मंडळीच्या सभांची तयारी करा आणि त्यांचा आनंद लुटा
१ बांधवांचे संघटन या नात्याने, आपण साप्ताहिक सभांकरता सुज्ञतेने नियमितरित्या एकत्र होतो. (१ तीम. ४:१५, १६) आपण त्यांचा आनंद कसा लुटू शकतो व त्यांच्यापासून सर्वाधिक लाभ कसा मिळवू शकतो?
२ सभांची तयारी करण्यास नियमितपणे वेळ बाजूला राखला पाहिजे. काहीजणांना इतरांपेक्षा जास्त वेळ तयारी करणे शक्य असेल. तथापि, आपण कितीही व्यग्र असलो, तरी सभांची तयारी करण्यास काही वेळ बाजूला काढणे सुज्ञतेचे आहे. कुटुंब या नात्याने एकत्र मिळून तयारी करणे विशेषतः फायदेकारक ठरते.—इफिस. ५:१५, १६.
३ ईश्वारशासित सेवा प्राशालेसाठी: साप्ताहिक बायबल वाचनाच्या आराखड्यासोबत असण्याचा प्रायत्न करा. (यहो. १:८) जे साहित्य पूर्ण केले जाईल त्याची उजळणी करा आणि वक्त्यांसोबत तुम्हीही पडताळू शकाल म्हणून आवश्यक ती प्राकाशने आणा. तुमच्या सेवेत तुम्ही या माहितीचा कोणत्या मार्गांनी उपयोग करू शकता याचा विचार करा.
४ सेवा सभेसाठी: आमची राज्य सेवा यात दिलेला कार्यक्रम पाहा. चर्चा केले जाणारे लेख वाचा. एखाद्या टेहळणी बुरूज लेखातील किंवा इतर कोणत्या प्राकाशनातील माहितीचा विचार केला जाणार असल्यास, ती माहिती काढून वाचा. क्षेत्र सेवेच्या सादरतांची प्रात्यक्षिके दाखवली जाणार असल्यास, त्यांची आगाऊ उजळणी करा जेणेकरून त्यांचा उपयोग तुमच्या सेवेत करण्यास तुम्ही तयार असाल.
५ टेहळणी बुरूज अभ्यासासाठी: तो धडा आगाऊ वाचा, व प्राश्नांच्या उत्तरांची नोंद करा. उल्लेखलेली शास्त्रवचने काढून पाहिल्याने चांगली समज प्राप्त होण्यास तुम्हाला मदत मिळेल. तुम्हाला जे आधीच ठाऊक आहे त्याच्याशी तुमचा धडा कसा जुळतो यावर मनन केल्याने तुमचे ज्ञान अधिक वाढेल. कमीतकमी एक किंवा दोन परिच्छेदांवर संक्षिप्त विवेचने तयार करून अभ्यासात सहभागी होण्याची योजना करा. “आपल्या आशेचा पत्कर” करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे.—इत्त्वी. १०:२३.
६ मंडळीच्या पुस्तक अभ्यासासाठी: पहिल्यांदा, साहित्याचा अभ्यास करा; अध्यायाचे शीर्षक आणि उपशीर्षक यांचा विचार करा. त्यानंतर, वाचताना मुख्य कल्पना विचारात घ्या. त्यास पुष्टी देणाऱ्या बायबल वचनांची उजळणी करा. तुमच्या स्वतःच्या शब्दांत प्राश्नांची उत्तरे देण्याचा प्रायत्न करा. तुम्ही धडा तयार केल्यानंतर, तुमच्या मनात त्याची उजळणी करा. मुख्य मुद्दे आणि कारणमीमांसा आठवण्याचा प्रायत्न करा.—२ तीम. २:१५.
७ सभांचा आनंद लुटा: सभांचा आनंद संपूर्णतः लुटण्यासाठी, सुरवातीच्या प्रार्थनेत सहभागी होऊन यहोवाच्या आत्म्याची मागणी करण्यास वेळेवर येणे महत्त्वाचे आहे. तजेला देणाऱ्या राज्य गीतांपासूनही तुम्ही लाभ मिळवू शकता. तुम्हाला लहान मुले नसल्यास किंवा सभागृहात मागे बसण्याचे कोणते दुसरे कारण नसल्यास, तुम्ही समोर बसला तर कमी अडथळे असतील आणि कार्यक्रमापासून तुम्ही अधिक लाभ मिळवू शकाल असे कदाचित तुम्हाला आढळून येईल. ज्या पालकांना लहान मुले आहेत व त्यांना सभेदरम्यान बाहेर घेऊन जावे लागत असल्यास, ते दालनाजवळ किंवा मागील बाजूला बसले तर विकर्षण कमी करू शकतात.
८ जी शास्त्रवचने वाचली जातात ती काढून पाहण्याचा प्रायत्न करा. यामुळे तुम्ही जे ऐकता ते लक्षात ठेवण्यास तुम्हाला मदत मिळेल. तुमचे कुटुंब आणि मित्र यांच्याशी तुम्ही जे शिकता त्याविषयी बोलल्यामुळे तुमच्या मनावर ही माहिती ठसविली जाईल. या सूचना लागू केल्याने, सभा अधिक अर्थपूर्ण आणि आनंददायक होतील आणि त्या खरोखर आपल्याला “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन” देतील.—इत्त्वी. १०:२४, २५.