विश्वास न बाळगणाऱ्यांची मदत करा
१ आजकाल, सुशिक्षित व प्रागतीशील विचारांचा असणारा असे मानले जाणे लोकप्रिय झाले आहे. मानवी तत्त्वज्ञान व काल्पनिक सिद्धांतांची प्राशंसा केली जाते, परंतु आध्यात्मिक मूल्यांकडे दुर्लक्ष केले जाते. साध्या वस्तुस्थिती व समजण्याजोग्या सत्यामध्ये आस्था राखणारे प्रामाणिक लोक, लाईफ हाऊ डीड ईट गेट हियर—बाय एव्होल्यूशन ऑर बाय क्रिएशन? या पुस्तकाचे परीक्षण करण्याच्या संधीचे स्वागत करतील. हे पुस्तक, विश्वासाचा अभाव असणाऱ्यांना मदत देऊ शकते. (रोम. १:१९, २०) आस्था व्यक्त करणाऱ्या सर्वांना पुनर्भेट देण्याची खात्री करा.
२ तुम्ही अशाप्राकारे आपली चर्चा सुरू करू शकता:
▪ “अनेक सुशिक्षित लोक, मानवी कुटुंब उत्क्रांतीने आले या विश्वासाला पाठिंबा देतात याची तुम्हाला जाणीव असेल अशी मला खात्री आहे. सर्वकाही योगायोगाने अस्तित्वात आले असे तो शिकवतो. याविषयी तुम्हाला काय वाटते? [प्रातिसादासाठी वाव द्या.] ही कल्पना अजूनही एक सिद्धांत असल्याचे म्हटले जाते. सिद्धांत म्हणजे, ‘कल्पना’ किंवा ‘गृहीत धरलेला असिद्ध मुद्दा.’ शतकांपासून मानव असा विश्वास बाळगत होते की, पृथ्वी सपाट आहे; हा मूर्खपणाचा ग्रह वस्तुस्थितीवर आधारित नव्हता हे आपल्याला आता ठाऊक आहे. उत्क्रांतीच्या सिद्धांताविषयी देखील हेच खरे असू शकते का?” पृष्ठ ४ वरील प्रास्ताविक विवेचने वाचा आणि मग यशया ४२:५ ची चर्चा करा.
३ किंवा परतल्यावर तुम्ही अशी प्रास्तावना करू शकता:
▪ “देवावर विश्वास न करणारे लोक भेटणे सामान्य गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी, ती असामान्य गोष्ट होती. इतक्या लोकांचा देवावरील विश्वास का उडाला आहे असे तुम्हाला वाटते? [प्रातिसादासाठी वाव द्या.] अनेक लोकांच्या विश्वासाच्या अभावासाठी आपल्या जगातील हिंसा व विपत्ती यांची भयानक वाढ कारणीभूत असल्याचा आरोप ते करतात. सर्वशक्तिमान देव आहे तर, तो या सर्व दुःखाचा अंत का करीत नाही, असा ते तर्क करतात. या प्राश्नाचे समाधानकारक उत्तर ज्यांना मिळत नाही ते बहुधा नास्तिक बनतात. परंतु, देव अस्तित्वात आहे आणि लवकरच तो या पृथ्वीला आनंदाचे व शांतीचे ठिकाण बनवील हे सिद्ध करण्यासाठी भरपूर पुरावा आहे.” पृष्ठ १९६ वर परिच्छेद १९ मधील शास्त्रवचनीय विचार उपयोगात आणून चर्चा चालू ठेवा.
४ उचित आहे तेथे, तुम्ही बायबल हातात ठेवून असे म्हणून संभाषण सुरू करू शकता:
▪ “बायबलचा अभ्यास आपल्या काळासाठी व्यावहारिक का आहे हे दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला पुन्हा भेट देत आहोत. पुष्कळांकडे बायबल आहे पण फार कमी लोक ते वाचण्यासाठी वेळ काढतात. काहीजण आम्हाला स्पष्टपणे सांगतात, की त्यांना आता धर्मामध्ये काहीएक आस्था राहिलेली नाही. तुम्हाला त्याविषयी कसे वाटते? [प्रातिसादासाठी वाव द्या.] बायबल देवाचे प्रोरित वचन आहे याची खात्री देणारी एक गोष्ट म्हणजे, त्यातील भविष्यवाण्यांची पूर्णता.” पृष्ठ २३४ वर परिच्छेद ६ मधील शास्त्रवचनांचा संदर्भ द्या.
५ हा विचार एखादा अनुकूल प्रातिसाद मिळवू शकतो:
▪ “या पृथ्वीवर आपल्या सभोवताली असणाऱ्या गोष्टींमध्ये आपण सौंदर्य व बुद्धीचा अद्भुत पुरावा पाहू शकतो. सूर्यास्ताचे हे मनोहर चित्र याचे योग्य उदाहरण आहे.” पृष्ठे १२ व १३ वरील चित्र दाखवा. “सम थिंग्स टू थिंक अबाऊट” यातील काही मुद्दे सांगा आणि आपल्या जगाबद्दलच्या महत्त्वपूर्ण प्राश्नांची समाधानकारक उत्तरे हे पुस्तक कसे पुरवते ते समजावून द्या.
६ या पुस्तकाचा उपयोग करून, इतरांना त्यांच्या निर्माणकर्त्यावर विश्वास ठेवण्यास भक्कम आधार मिळवून देण्यात मदत करण्यासाठी आपण एक आशीर्वाद ठरू शकतो.