वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९७ पृ. १
  • “कृतज्ञ असा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “कृतज्ञ असा”
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • “सर्व गोष्टींसाठी आभार माना”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • “कृतज्ञ असा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • उपकारस्तुतीची प्रार्थना
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • “कृतज्ञ असा”
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९७
km ३/९७ पृ. १

“कृतज्ञ असा”

१ आपल्याशी कोणी सौजन्याने अथवा दयाळूपणे वागला असल्यास, “कृपया” आणि “धन्यवाद” असे म्हणण्यास आपल्यातील बहुतेकांना लहानपणी शिकवण्यात आले होते. पौल ‘आपल्याला सदैव कृतज्ञ असण्याचा’ उपदेश देतो आणि आपण विशेषकरून यहोवाचे कृतज्ञ असण्यास हवे. (कलस्सै. ३:१५, १६) परंतु, आपण आपल्या महान सृष्टीकर्त्याला आपली कृतज्ञता कशी अभिव्यक्‍त करू शकतो? तसेच, त्याची कृतज्ञता बाळगण्यासाठी आपल्याकडे कोणती खास कारणे आहे?

२ प्रेषित पौलाने लिहिले: “देव जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडून आपल्याला जय देतो त्याची उपकारस्तुति असो!” (१ करिंथ. १५:५७, पं.र.भा.) दर वर्षी स्मारकविधीच्या वेळी, आपल्याला अनंत जीवनाची आशा प्रदान करणाऱ्‍या खंडणीची तरतूद करून देवाने व ख्रिस्ताने दाखवलेल्या अपरिमित प्रीतीचे स्मरण दिले जाते. (योहा. ३:१६) आपल्यातील बहुतेकांची, आपल्या प्रियजनांपासून मृत्यूमुळे ताटातूट झाली आहे, त्यामुळे पुनरुत्थानासंबंधी येशूने दिलेल्या अभिवचनाबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! कधीही न मरता या व्यवस्थीकरणाच्या अंतामधून उत्तरजीवी असण्याच्या प्रत्याशेवर आपण विचार करतो तेव्हा आपले अंतःकरण कृतज्ञतेने भरून येते. (योहा. ११:२५, २६) येणाऱ्‍या पृथ्वीवरील परादीसमध्ये, यहोवाकडून आपल्याला अनुभवण्यास मिळणार असलेल्या अद्‌भुतरम्य आशीर्वादांसाठी कृतज्ञता व्यक्‍त करण्यास शब्द अपुरे पडतात. (प्रकटी. २१:४) कोणत्याही व्यक्‍तीजवळ, देवास ‘कृतज्ञ असण्यास’ यापेक्षा आणखी कोणती उत्तम कारणे असू शकतात बरे?

३ देवाला कृतज्ञता कशी व्यक्‍त करावी: प्रार्थनेद्वारे, यहोवाला त्याच्या चांगुलपणाबद्दल आपली कृतज्ञता व्यक्‍त करणे नेहमीच उचित असते. (स्तोत्र १३६:१-३) आपल्याला इतर विधायक मार्गांनीही त्याला कृतज्ञता दाखवण्याची प्रेरणा मिळते. उदाहरणार्थ, रविवारी, मार्च २३ या दिवशी ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीकरता आपण निश्‍चित उपस्थित राहू. स्थानिक मंडळीच्या तसेच विश्‍वव्यापी कार्याच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी आपण हर्षाने ‘आपल्या सर्व अनमोल द्रव्यांनी यहोवाचा सन्मान’ करतो. (नीति. ३:९) आपण वडिलांना पूर्णपणे पाठबळ व सहकार्य देतो आणि असे केल्याने यहोवा त्यांच्यामार्फत पुरवत असलेल्या साहाय्याकरता आपण त्याला कृतज्ञता दाखवत असतो. (१ थेस्सलनी. ५:१२, १३) यहोवाच्या नावाचा गौरव करणारे सदाचरण राखण्यास आपण दररोज कसोशीने प्रयत्न करतो. (१ पेत्र २:१२) कृतज्ञतेच्या आपल्या ह्‍या सर्व पुराव्यांनी यहोवा संतुष्ट होतो.—१ थेस्सलनी. ५:१८.

४ कृतज्ञतेची आपली सर्वोत्तम अभिव्यक्‍ती: आपल्या सृष्टीकर्त्याने आपणासाठी जे सर्व काही केले आहे त्याकरता आपण मनःपूर्वक कृतज्ञता दाखवू शकणाऱ्‍या अभिव्यक्‍तींपैकी, राज्य-प्रचाराच्या कार्यात अंतःकरणपूर्वक भाग घेणे, यहोवाच्या नामाचा सन्मान करणे, प्रार्थनेत आभार प्रदर्शित करणे आणि सत्याच्या बाजूने निष्ठेने उभे राहणे ह्‍या सर्वोत्तम अभिव्यक्‍ती आहेत. “सर्व माणसांचे तारण व्हावे” या यहोवाच्या इच्छेस, पवित्र सेवेची कृत्ये करून आपण पाठिंबा देत असल्याचे पाहून तो प्रसन्‍न होतो. (१ तीम. २:३, ४) यास्तव, फेब्रुवारी महिन्याची आमची राज्य सेवा यात मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांतील एका अथवा अधिक महिन्यांत सहायक पायनियर म्हणून कार्य करण्यास केलेल्या आवाहनास, तशी व्यवस्था करू शकणारे कित्येक प्रचारक प्रतिसाद देत आहेत. सेवेत अधिक प्रयत्न करणे, ‘देवाला कृतज्ञता दाखवण्याचा’ एक उत्तम मार्ग आहे. एप्रिल अथवा मे महिन्यांत तुम्हाला पायनियरींग करता येईल का?

५ आपल्याला अनंतकाळ जगण्याची एक निश्‍चित आशा दिली गेली आहे. ती पूर्ण होत असल्याचे आपण पाहतो तेव्हा प्रतीदिवशी यहोवाला हर्षभरित कृतज्ञता दाखवण्याची आणखी विपुल कारणे आपल्याकडे असतील.—स्तोत्र ७९:१३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा