जिला आपण यशस्वीपणे टाळू शकतो व तिला पुढे ढकलू शकतो. का नाही बरे?
१०. जुने मनुष्यत्व काढून टाकण्यात एखाद्याला दृढनिश्चयी व निर्णायक का असावयास हवे?
१० “त्यांचा नाश होत आहे” हा वाक्यप्रयोग हे दाखवितो की “जुना मनुष्य” ह्यात नैतिक अधःपतनाची कृती नियमितरित्या व झपाट्याने होणारी आहे जी वाईटाकडून अधिक दुष्टतेकडे जाते. वास्तविक पाहता, आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रकाशाला झिडकारल्यामुळे मानवजात ही चक्रव्यूहात सापडली आहे. पौल म्हणतो त्याप्रमाणे “कपटाच्या वासनां”चा हा परिणाम आहे. शारीरिक वासना या फसविणाऱ्या आहेत कारण त्या प्रथम निरुपद्रवी दिसतात पण सरतेशेवटी त्या घातक बनतात. (इब्रीकर ३:१३) सावधगिरी बाळगली नाही तर शेवटी अशुद्धता व मृत्यू ओढवतो. (रोमकर ६:२१; ८:१३) याच कारणास्तव जसे जुने कपडे काढून फेकून दिले जातात त्याचप्रमाणे जुने मनुष्यपण संपूर्णपणे, अगदी निर्णायकपणे काढून टाकावे.
नवी “मनोवृत्ती”
११. आध्यात्मिक नूतनीकरणाची सुरवात कोठून होण्यास हवी?
११ एखादी व्यक्ती चिखलाच्या डबक्यातून बाहेर येते तेव्हा केवळ तिचे कपडेच बदलून चालणार नाही तर दुसरे चांगले व स्वच्छ कपडे घालण्यापूर्वी अंघोळ करुन स्वतःस स्वच्छ करावे लागेल. आध्यात्मिकतेत प्रज्वलित होण्यासाठीचे दुसरे पाऊल सांगताना नेमकी हीच गोष्ट पौल पुढे मांडतो की: “तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे.” (इफिसकर ४:२३) सतरा आणि अठरा वचनात आधीच दाखवून दिल्याप्रमाणे, परराष्ट्रीय “त्यांच्या भ्रष्ट मनाने चालत आहेत” आणि त्यांची “बुद्धी अंधकारमय झाली” आहे. तर्कशुद्धतेत पाहता, मन हे आकलन व समज याचे केंद्रस्थान आहे जेथे नुतनीकरण सुरु झाले पाहिजे. हे कसे करता येईल? पौल याचे स्पष्टीकरण देतो की आपल्या मनाच्या कार्यप्रवण शक्तीने हे होते. ही शक्ती कोणती आहे?
१२. मनाला प्रवृत्त करणारी शक्ती कोणती?
१२ पौलाने जिचा संदर्भ दिला आहे ती, आपल्या मनावर कार्य करणारी शक्ती पवित्र आत्मा आहे का? नाही. “मनाला प्रवृत्त करणारी शक्ती” न्यू.व. हा वाक्यांश अक्षरशः असा वाचला जातोः “तुमच्या मनाची शक्ती.” देवाचा पवित्र आत्मा हा मानवामध्ये किंवा मानवाच्या आत कोणत्यातरी भागात असतो असे पवित्र शास्त्रात कोठेही सांगितलेले नाही. “आत्मा” याचा मुलभूत अर्थ “श्वासोच्छ्वास” असा आहे, पण पवित्र शास्त्रात आणखी काही ठिकाणी “ती शक्ती त्या व्यक्तीस वागणूक, प्रवृत्ती, स्वभाव किंवा भावना, किंवा एखादी कृती अथवा हालचाल करावयास लावणारी असते,” अशा अर्थाने वापरलेली आहे. (इन्साइट ऑन द स्क्रिस्पचर्स, खंड २रा, १०२६) यास्तव “मनाची वृत्ती” म्हणजे मनाला, स्वतःचा कल व रोख यांना कृती करावयास लावणारी शक्ती.
१३. आपला मानसिक कल नवीन का बनविण्यास हवा?
१३ अपूर्ण मनाचा नैसर्गिक कल व रोख हा वैषयीक, शारीरिक आणि भौतिक गोष्टींकडे असतो. (उपदेशक ७:२०; १ करिंथकर २:१४; कलस्सैकर १:२१; २:१८) एखाद्या व्यक्तीने त्याच्या वाईट वर्तणूकीसह जुने मनुष्यत्त्व काढून टाकले तरी त्याने जे पूर्णपणे सोडून दिले आहे तेच, लगेच अथवा काही कालावधीनंतर, परत करण्यास त्याचा पापी मानसिक कल, त्याला भाग पाडू शकेल. हीच गोष्ट पुष्कळांनी, उदाहरणार्थ, धुम्रपान, अतिमद्यपान किंवा इतर वाईट वागणूकीस सोडून देण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबाबतीत अनुभवास आली नाही का? जर त्यांनी त्यांच्या मनाला प्रवृत्त करणाऱ्या शक्तीला नवीन बनविण्याचा प्रयत्न केला नाही तर उलटून होणाऱ्या परिणामाला ते टाळू शकणार नाहीत. मनाचे पूर्णप्रकाराने रुपांतर घडवणे यातच खरे परिवर्तन समाविष्ट आहे.—रोमकर १२:२.
१४. मनाला प्रवृत्त करणाऱ्या शक्तीला कसे नवे बनविता येते?
१४ तर मग, कोणी एखादा ही शक्ती नवी बनवून त्याच्या मनाला योग्य दिशेने जाण्यास कसे प्रवृत्त करु शकतो? “नवे केले जावे” हे क्रियापद ग्रीकमध्ये वर्तमान काळात, म्हणजे सलग क्रियेला दर्शवण्यासाठी वापरण्यात आले आहे. म्हणजेच, देवाच्या सत्य वचनाचा नियमित अभ्यास आणि मनन याचाच अर्थ कार्य करणाऱ्या शक्तीला नवे बनविणे होय. शास्त्रज्ञ सांगतात की आपल्या मेंदूमध्ये, सांकेतिक विद्युत किंवा रासायनिक संदेशाच्या रुपाने माहिती एका मज्जातंतूतून दुसऱ्या मज्जातंतुत अनेक जोड ओलांडत प्रवास करते ज्याला सायनाप्सेस म्हणतात. द ब्रेन पुस्तक म्हणतेः “सांकेतिक संदेश येऊन गेल्यानंतर काही छाप मागे राहते ज्याद्वारे काही आठवणी सायनाप्सेस मज्जातंतुमध्ये निर्माण होतात.” जेव्हा तीच सूचना पुढील वेळी पाठविली जाते तेव्हा मज्जातंतुतील पेशी ते ओळखतात आणि जलद प्रतिसाद देतात. यामुळे काही काळात त्या वैयक्तिकात विचारांची नवीन शैली निर्माण होते. जसजसे आम्ही उभारणीकारक आध्यात्मिक माहिती घेत राहतो, तसतसे विचारांचा नवीन नमुना तयार होतो आणि आमच्या मनाला प्रवृत्त करणारी शक्ती नवी बनते.—फिलिप्पैकर ४:८.
“नवा मनुष्य धारण करणे”
१५. कोणत्या अर्थाने नवे मनुष्यत्व नवे बनते?
१५ शेवटी, पौल म्हणतोः “[तुम्ही] सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.” (इफिसकर ४:२४) होय, ख्रिश्चनांनी नवीन मनुष्यत्व धारण करावयास हवे. “नवे” याचा येथे संदर्भ वेळेसोबत नव्हे तर गुणासोबत आहे. म्हणजेच, ही अलीकडील नवीन आवृत्ती, अशा आशयाचे ते नवीनपण नाही. तर हे संपूर्ण नवीन, टवटवीत व्यक्तिमत्त्व, “देव सदृश्य” असे निर्माण केलेले आहे. कलस्सैकर ३:१० मध्ये पौलाने हीच भाषा उपयोगात आणली व म्हटले की “ज्याने निर्माण केले त्याच्याशी सदृश्य अशा प्रतिरुपात बनविण्यात आले.” मग हे नवे व्यक्तीमत्त्व कसे येते?
१६. नवीन मनुष्यत्व “देव सदृश्य” आहे असे का म्हटले जाऊ शकते?
१६ यहोवा देवाने पहिल्या मानवी जोडप्याला, आदाम व हव्वेला, त्याच्या प्रतिरुपाचे व सदृश्य असे निर्माण केले. त्यांना नैतिक व आध्यात्मिक गुण बहाल केले होते ज्यामुळे ते प्राण्यांच्या निर्मितीपासून वेगळे व उच्च स्थराचे राहू शकत होते. (उत्पत्ति १:२६, २७) जरी त्यांच्या बंडाळीद्वारे सर्व मानवजातीने पाप व अपूर्णत्वात बुडी घेतली तरी आपण, आदामाचे वंशज या नात्याने अजूनही नैतिक व आध्यात्मिक गुणांना प्रदर्शित करण्याच्या कुवतीचे आहोत. देवाची ही इच्छा आहे की जे कोणी खंडणी यज्ञार्पणावर विश्वास ठेवतात त्यांनी जुन्या मनूष्यापासून दूर राहावे, व “देवाच्या लेकरांची गौरवी मुक्तता” याचा आनंद घ्यावा.—रोमकर ६:६; ८:१९-२१; गलतीकर ५:१, २४.
१७. नवीन मनुष्यत्वाचे धार्मिकता व निष्ठा हे विशेष गुण का आहेत?
१७ नवीन व्यक्तिमत्त्वाच्या स्वाभाविक वैशिष्ट्यात खरी धार्मिकता व निष्ठा या दोन गुणांना पौलाने इतरांपासून वेगळे केले आहे. हे पुढे, नवीन व्यक्तिमत्त्व ज्याने निर्माण केले त्याच्या सदृश्य असले पाहिजे यावर ह्यावर जोर देते. स्तोत्रसंहिता १४५:१७ आम्हास सांगतेः “परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे.” आणि प्रकटीकरण १६:५ यहोवाबद्दल म्हणतेः “‘जो’ तू आहेस व होतास ‘जो तू पवित्र [“निष्ठावंत,” न्यू.व.] आहेस’ तू ‘न्यायी’ [“नीतीमान,” न्यू.व.] आहेस.” खरेच, जर आम्ही देवाच्या प्रतिरुपाचे निर्मिल्याप्रमाणे, त्याचे गौरव प्रदर्शित करणारे असे जगू इच्छितो तर धार्मिकता व निष्ठा ह्या मूलभूत गुणांची आवश्यकता आहे. जखऱ्या, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा पिता याच्या सारखे आपण असावे, ज्याला पवित्र आत्म्याने देवाची स्तुती करण्यास व त्याच्या लोकांना याची खात्री देण्यास प्रवृत्त केले की, त्यांनी “पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे करावी.”—लूक १:७४, ७५.
“प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला”
१८. जगाचे मार्ग खरेपणाने कसे आहेत हे समजण्यास पौल आमची कशी मदत करतो?
१८ इफिसकर ४:१७-२४मधील पौलाच्या शब्दांचा सविस्तर अभ्यास केल्यावर, आम्हास विचार करण्यासारखे पुष्कळ आहे. १७ ते १९ वचनात जगाचे मार्ग खरेच कसे आहेत हे पाहण्यास पौल आमची मदत करतो. देवाच्या ज्ञानाला धिक्कारुन व त्याच्या विरुद्ध आपली अंतःकरणे कठीण करण्यामुळे, जे अजूनही या जगात आहेत त्यांनी जीवनाच्या खऱ्या उगमापासून स्वतःला दूर करून घेतले आहे. यास्तव, खरा उद्देश किंवा मार्गदर्शन नसल्यामुळे, त्यांचे प्रयत्न मुर्खतेचे व निष्फळ बनत आहेत. नैतिक आणि आध्यात्मिक अधःपतनात ते खोल बुडत आहेत. केवढी ही करुणामय स्थिती! आणि त्यासोबतच प्रकाशाची प्रजा या नात्याने चालण्याचे निश्चित करण्यास आम्हाकरता किती जोरदार कारण!
१९. प्रकाशाची प्रजा या नात्याने चालावयास शेवटी पौलाकडून आम्हास कोणते प्रोत्साहन मिळते?
१९ त्यानंतर, २० व २१ वचनात पौल सत्य शिकण्याच्या गंभीर निश्चयाच्या महत्त्वावर जोर देतो, ज्यामुळे आपण केवळ सत्यासोबत सहवास राखणारेच नव्हे तर येशूप्रमाणे जीवन जगणारे असू. शेवटी, २२ ते २४ वचनात तो आम्हास जुने मनुष्यत्व काढून टाकण्यास व निर्णायात्मकपणे, दृढनिश्चयाने नवीन मनुष्यत्व धारण करावयास बजावतो. दरम्यान आम्ही आमची मानसिक प्रवृत्ती संपूर्णपणे आध्यात्मिक दिशेने मार्गी लावली पाहिजे. या सर्वावरुन, प्रकाशाची प्रजा या नात्याने चालत असता आपण यहोवाकडे मदतीकरता पाहू या. “‘कारण अंधारातून उजेड प्रकाशित होईल’ असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.”—२ करिंथकर ४:६.
तुम्हास आठवते का?
▫ आम्ही आज “ख्रिस्ताविषयी” कसे शिकू शकतो?
▫ जुन्या मनुष्यपणाला निर्णायकपणे का त्यागले पाहिजे?
▫ मनाला प्रवृत्त करणारी शक्ती कोणती, आणि ती नवी कशी बनविता येते?
▫ कोणते गुण नवीन मनुष्यास चिन्हांकीत करतात?
[चित्र]
येशूने म्हटलेः “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे”
[चित्र]
“जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसह काढून टाका”—क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे व लबाडी.—कलस्सैकर ३:८, ९
[चित्र]
“नीतिमत्त्व व पवित्रता [“निष्ठावंतपणा,” न्यू.व.] ह्यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.”—इफिसकर ४:२४.