सरस गोष्टींची सुवार्ता प्रकाशित करणे
१ टेहळणी बुरूज याने ११७ वर्षे बायबल सत्याच्या समर्थकाची भूमिका पार पाडली आहे. सध्या, प्रत्येक अंकाच्या १,८९,५०,००० प्रती, १२५ भाषांमध्ये मुद्रित केल्या जातात. सावध राहा! याने देखील वर्षांनुवर्षे देवाच्या वचनाचा कैवार घेतला आहे व आता त्याचे ८० भाषांत, १,५७,३०,००० प्रतींचे वितरण होते.—पडताळा कलस्सैकर १:२३.
२ नियतकालिके आध्यात्मिक गरज तृप्त करतात: टेहळणी बुरूज व सावध राहा! ही नियतकालिके प्रामाणिक अंतःकरणाच्या लक्षावधी लोकांची आध्यात्मिक गरज तृप्त करावयास मदत पुरवण्याद्वारे त्यांना हितकारक ठरली आहेत. यांत विश्वासाची उभारणी करणारे लेख प्रकाशित केले जातात. उदाहरणार्थ, टेहळणी बुरूज याच्या फेब्रुवारी १, १९९६ अंकात, यहोवा व त्याच्या वचनावर भरवसा ठेवण्याच्या आवश्यकतेशी संबंधित असणाऱ्या साहित्याचा आपण अभ्यास केला. मार्च १, १९९६ च्या टेहळणी बुरूज अंकात आपल्याला यहोवाच्या सेवेत कार्यमग्न राहण्याचे व त्याची वाट पाहण्याचे उत्तेजन देण्यात आले. सफन्याच्या भविष्यवादाची ती विवरणात्मक चर्चा खरोखर किती उत्साहवर्धक होती! त्यानंतर टेहळणी बुरूज याच्या मार्च १५, १९९६ अंकात विश्वासास बळकट करणारी ख्रिस्ती एकनिष्ठेची चर्चा करण्यात आली. मे १५, १९९६ च्या अंकात देवाच्या वचनाचे नियमितपणे वाचन व त्याचा अभ्यास करण्याच्या महत्त्वावर भर देण्यात आली. या लेखांकरवी देवाच्या वचनाविषयी आपली समज वृद्धिंगत झाली व देवाच्या राज्याबद्दल आपल्या ज्ञानातही भर पडली आहे.
३ शिवाय, या नियतकालिकांत ईश्वरी वर्तन, ख्रिस्ती नीतिमूल्ये व इतर अतिमहत्त्वपूर्ण विषयांवर समयोचित व व्यावहारिक लेख असतात. ते आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या यथार्थ प्रश्नांची गंभीर दखल घेतात. यामुळे, भवितव्यात सरस गोष्टींविषयी देवाने दिलेल्या अभिवचनांच्या पूर्ततेची वाट पाहत असताना, आपण विद्यमान काळात एका अधिक चांगल्या जीवनाचा आनंद लुटतो.—यश. ४८:१७; १ तीम. ६:१९.
४ सावध राहा! याच्या प्रत्येक अंकात ४ थ्या पृष्ठावर नमूद असलेल्या माहितीवर संक्षिप्त पुनर्विचार केल्यास, सर्व ठिकाणच्या लहानथोरांना उत्कृष्ट वाचन साहित्य म्हणून या नियतकालिकाची शिफारस करण्यासाठी आपल्याला आधार प्राप्त होतो. तेथे म्हटलेले आहे: “सावध राहा! संपूर्ण कुटुंबाला ज्ञानप्रसार व्हावा म्हणून आहे. आजच्या समस्यांचा सामना कसा करावा हे ते दाखवते. ते बातम्या देते, विविध देशातील लोकांबद्दलची माहिती देते, धर्म व विज्ञान यांचे परीक्षण करते. पण यापेक्षाही अधिक ते करते. ते मुळाशी जाऊन सध्याच्या घटनांमागील खरा अर्थ स्पष्ट करते, तरीही ते राजकारणी दृष्ट्या नेहमी तटस्थ आहे, आणि एका जातीला दुसऱ्या जातीपेक्षा श्रेष्ठ दाखवत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे नियतकालिक, निर्माणकर्त्याच्या शांती व निर्भयतेच्या नवीन जगाच्या अभिवचनावर आत्मविश्वास वाढवते, जे सध्याच्या दुष्ट व भक्तीहीन व्यवस्थीकरणाला काढून टाकील.”
५ ही नियतकालिके इतरांनाही द्या: टेहळणी बुरूज व सावध राहा! इतरांना देता येतील अशा संधींविषयी जागरुक असा. (पडताळा १ तीमथ्य ६:१८.) काही प्रती आपल्याजवळ ठेवा जेणेकरून, कोणाशी अचानक गाठ पडल्यास त्या सादर करता येतील. (उप. ११:६) या महिन्यात, अलीकडील अंकांतील समयोचित लेखांवर आधारित असणाऱ्या संक्षिप्त प्रस्तुतींचा उपयोग करून, नियतकालिके वितरित करण्यात आणि वर्गण्या सादर करण्यात, लहान व नवीन प्रचारकांसहित आपण सर्व, पुरेपूर सहभाग घेऊ शकतो. या अंकांत सामावलेल्या माहितीशी चांगले परिचित व्हा व त्यांस प्रांजळपणे व आत्मविश्वासाने सादर करा.
६ टेहळणी बुरूज व सावध राहा! यांत प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असणारी माहिती असते. सरस असे काहीतरी लवकरच येणार आहे, ही सुवार्ता समजण्यास इतरांना मदत करण्यासाठी ही नियतकालिके वितरीत करणे यापेक्षा आणखी उत्तम मार्ग कोणता असू शकतो!