वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९५ पृ. १
  • यहोवाची स्तुती दररोज करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाची स्तुती दररोज करा
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • बालकांनो, यहोवाची स्तुती करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • दररोज यहोवाची स्तुती करा
    आमची राज्य सेवा—२००९
  • तुम्ही अनौपचारिक साक्ष देऊ शकता!
    आमची राज्य सेवा—२०१०
  • देवाच्या राज्यपदाविषयीचा महिमा विदित करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km १२/९५ पृ. १

यहोवाची स्तुती दररोज करा

१ आपला देव यहोवा हा अद्‌भुत, प्रोमळ निर्माणकर्ता, सर्व प्राकारचे जीवन आणि आनंद यांचा स्रोत आहे. त्याच्या महानतेला लक्षात ठेवून, तो सर्व सृष्टीकडून स्तुती मिळवण्यास खरोखर पात्र आहे. स्तोत्रकर्त्याने म्हटल्याप्रामाणे व्यक्‍तिगतरित्या आपल्याला असे म्हणावेसे वाटते: “मी . . . तुझे स्तवन अधिकाधिक करीत जाईन. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि तू सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करील.” (स्तोत्र ७१:१४, १५) असे करण्यासाठी आपण यहोवाची स्तुती दररोज करण्याचे मार्ग शोधून काढले पाहिजेत व त्याच्याविषयी, त्याच्या नीतिमत्त्वाविषयी आणि त्याच्या तारणाच्या तरतुदींविषयी चांगले मत व्यक्‍त करण्यास प्रावृत्त झाले पाहिजे.

२ आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी यहोवाची स्तुती करण्यामध्ये उत्तम उदाहरण मांडले. पेन्टेकॉस्टच्या दिवशी, बाप्तिस्मा घेतलेल्या ३,००० लोकांच्या संदर्भात आपण प्रोषितांची कृत्ये २:४६, ४७ मध्ये असे वाचतो: “ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, . . . देवाची स्तुती करीत . . . सर्व लोक त्यांना प्रासन्‍ना असत आणि प्राभु [यहोवा, NW] तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे.” ते यहोवा आणि त्याच्या मशीहाविषयी आश्‍चर्यजनक सत्य शिकत होते. त्यांचा हर्ष संसर्गजन्य असून तो आणखी इतरांना ऐकण्यास, शिकण्यास आणि यहोवाची स्तुती करण्यास उत्तजेन देत होता.

३ संधी दररोज उपलब्ध आहेत: अनौपचारिक साक्षकार्याद्वारे अनेकजण यहोवाची स्तुती दररोज करू शकतात असे त्यांना आज आढळत आहे. आगाऊ योजना त्यांना अधिक फलदायी होण्यास मदत करते. अनौपचारिक साक्षकार्य करण्याचा निर्धार केलेल्या एका बहिणीला असे दिसून आले, की एक व्यक्‍ती तिच्या कारच्या दोन खिडक्या फोडून आत शिरली. तिने एका गॅरेजला फोन केला आणि तेथील यंत्रज्ञाला साक्ष देण्याची तिने तयारी केली. तिच्या तयारीमध्ये यहोवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करण्याचा समावेश होता. असे झाले की, तिने यंत्रज्ञाला एक तासभर साक्ष दिली आणि त्याला अनंतकाल जगू शकाल पुस्तक दिले.

४ आणखी एक बहीण आणि तिची शेजारीण दोघी आपल्या कुत्र्यांना फिरायला घेऊन जात असताना नेहमी भेटत असत. अशाच एका भेटीत, त्यांनी जीवनाच्या समस्यांविषयी गांभिर्याने संभाषण केले आणि त्यामुळे पुढे अनेक चर्चा घडून आल्या. कालांतराने, एक बायबल अभ्यास सुरू करण्यात आला. मनोरंजक गोष्ट अशी, की नंतर त्या शेजारणीने असे कबूल केले, की यहोवाचे साक्षीदार तिच्या घरी आले असते, तर तिने त्यांचे कधीच ऐकले नसते कारण तिचा देवावर किंवा बायबलवर मुळीच विश्‍वास नव्हता.

५ विक्रेते किंवा इतर कोणी घरी येतात तेव्हा काहीजणांना साक्ष देणे शक्य होते. आयर्लंडमधील एका बहिणीला आयुर्विम्याच्या विक्रेत्याने भेट दिली. ती सार्वकालिक जीवनाचा आनंद लुटण्याची वाट पाहत आहे असे तिने समजावून सांगितले. लहानपणापासून रोमन कॅथलिक असलेल्या या मनुष्याकरता हा संपूर्णतः नवीन विचार होता. त्याने अनंतकाल जगू शकाल पुस्तक स्वीकारले, नंतरच्या आठवडी सभेला उपस्थित राहिला आणि बायबल अभ्यास करण्यास तयार झाला. हा विक्रेता आता बाप्तिस्मा घेतलेला एक बांधव आहे.

६ यहोवाची स्तुती दररोज करण्याच्या संधींसाठी आपण सर्वांनी दक्ष असले पाहिजे. काही नियतकालिके किंवा पत्रिका दिसतील अशा ठिकाणी ठेवणे आणि तत्परतेने त्या अभ्यागतांना सादर करणे मदतदायी आहे. काही भागांमध्ये, एखाद्या बागेतील बाकावर थोडा वेळ घालवल्याने, जे लोक विरंगुळ्यासाठी तेथे येतात त्यांना साक्ष देण्यास तुम्हाला अनेक संधी प्राप्त होतील. शाळेत जाणारे काही साक्षीदार युवक, त्यांच्या बाकांवर बायबल साहित्य ठेवतात जेणेकरून ते कोणी पाहिल्यास व त्याविषयी प्राश्‍न विचारल्यास ते संभाषण सुरू करू शकतात. तुम्ही उपयोगात आणू शकाल असे एक किंवा दोन शास्त्रवचनांचे संदर्भ लक्षात ठेवा. तुमची मदत करण्यास यहोवाला विनंती करा. असे केल्यामुळे तुम्हाला आशीर्वादित केले जाईल.—१ योहा. ५:१४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा