वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९८ पृ. ७
  • वीस हजार!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वीस हजार!
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • ऑगस्ट महिना एक खास महिना ठरेल का?
    आमची राज्य सेवा—१९९८
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९३
  • ऐतिहासिक कामगिरीचा ऑगस्ट महिना! एका नवीन पत्रिकेचे संपूर्ण जगभरात वाटप
    आमची राज्य सेवा—२०१४
  • एप्रिल २०००—आपल्यासाठी आजवरचा खास महिना ठरो
    आमची राज्य सेवा—२०००
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km ७/९८ पृ. ७

वीस हजार!

सेवा वर्षाच्या अखेरीस भारतात, अहवाल देणाऱ्‍या प्रचारकांची संख्या इतकी वाढावी अशी आमची इच्छा आहे. ही संख्या गाठणे आपल्याला शक्य होईल का? निश्‍चितच! भारतातल्या मंडळ्यांतील प्रचारकांची गणना केल्यानंतर असे आढळले, की ऑगस्ट १९९७ च्या अखेरीस आपल्याकडे एकूण १८,७८१ प्रचारक होते. तथापि, १७,५३४ ही तेव्हापर्यंत सर्वोच्च संख्या होती. याचा अर्थ, मागील सेवा वर्षातील कुठल्याही एका महिन्यात चक्क १,२४७ प्रचारक अनियमित प्रचारक होते! विभागीय पर्यवेक्षकांचे अहवाल दाखवून देतात, की अनेक मंडळ्यांमध्ये काही लोक अहवाल देण्यात सलगपणे अनियमित आहेत. प्रत्येक प्रचारकाने पावसाळ्याच्या महिन्यांत सेवेत सहभागी होण्याच्या निश्‍चित योजना आखल्या व तत्परतेने त्या कार्याचा अहवाल दिला तर आपण निश्‍चितपणे २०,००० ची संख्या ओलांडू. महिन्याच्या आरंभीच सुरवात केल्यास आपण साक्षीकार्यात निश्‍चितच काही वेळ खर्च करू शकू. मंडळीच्या पुस्तक अभ्यास संचालकाने आपल्या गटातील कोणत्याही अनियमित प्रचारकाची मदत करण्यास प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. यापूर्वीच्या महिन्यांत तुम्ही एक नियमित प्रचारक नसल्यास तुमच्या पुस्तक अभ्यास संचालकाची मदत घेण्याचे प्रोत्साहन आम्ही तुम्हाला देत आहोत, जेणेकरून तुमच्यासोबत कार्य करण्यासाठी ते एखाद्या जोडीदाराची व्यवस्था करतील. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास, भारतात पहिल्यांदाच २०,००० ची संख्या ओलांडणारा प्रचारकांचा एक नवीन विक्रमी उच्चांक आपण पाहू शकतो. यहोवाचा किती जोरदारपणे जयजयकार होईल!—स्तोत्र ४७:१.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा