वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९५ पृ. ४
  • यहोवा आपला निर्माणकर्ता आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा आपला निर्माणकर्ता आहे
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • आमच्या घडवणाऱ्‍याला सन्मान देण्यासाठी इतरांना मदत करणे
    आमची राज्य सेवा—१९९४
  • क्षेत्र सेवेकरता सुचवलेल्या काही सादरता
    आमची राज्य सेवा—२००५
  • देवाकडील ज्ञान अनेक प्रश्‍नांची उत्तरे देते
    आमची राज्य सेवा—१९९७
  • सकारात्मक मनोवृत्ती राखून सुवार्ता प्रस्तुत करणे
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km ६/९५ पृ. ४

यहोवा आपला निर्माणकर्ता आहे

१ लाखो लोक, देवाने जीवनाची निर्मिती केली असा विश्‍वास करतात. इतर पुष्कळ उत्क्रांतीवर विश्‍वास ठेवतात. त्यानंतर असेही लोक आहेत जे काय विश्‍वास करावा याबद्दल निश्‍चित नाहीत. अशा सर्व लोकांकरता, लाईफ—हाऊ डीड इट गेट हियर? बाय एव्होल्यूशन ऑर बाय क्रिएशन? हे पुस्तक आहे. हे प्राकाशन, जीवन येथे कसे आले व त्याचा आपल्या भवितव्यासाठी काय अर्थ होतो याचे पूर्णपणे संशोधन केलेले स्पष्टीकरण सादर करते. जून दरम्यान, शक्य असेल त्या प्रात्येक वेळी आपण हे उत्तम पुस्तक सादर करणार आहोत. घरमालकाला इंग्रजी येत नसल्यास, १९२-पृष्ठांची कोणतीही नवीन पुस्तके तेथे सादर केली जावीत.

२ वैज्ञानिक समाजातील प्रासिद्ध जणांनी देखील, या पुस्तकातील युक्‍तिवाद कबूल केला आहे. नेदरलंडमधील एका वैज्ञानिक संशोधकाने लिहिले: “हे पुस्तक खरोखर सर्व अपेक्षांपेक्षा वरचढ आहे. त्यातील अध्यायांची व दाखल्यांची तर्कशुद्ध मांडणी वैज्ञानिक दृष्ट्या इतकी अद्ययावत आहे, की त्याविरुद्ध कोणतेही आक्षेप घेणे म्हणजे ती गोष्ट समजून घेण्याची इच्छा न दाखवण्याप्रामाणे आहे.” एका वकिलाने म्हटले: “मी ते चार वेळा वाचले आहे आणि ते तयार करण्यासाठी जो सखोल अभ्यास, माहिती आणि लेखी पुरावे त्यात गोवले होते त्यामुळे मी अजूनही प्राभावीत होतो.” यास्तव, आणखी इतरजण या पुस्तकाची प्राशंसा करतील याची आपण खात्री बाळगू शकतो.

३ तुम्ही अशी एखादी संक्षिप्त सादरता करण्याचे ठरवाल:

▪ पृष्ठ ६ काढा व म्हणा: “पुष्कळ लोकांचा, आपली सुंदर पृथ्वी व त्यावरील जीवन योगायोगाने घडले असा विचार आहे. हे सर्व कसे घडले याचे वाजवी स्पष्टीकरण काय असेल असे तुम्हाला वाटते? [प्रातिसादासाठी वाव द्या.] पुष्कळ पुरावा बायबलच्या या अहवालाची खात्री पटवतो, की केवळ सर्वशक्‍तिमानच नव्हे तर, आपल्यावर खूप प्रीती करणारा निर्माणकर्ता अस्तित्वात आहे. त्याचे नाव यहोवा असल्याचे बायबल सांगते.” स्तोत्र ८३:१८ वाचा आणि संपूर्ण पृथ्वीला परादीसमध्ये परावर्तित करण्याचा त्याचा उद्देश कसा आहे याचे संक्षिप्त रूपात स्पष्टीकरण द्या.

४ तुम्हाला लवकर मुद्यावर यावयाचे असल्यास, असे म्हणू शकता:

▪ “तुम्ही या प्राश्‍नाचा कधी विचार केला का?” पुस्तकाचे शीर्षक दाखवा, पृष्ठ ७ काढा, परिच्छेद २ मधील प्राश्‍ने वाचा आणि हे पुस्तक, बायबलमधून समाधानकारक उत्तरे पुरवते हे समजावून सांगा.

५ किंवा तुम्ही असे म्हणू शकता:

▪ “पृथ्वी अस्तित्वात कशी आली याचा तुम्ही कधी विचार केला का? विश्‍वामध्ये काही प्राचंड विस्फोट झाल्यामुळे तिची निर्मिती झाली असा आग्रह पुष्कळ जण धरतात. तुम्हाला काय वाटते? [प्रातिसादासाठी वाव द्या.] बायबल शिकवते की, देवाने या पृथ्वीला आपल्यासाठी सर्वकाळचे घर म्हणून निर्माण केले. आपल्या सूर्यमालेतील इतर ग्रहांपेक्षा ती वेगळी आहे. आपल्याला माहीत आहे त्यानुसार, जीवन टिकवून ठेवण्यास आवश्‍यक असणाऱ्‍या गुंतागुंतीच्या सर्व तरतूदी असणारा हा विश्‍वातील केवळ एकच ग्रह आहे.” पृष्ठ १३० वरील परिच्छेद ५ काढा आणि ही पृथ्वी एका कुशल कारागिराची कृती का असली पाहिजे हे स्पष्ट करा.

६ आणखी एक प्रास्तुती अशी असेल:

▪ “आपली उत्क्रांती माकडापासून झाली आहे असे काही लोकांना वाटते. आपले पूर्वज तसे दिसत होते असा त्यांचा दावा आहे. [पृष्ठ ८९ वरील चित्र दाखवा.] त्याविषयी तुम्हाला काय वाटते?” प्रातिसादासाठी वाव द्या. परिच्छेद २० मध्ये सांगितलेल्या गोष्टीकडे निर्देश करा आणि मग प्रोषितांची कृत्ये ४:२४ वाचा जे यहोवाची ओळख आपला निर्माणकर्ता व जीवनदाता म्हणून करून देते. “बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टीसंबंधाने हे पुस्तक उत्क्रांतीच्या संपूर्ण सिद्धांताचे परीक्षण करते.” पृष्ठ ५ वरील सूचीबद्दल सांगा आणि १, ७, १५ व १९ सारख्या काही अध्यायांच्या शीर्षकांकडे निर्देश करा.

७ यहोवा किंवा त्याच्या वचनावर विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांकडून भूलविल्या गेलेल्या प्रामाणिक लोकांकरता हे पुस्तक एक आशीर्वाद ठरू शकते. क्रिएशन पुस्तकात जी वास्तविक माहिती आहे ती, अशा लोकांना आपली प्रोमळपणे काळजी वाहणाऱ्‍या आपल्या निर्माणकर्त्याबद्दल अधिक गुणग्राहकता बाळगण्यास मदत करू शकते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा