वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९७ पृ. १
  • ‘तुमचे कुटुंब उभारा’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘तुमचे कुटुंब उभारा’
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • कौटुंबिक सौख्यानंदाचे एखादे रहस्य आहे का?
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य इतरांना देऊ करणे
    आमची राज्य सेवा—१९९७
  • कौटुंबिक जीवनात ईश्‍वरी शांती अनुसरणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • चिरकालिक भवितव्य संपादन करण्यासाठी कुटुंबांना मदत करणे
    आमची राज्य सेवा—१९९७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९७
km ३/९७ पृ. १

‘तुमचे कुटुंब उभारा’

१ यात काही शंकाच नाही, की जगभरातील हरएक संस्कृतीत कौटुंबिक जीवन मोडकळीस येत आहे. सैतानाचे जग दगलबाजी आणि अनैतिकता यांत अगदी गुरफटत चालले आहे. (१ योहा. ५:१९) ही बाब, ‘आपले कुटुंब उभारण्याच्या’ तसेच इतरांनाही असे करण्यास शिकवण्याच्या निकडीवर अधिक भर देते.—नीति. २४:३, २७.

२ बायबल तत्त्वे संरक्षक: बायबलच्या तत्त्वांचे अनुपालन करण्यातच खऱ्‍या कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य दडलेले आहे. ही प्रबळ सत्ये, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये लाभदायक ठरतात. यांचे पालन करणारे कुटुंब आनंदी होईल शिवाय ईश्‍वरी शांतीचाही ते आनंद लुटेल.—पडताळा यशया ३२:१७, १८.

३ आपले कुटुंब उभारण्याकरता आपल्याला मदत करणारी तत्त्वे, कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकात संक्षिप्त स्वरूपात दिली आहेत. कौटुंबिक सदस्यांनी लक्षात ठेवण्याजोग्या तत्त्वांवर जोर देणारा एक मदतदायी बोधक रकाना प्रत्येक अध्यायाच्या शेवटी दिलेला आहे. यातील बहुतेक रकाने, “ही बायबल तत्त्वे . . .  कशी मदत करू शकतात?” या प्रश्‍नाने सुरू होतात. ह्‍या सर्व गोष्टी, आपले लक्ष देवाच्या विचारांकडे वेधतात ज्यामुळे चर्चिल्या जात असणाऱ्‍या विषयावर आपल्याला देवाची विचारप्रणाली समजते.—यश. ४८:१७.

४ पुस्तकाशी परिचित व्हा. निरनिराळ्या समस्या उद्‌भवल्यास सहायक ठरतील अशी तत्त्वे यातून शोधून काढण्यास शिका. हे पुस्तक पुढील गोष्टींची चर्चा करते: भावी वैवाहिक सोबती निवडताना एखाद्याने काय पाहावे. (अध्याय २), कोणत्या आवश्‍यक गुरुकिल्ल्या चिरस्थायी वैवाहिक सौख्यानंदाचे द्वार उघडतात. (अध्याय ३), आपली किशोरवयीन मुले ही जबाबदार, देवभिरू प्रौढ व्यक्‍ती व्हावीत याकरता पालक त्यांचे संगोपन कसे करू शकतात (अध्याय ६), विध्वंसक परिणामांपासून कुटुंबाचे संरक्षण कसे करावे (अध्याय ८), एक-पालक कुटुंबे यशस्वी होण्याची तत्त्वे (अध्याय ९), दारूबाजी व हिंसेने त्रासलेल्या कुटुंबांकरता आध्यात्मिक साहाय्य (अध्याय १२), वैवाहिक बंधने मोडण्याच्या बेतात असतात तेव्हा काय करावे (अध्याय १३), वृद्ध पालकांचा सन्मान करण्यासाठी काय केले जाऊ शकते (अध्याय १५) आणि कुटुंबासाठी सार्वकालिक भवितव्य कसे संपादन करावे (अध्याय १६).

५ नवीन पुस्तकाचा पुरेपूर उपयोग: तुम्ही अद्याप असे केले नसल्यास, कुटुंब या नात्याने एकत्र मिळून कौटुंबिक सौख्यानंद या पुस्तकाचा अभ्यास का करू नये बरे? तसेच, जेव्हा जेव्हा तुमच्या कुटुंबाला समस्यांना अथवा आव्हानांना तोंड द्यावे लागते, तेव्हा तेव्हा यांवर चर्चा करणाऱ्‍या अध्यायांची या पुस्तकातून उजळणी करा व सल्ला कसा लागू करावा यावर प्रार्थनापूर्वक विचार करा. या व्यतिरिक्‍त, मार्च महिन्यादरम्यान, होताहोईल तितक्या लोकांना कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक सादर करता यावे या उद्देशाने क्षेत्र सेवेकरता भरपूर वेळ द्या.

६ ईश्‍वरी भक्‍ती आचरणारी कुटुंबे आध्यात्मिकरित्या सुदृढ व संयुक्‍त होतील तसेच सैतानाच्या हल्ल्यांना तोंड देण्यासही ती अधिक सुसज्ज असतील. (१ तीम. ४:७, ८; १ पेत्र ५:८, ९) कुटुंब अस्तित्वात आणणाऱ्‍याकडून आपल्याला ईश्‍वरी बोध मिळत असल्यामुळे आपण त्याचे किती कृतज्ञ आहोत!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा