इंटरनेटवर सुवार्ता
आपल्या या तंत्रज्ञानाच्या युगात, काही लोक इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे माहिती संपादन करतात आणि त्यांपैकीच एक माध्यम आहे इंटरनेट. यास्तव, यहोवाच्या साक्षीदारांचे विश्वास आणि त्यांची कार्ये यांबाबत संस्थेने इंटरनेटवर काही अचूक माहिती पुरवली आहे.
आपल्या इंटरनेट वेब साईटचा पत्ता, http://www.watchtower.org हा असून यावर इंग्रजी, चीनी (साधी), जर्मन, रशियन आणि स्पॅनिश याशिवाय अन्य भाषांतही निवडक हस्तपत्रिका, माहितीपत्रके तसेच टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांतील लेख उपलब्ध आहेत. या वेब साईटवरील प्रकाशने मंडळीमार्फत उपलब्ध आहेत आणि सेवेतही त्यांचा उपयोग केला जातो. आपल्या वेब साईटचा उद्देश, नवीन प्रकाशने जाहीर करणे हा नसून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती उपलब्ध करून देणे हा होय. कोणाही व्यक्तीला, यहोवाच्या साक्षीदारांबद्दल, आपल्या कार्यांबद्दल किंवा आपल्या विश्वासांबद्दल इंटरनेट पेजेस तयार करण्याची आवश्यकता नाही. ज्या कोणाला गरज आहे त्यांच्यासाठी आपले अधिकृत साईट अगदी अचूक माहिती सादर करते.
आपल्या साईटवर इलेक्ट्रॉनिक संदेशांची (ई-मेल) तरतूद नसली तरी विश्वभरातील शाखांचे पत्ते त्यात दिलेले आहेत. त्यामुळे लोक अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पत्र लिहू शकतात किंवा स्थानिक साक्षीदारांकडून वैयक्तिक मदत मिळवू शकतात. या इलेक्ट्रॉनिक स्वरूपाद्वारे बायबल सत्य शिकू इच्छिणाऱ्यांना, वरील इंटरनेटचा पत्ता देण्यास कोणतीही कुचराई करू नका.