राज्य वार्तेप्रती दाखवलेल्या आस्थेचा मागोवा घ्या
१ मागील काही सप्ताहांदरम्यान, “सर्व लोक कधी एकमेकांवर प्रीती करतील का?” असे शीर्षक असलेल्या राज्य वार्ता क्र. ३५ चे वितरण करण्याच्या विशेषाधिकाराचा आपण आनंद घेतला आहे. सर्वत्र प्रचारक, राज्य वार्तेच्या या अंकामार्फत होता होईल तितक्या योग्य जणांस शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. (मत्त. १०:११) रविवार, नोव्हेंबर १६ रोजी ही मोहीम समाप्त होणार असली तरी वडीलजन, मंडळीचा साठा संपेपर्यंत राज्य वार्ता क्र. ३५ चे वितरण जारी ठेवण्यास तुम्हाला सांगतील.
२ राज्य वार्तेच्या या अंकाने अनेकविध लोकांची आस्था जागृत केली आहे. सर्वसामान्यपणे लोक ममताहीन झाले असल्याचे त्यांना दिसून येते आणि म्हणूनच, भवितव्यात काय वाढून ठेवले असेल याचा ते विचार करतात. (२ तीम. ३:३) लोकांच्या मनात निर्माण झालेल्या आस्थेचा आपण मागोवा घेऊ इच्छितो.
३ राज्य वार्ता फल उत्पन्न करते: सन १९९५ च्या राज्य वार्ता मोहिमेदरम्यान, याची एक प्रत मिळालेली एक स्त्री, यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्वासाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी राज्य सभागृहातील सभेस उपस्थित राहिली. त्या सभेत, तिने त्वरित बायबल अभ्यास स्वीकारला आणि त्यानंतर फार क्वचितच सभा चुकविल्या. वेळ न दवडता, तिने तिच्या आधीच्या चर्चला पत्र लिहून आपले सदस्यत्व काढून घेतले होते!
४ आतापर्यंत, क्षेत्रातील शेकडो लोकांनी राज्य वार्ता क्र. ३५ मधील संदेश वाचला आहे. परंतु, त्याच्याप्रती त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांनी जे काही वाचले त्यामुळे त्यांच्यावर एक अनुकूल छाप पडली असली तरी, एखादा यहोवाचा साक्षीदार पुन्हा त्यांची भेट घेत नाही तोपर्यंत बहुसंख्य लोक स्वतःहून पाऊल उचलणार नाहीत. पुन्हा भेट घेण्यासाठी तुम्ही योजना आखत आहात का? आपल्या सहमानवांसाठी असलेल्या प्रेमळ काळजीने तसे करण्यास आपल्याला प्रवृत्त केले पाहिजे. ज्यांनी राज्य वार्तेप्रती आस्था दाखवली आहे त्या सर्वांची पुन्हा भेट घेतली जावी.
५ तुम्ही पुन्हा भेट घ्याल तेव्हा काय म्हणाल? कदाचित, राज्य वार्तेच्या संदेशाचा समयोचितपणा याविषयी एखाददोन विवेचने मांडून तुम्ही एखादा विचारप्रवर्तक प्रश्न विचारू शकता. घरमालक आपले विचार अभिव्यक्त करतो तेव्हा कान लावून ऐका, जेणेकरून त्याच्या मनात काय आहे ते तुम्हाला ताडता येईल. मग, अपेक्षा माहितीपत्रकातील एखाद्या यथोचित मुद्द्याकडे लक्ष वेधा ज्याचा उल्लेख राज्य वार्तेत देखील केला होता. तुम्हाला अनुकूल प्रतिसाद मिळाल्यास, तिथल्या तिथेच बायबल अभ्यास सुरू करा.
६ ज्या लोकांनी “राज्य वार्ता” क्र. ३५ संबंधी आस्था दाखवली त्यांची पुन्हा भेट घेताना तुम्ही कदाचित उपयोग करू शकाल अशा काही प्रस्तुती येथे सुचविल्या आहेत:
◼ “तुम्हाला कदाचित आठवत असेल, काही दिवसांपूर्वीच मी एक पत्रिका तुम्हाला देऊन गेलो होतो. त्यातील संदेश, आज मानवजातीला विभक्त करणाऱ्या एका प्रमुख विषयास—इतरांबद्दल प्रेम नसणे, या विषयास स्पर्श करतो.” राज्य वार्तेत पृष्ठ २ वरील शीर्षक अर्थात, “शेजाऱ्याबद्दलची प्रीती थंडावली आहे” याकडे लक्ष वेधा. मग विचारा, “मानवानं असं जगावं असा देवाचा उद्देश आहे का?” प्रतिसादासाठी वाव द्या. अपेक्षा माहितीपत्रकातील पाठ ५ उघडा आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.
◼ “आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा, ‘सर्व लोक कधी एकमेकांवर प्रीती करतील का?’ या विषयावर काही माहिती मी तुम्हाला दिली होती. असं एक जग शक्य आहे, असं तुम्हाला वाटतं का?” प्रतिसादासाठी वाव द्या. अपेक्षा माहितीपत्रकातील पाठ ६ उघडा आणि परिच्छेद ६ वाचा. मग मीखा ४:३, ४ येथे दिलेले देवाचे अभिवचन वाचा. घरमालकाला आस्था असल्याचे दिसून आल्यास माहितीपत्रक सादर करून अभ्यास सुरू करा.
◼ “मागच्या वेळी मी तुम्हाला भेट दिली तेव्हा, ‘सर्व लोक कधी एकमेकांवर प्रीती करतील का?’ अशा शीर्षकाचं एक साहित्य मी तुम्हाला दिलं होतं. त्यात एका विनामूल्य गृह बायबल अभ्यासाचा प्रस्तावही होता. अभ्यासासाठी आम्ही कोणत्या साहित्याचा उपयोग करतो हे दाखविण्यासाठी मी पुन्हा आलो आहे. [ज्ञान पुस्तक दाखवा.] हे पुस्तक स्पष्टपणे दाखवून देतं, की सर्व लोक केव्हा एकमेकांवर प्रीती करतील, आणि या शिवाय तुम्ही विचार करत असलेल्या इतरही प्रश्नांची उत्तरं ते देतं, जसं की: आपण वृद्ध होतो व मरतो ते का? देव दुःखाला अनुमती का देतो? आपल्या मृत प्रियजनांचे काय होते?” मग असे विचारा, “मी तो अभ्यासक्रम तुम्हाला दाखवू शकतो का?” घरमालकाने तुमच्या प्रस्तावाला नकार दर्शवल्यास, तो स्वतःहून ते पुस्तक वाचू इच्छितो का, असे त्याला विचारा. त्याला एक प्रत सादर करा. पुन्हा भेट घेण्याची योजना आखा.
७ एकदा का राज्य वार्ता क्र. ३५ चा साठा संपला, की महिन्याच्या उर्वरित दिवसांत आपण ज्ञान पुस्तक सादर करू शकतो. मार्च, जून आणि नोव्हेंबर १९९६ व जून १९९७ ची आमची राज्य सेवा याच्या मागील पृष्ठावर या पुस्तकासाठी सुचविलेल्या अनेक निवडक प्रस्तुती आढळतील.
८ राज्य वार्तेच्या या खास वितरणाने, आपल्याला प्रचार कार्यात अधिकाधिक प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. आपण विश्वस्त असू शकतो, की यहोवाच्या मदतीने या मोहिमेस निश्चित यश मिळेल तसेच एकमेकांवर प्रीती करण्याचा, सबंध मानवजातीसाठी असलेला देवाचा उद्देश जाणून घेण्यासही लोकांना मदत होईल. राज्य वार्तेप्रती दाखवलेल्या आस्थेचा मागोवा घेण्यात आपण करत असलेले प्रामाणिक प्रयत्न यहोवा आशीर्वादित करो.