नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम
जानेवारी, १९९९ पासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय विभागीय संमेलन कार्यक्रमाचा विषय, ‘देवाच्या आज्ञा पाळा व जिवंत राहा’ असा आहे. (नीति. ४:४; पं.र.भा.) देवाच्या आज्ञा पाळणे एखाद्या ओझ्यासारखे का नाही यावर हा कार्यक्रम भर देईल. याशिवाय, देवाच्या इच्छेप्रमाणे केल्याने कशाप्रकारे तजेला, खरा आनंद व भविष्यासाठी एक आशा लाभते हे देखील हा कार्यक्रम दाखवून देईल.—मत्त. ११:२८-३०; योहा. १३:१७.
जे कोणी ख्रिस्ताच्या आज्ञेचे पालन करून या संमेलनात बाप्तिस्मा घेऊ इच्छितात त्यांनी अध्यक्षीय पर्यवेक्षकांना याची माहिती द्यावी जेणेकरून ते आवश्यक त्या व्यवस्था करतील.—मत्त. २८:१९, २०.
देवावर व आपल्या बांधवांवर प्रीती व्यक्त करण्याचे व्यावहारिक मार्ग एका परिसंवादातून सांगितले जातील. (योहा. १३:३४, ३५; १ योहा. ५:३) स्तोत्र १९ व ११९ यांतून हृदयाचा ठाव घेणारे मार्गदर्शक मुद्दे सांगण्यात येतील. या स्तोत्रांत दिलेला प्रेरित सल्ला, हजारो वर्षांपूर्वी लिहिलेला असला तरीही तो आजही आपल्याला व्यक्तिशः कसा लागू होतो ते आपण पाहणार आहोत.
प्रांतीय पर्यवेक्षकांच्या भाषणाचा विषय, ‘देवाचे भय धरा व त्याच्या आज्ञा पाळा’ असा असेल. (उप. १२:१३) तरुण लोक आपले सद्य जीवन सर्वोत्तम प्रकारे कसे जगू शकतात व एका सार्वकालिक भवितव्याची खात्री का बाळगू शकतात, हा विषय विभागीय पर्यवेक्षकांच्या शेवटच्या भाषणात हाताळला जाईल. प्रीतीच्या ‘राजमान्य नियमानुसार’ आपले जीवन व्यतीत केल्याने निष्पन्न होणारे अनेक लाभ सांगून प्रांतीय पर्यवेक्षक कार्यक्रमाचा समारोप करतील. (याको. २:८) खरेच, आपल्यापैकी कोणीही हा संमेलन कार्यक्रम चुकवू इच्छिणार नाही!