घोषणा
◼ साहित्य सादरता नोव्हेंबर: राज्य वार्ता क्र. ३५ चे वितरण चालू राहील. राज्य वार्ता क्र. ३५ याचा साठा संपल्यानंतर, ज्ञान पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. डिसेंबर: पुढील तीन पुस्तकांपैकी कोणतेही ४५.०० रुपयांच्या अनुदानात: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल, (लहान आकाराचे २५.०० रुपयांना), बायबल कथांचं माझं पुस्तक, (इंग्रजी, लहान आकाराचे ३०.०० रुपयांना), किंवा सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्याय म्हणून, जुलैची आमची राज्य सेवा यात खास दरांच्या पुस्तकांच्या यादीतील कोणतीही पुस्तके २.५० रुपयांना सादर केली जाऊ शकतात. जानेवारी: संस्थेने पुरविलेल्या, अर्ध्या किंवा खास दरातील पुस्तकांच्या यादीतील कोणतीही १९२ पृष्ठांची जुनी पुस्तके. स्थानिक भाषेत ही पुस्तके उपलब्ध नसल्यास, ज्ञान किंवा कौटुंबिक सौख्यानंद ही पुस्तके प्रत्येकी २०.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात. फेब्रुवारी: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल, हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना) किंवा मग संस्थेने पुरवलेल्या अर्ध्या अथवा खास दरांच्या पुस्तकांच्या यादीतली कोणतीही १९२ पृष्ठांची जुनी पुस्तके. स्थानिक भाषांत ही पुस्तके उपलब्ध नसल्यास, ज्ञान किंवा कौटुंबिक सौख्यानंद ही पुस्तके प्रत्येकी २०.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात.
◼ नोव्हेंबर १६ तारखेला ही खास मोहीम समाप्त झाल्यानंतर, ज्या मंडळ्यांकडे अजूनही राज्य वार्ता क्र. ३५ चा साठा शिल्लक आहे त्या मंडळ्या, हस्तपत्रिकांप्रमाणेच घरोघरी अथवा इतरत्र त्या सादर करण्याचे प्रोत्साहन प्रचारकांना देऊ शकतात. उचित असल्यास, घरी नसलेल्यांच्या घरांत प्रचारक याची एक प्रत टाकू शकतात, तरी ती येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या नजरेत पडू नये. या महत्त्वाच्या संदेशाच्या सर्व शिल्लक प्रतींचे वितरण करण्यासाठी प्रयत्न केले जावेत.
◼ जानेवारी १९९८ पासून विभागीय पर्यवेक्षक त्यांच्या भेटींदरम्यान, “उद्धार करण्याच्या यहोवाच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवा” हे जाहीर व्याख्यान, व “यहोवाचे भय बाळगून चालणाऱ्या मंडळ्या—चांगले आचरण ठेवतात” हे समाप्तीचे सेवा भाषण देतील. गुरुवारच्या (किंवा शुक्रवारच्या) त्यांच्या पहिल्या सेवा भाषणाचे शीर्षक असेल: “‘प्रत्येक ठिकाणी’ देवाच्या सुवासिक ज्ञानाचा प्रसार करणे.”
◼ अधिक अचूकतेसाठी व सुस्पष्टतेसाठी, मराठी भाषेतील चर्चेसाठी पवित्रशास्त्र विषय या पुस्तिकेतील काही विषयांची शीर्षके बदलली गेली आहेत. १९९८ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा पर्यायी आराखडा यात अचूक शीर्षके दिलेली आहेत. यास्तव बांधवांनी, १९९८ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा पर्यायी आराखडा यामध्ये दिलेल्या शीर्षकांचा उपयोग करावा. दोन ठिकाणी जेथे शीर्षके बदलेली आहेत; ती पुढीलप्रमाणे आहेत:
बहुपत्नीकत्व या ऐवजी “बहुयुतिक,” (td-MR ३८ एफ) आणि धार्मिक विधि या ऐवजी “मास,” (td-MR ४० बी).