ऑक्टोबरसाठी सेवा सभा
ऑक्टोबर ७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ४७ (२१)
१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. देशाच्या व स्थानिक मंडळीच्या जून महिन्याच्या क्षेत्र सेवा अहवालावर विवेचन मांडा.
१५ मि: प्रश्न पेटी. सेवा पर्यवेक्षक किंवा इतर सुयोग्य वडील श्रोत्यांसोबत माहितीची चर्चा करतात.
२० मि: “तुमची स्वतःची नियतकालिक प्रस्तुती तयार करा.” (१-७ परिच्छेद) १-४ परिच्छेदांवर प्रश्न विचारा, यानंतर ५-७ परिच्छेदांत सुचविल्याप्रमाणे अलीकडील अंकांचा उपयोग करून कशाप्रकारे वर्गण्या सादर करता येतील हे दाखविणारी दोन किंवा तीन संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा. टेहळणी बुरूज याच्या मार्च १, १९८७ अंकातील पृष्ठ १७ वरील ८-९ परिच्छेदांमधील विवेचनांचा समावेश करा.
गीत २२२ (११९) व समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर १४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ३९ (१६)
१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.
१५ मि: “सरस गोष्टींची सुवार्ता प्रकाशित करणे.” प्रश्नोत्तरे. टेहळणी बुरूज मध्ये प्रकाशित झालेल्या काही उल्लेखनीय लेखांकडे लक्ष वेधा.—टेहळणी बुरूज याच्या (इंग्रजी) मार्च १, १९८७, अंकातील पृष्ठ १३ पाहा.
२० मि: “तुमची स्वतःची नियतकालिक प्रस्तुती तयार करा.” (८-११ परिच्छेद) प्रश्नोत्तरे. टेहळणी बुरूज जानेवारी १, १९९४ अंकातील पृष्ठे २४-५ वरील १८-२१ परिच्छेदांतील विवेचनांचा समावेश करा. नियतकालिकांचे ऑक्टोबर महिन्याचे अंक उपयोगात आणून, प्रस्तुती कशी तयार करावी ते सांगा: (१) तुमच्या क्षेत्रात संभवतः लोकांची अभिरूची जागृत करील असा एखादा लेख निवडा, (२) सादर करण्यासाठी एखादा लक्षवेधक मुद्दा शोधा, (३) त्या मुद्याकडे लक्ष वेधण्याजोग्या एखाद्या प्रश्नाचा विचार करून ठेवा, (४) संधी मिळाल्यास वाचण्यासाठी एखादे शास्त्रवचन निवडा व (५) तुमची प्रस्तावना, व वर्गणी स्वीकारण्याबद्दल घरमालाकास उत्तेजन देण्यासाठी नियतकालिकाविषयी तुम्हाला काय म्हणावयाचे आहे याची तयारी करा. दोन किंवा तीन कार्यक्षम प्रचारकांकडून प्रस्तुतींचे प्रत्येकी एक प्रात्यक्षिक करवून घ्या. त्यामध्ये एका युवकाला साधीसोपी नियतकालिक प्रस्तुती करण्यास सांगा. वर्गणी नाकारण्यात आल्यास नियतकालिकांच्या किरकोळ प्रती जरूर सादर करा.
गीत ८२ (२६) व समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर २१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १६९ (२८)
१५ मि: स्थानिक घोषणा. एखाद्या व्यक्तीने वर्गणी स्वीकारली नाही पण तिने नियतकलिके घेण्याची इच्छा प्रदर्शित केल्यास नियतकालिक मार्ग कसा सुरू करावा याचे स्पष्टीकरण द्या: (१) वाटप केलेल्या प्रत्येक नियतकालिकाची व कोणता लेख सादर केला होता याची नोंद घ्या, (२) पुढील अंक घेऊन पुन्हा येण्यासाठी योजना करा व (३) ह्या भेटी देण्यासाठी तुमच्या साप्ताहिक सेवेच्या वेळापत्रकात खास वेळ राखून ठेवा. प्रत्येक नियतकालिक मार्गाचा, पुनर्भेट म्हणून अहवाल देण्याचे विसरू नका.
१५ मि: “तुमच्या क्षेत्रातील कार्य पूर्णपणे उरका.” लेखात दिलेल्या माहितीवर व व्यावसायिक क्षेत्रांत कार्य करण्याच्या स्थानिक योजनांविषयी चर्चा करा. श्रोत्यांतील काहींनी आपल्या क्षेत्रांत समाविष्ट असणाऱ्या दुकानांत कार्य केले तेव्हा लाभलेले प्रोत्साहक अनुभव सांगण्याचे त्यांना आमंत्रण द्या.
१५ मि: स्थानिक गरजा. किंवा टेहळणी बुरूज याच्या मे १, १९९६ अंकातील पृष्ठे २१-४ वरील, “शेवटपर्यंत तुमची खात्री दृढ राखा,” या लेखावर आधारित वडिलांचे भाषण.
गीत १२ (५२) व समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर २८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २७ (७)
१० मि: स्थानिक घोषणा. डिसेंबरमध्ये जगिक सणवार येत असल्यामुळे, कदाचित प्रापंचिक कामाला व शाळेला सुट्या असतील, तेव्हा सर्वांना सहाय्यक पायनियर म्हणून नाव नोंदवणे शक्य होईल का याविषयी विचार करण्याचे प्रोत्साहन द्या. या सप्ताहांती ऑक्टोबर महिन्याचा क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याचे सर्वांना आवर्जून सांगा.
२० मि: “वेळेचा सदुपयोग कसा करावा.” प्रश्नोत्तरे. टेहळणी बुरूज याच्या (इंग्रजी) डिसेंबर १, १९८९ अंकातील, पृष्ठे १६-१७ वरील ७-११ परिच्छेदांतील विवेचनांचा समावेश करा.
१५ मि: नोव्हेंबरच्या साहित्य सादरतेची उजळणी करा. ज्ञान पुस्तक सादर केले जाईल व गृह बायबल अभ्यास सुरू करण्याच्या दृष्टीने वाटप केलेल्या प्रत्येक ठिकाणी पुन्हा भेट घेण्याचा खास प्रयत्न केला जाईल. दोन किंवा तीन कार्यक्षम प्रचारक या पुस्तकाचे महत्त्व व ते कशाप्रकारे उपयोगात आणता येईल याविषयी चर्चा करतात. त्यातील माहिती कोणत्याही पार्श्वभूमीच्या लोकांच्या अंतःकरणाला भिडते. बाप्तिस्मा घेण्यापूर्वी, नवीन लोकांना समजावेत असे मूलभूत बायबल विषय व तत्त्वे त्यात हाताळलेली आहेत. आपण अभ्यास गतिशीलपणे सुरू ठेवल्यास, विद्यार्थी भराभर प्रगती करू शकेल. थेट प्रस्तुती उपयोगात आणून अभ्यास कसा सुरू करावा यावर चर्चा करा व त्याचे प्रात्यक्षिक दाखवा: पृष्ठे ४-५ वरील चित्र व मथळ्यावर पुनर्विचार करा; आपली अभ्यास घेण्याची पद्धत समजावून सांगा; अध्याय १ च्या सुरवातीच्या पाच परिच्छेदांवर थोडक्यात चर्चा करा; सार्वकालिक जीवन निव्वळ स्वप्न आहे का?, या प्रश्नाचे उत्तर देण्याकरता पुन्हा येऊन चर्चा सुरू ठेवण्यासाठी दिवस व वेळ ठरवा. गृह बायबल अभ्यास चालवण्याच्या विशेषाधिकारातून मिळणाऱ्या निर्भेळ आनंदावर भर द्या.
गीत १६२ (८९) व समाप्तीची प्रार्थना.