घोषणा
◼ साहित्य सादरता
सप्टेंबर: तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. पर्यायी सादरता म्हणून, जीवन येथे कसे आले—उत्क्रांतीने अथवा निर्मितीने? (इंग्रजी) किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना). पंजाबी भाषेत वाचायला हवे असणाऱ्या व्यक्तींना सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते.
ऑक्टोबर: टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! (इंग्रजी) यांच्या वर्गण्या. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ९०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी आणि पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ४५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही. वर्गणी नाकारण्यात आल्यास, नियतकालिकांच्या किरकोळ प्रती प्रत्येकी ४.०० रुपयांस सादर केल्या जाव्यात.
नोव्हेंबर: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने सर्व वाटपांचा मागोवा घेण्याकरता खास प्रयत्न केला जाईल.
डिसेंबर: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना). अदलूनबदलून, उचित असेल तेथे, एकतर सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा बायबल कथांचं माझं पुस्तक (इंग्रजी) हे ४५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. पंजाबी भाषेत वाचायला हवे असणाऱ्या व्यक्तींना सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते.
सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या साहित्याची मागणी पाठवली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मवर (S-AB-14) ती पाठवावी.
◼ अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या कोणा एकाने, सप्टेंबर १ रोजी अथवा त्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर, मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे केल्यावर मंडळीत त्याची घोषणा करा.
◼ ऑक्टोबरमध्ये सहायक पायनियरींग करण्याचे ठरवणाऱ्या प्रचारकांनी लवकर अर्ज द्यावेत. यामुळे वडील नियतकालिके, साहित्य आणि क्षेत्राची आवश्यक ती व्यवस्था करू शकतील.
◼ पुनःस्वीकार केला जावा अशी इच्छा दाखवलेल्या कोणाही बहिष्कृत अथवा अलिप्त केलेल्या व्यक्तींच्या बाबतीत एप्रिल १५, १९९१, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठे २१-३ वर दिलेल्या सूचना अनुसरण्यास वडिलांना आठवण करून दिली जात आहे.
◼ कलकत्ता येथे होणार असलेल्या प्रांतीय अधिवेशनाची तारीख बदलून, डिसेंबर २७-२९ १९९६ करण्यात आली आहे.
◼ जानेवारी १९९७ पासून सावध राहा! ही मराठी आवृत्ती मासिक प्रकाशन होईल.
◼ आम्ही सर्व प्रचारकांना गुरुवारी, ऑगस्ट २९ रोजी अथवा शेवटली तारीख म्हणजे रविवारी, सप्टेंबर १ रोजी आपापले क्षेत्र सेवा अहवाल मंडळीकडे देण्याकरता उत्तेजन देत आहोत. त्यानंतर, मंडळीच्या सचिवांनी मंगळवारी, सप्टेंबर ३ पर्यंत काँग्रीगेशन रिपोर्ट (S-1) पोस्टाने संस्थेला पाठवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा जेणेकरून सेवा वर्षाच्या वार्षिक अहवालास संकलित करण्याकरता तो आम्हाला वेळेवर मिळेल.