वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९६ पृ. ७
  • नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९८
  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९३
  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९५
  • नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९६
km ११/९६ पृ. ७

नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम

१ फेब्रुवारी १९९७ पासून सुरू होणारा नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम, “देण्यातील जास्त धन्यता अनुभवा” हा विषय विकसित करील. (प्रे. कृत्ये २०:३५) धन्यतेचे वर्णन, “सुगती आणि तृप्ती” असे करण्यात आले आहे. अनेक लोक, जीवनातून जे काही थोडेफार सूख मिळू शकते ते अधाशीपणे प्राप्त करत असतात परंतु, हे सुख प्राप्त झाल्यानंतर ते अगदी क्षणभंगुर असते. ही खरी धन्यता नव्हे. तरीसुद्धा, आपण अखंड फायदा कसा मिळवू शकतो हे यहोवा आपल्याला शिकवतो. (यश. ४८:१७; १ योहा. २:१७) आध्यात्मिकरित्या देण्याने आपण जास्त धन्यता कशी मिळवू शकतो यावर नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम भर देईल.

२ सेवेत स्वतःस देऊ करण्याचे व्यवहार्य मार्ग आपण शिकू. प्रवासी पर्यवेक्षकांकरवी दिल्या जाणाऱ्‍या काही भाषणांची शीर्षके पुढीलप्रमाणे आहेत: “अनीतिकारक धनाने मित्र जोडणे,” “‘मानवरूपी देणग्या’ या ईश्‍वरी व्यवस्थेचा आदर करा” आणि “खऱ्‍या आनंदाच्या अनेक पैलूंचा अनुभव घ्या.” संमेलनात बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍यांना अध्यक्षीय पर्यवेक्षकांबरोबर बोलावे लागेल जेणेकरून बाप्तिस्म्याच्या प्रश्‍नांची उजळणी घेण्याकरता ते वडिलांची नियुक्‍ती करू शकतील. एका निर्मल ऋणानुबंधात यहोवाची सेवा करणे बाप्तिस्मा प्राप्त झालेल्या नवोदिताना जास्त आनंद देईल.

३ यहोवाच्या अधिकाराची उचित जाणीव असणे देखील, खरी धन्यता व सुरक्षितता यात परिणीत होते. सर्व लोकांना याची जाणीव होण्यास हवी. यास्तव, विभागीय संमेलनातील जाहीर व्याख्यान, “देवाच्या आनंदी लोकांसोबत संयुक्‍त व्हा” हा विषय विकसित करील. ज्यांनी सत्याबद्दल आस्था प्रदर्शित केली आहे अशांना या भाषणासाठी आग्रहाने निमंत्रित करा. यांना सैतानाच्या सत्तेखाली असणाऱ्‍या या जगातील मानवी शासनाधीन खरी सुरक्षितता आणि निःसीम धन्यता लाभलेली नाही. (उप. ८:९) परंतु, यहोवाच्या धन्य लोकांच्या सहवासात त्यांना किती अमाप आनंद मिळेल!—स्तोत्र १४४:१५ब.

४ या व्यवस्थीकरणात अधिकाधिक बिकट होत असलेल्या परिस्थिती हयात असतानाही, आध्यात्मिकरित्या देऊन जे लोक जास्त धन्यता अनुभवत आहेत ते धन्यवादित देवापासून कदापि नैराश्‍य अनुभवणार नाहीत. (१ तीम. १:११) नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम हे सार्थ असल्याचे दाखवून देईल. तो चुकवू नका!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा