नम्र लोकांसाठी सुवार्ता
१ सन्निध न्यायाच्या काळात आपण जगत आहोत. (यहे. ९:५, ६) सर्व नम्र लोकांना हे कळविणे तातडीचे आहे ज्यामुळे काय होणार आहे त्यासाठी ते तयार राहू शकतील. यहोवाची प्रोमळ कृपा म्हणून त्याने त्याच्या लोकांना “दीनास शुभवृत्त सांगण्यास” नेमले आहे. (यश. ६१:१, २) आपली नियतकालिके ही सुवार्ता सर्वत्र घोषित करण्यासाठी आपल्याला मदत करतात.
२ टेहळणी बुरूज आणि सावध राहा! दृढ राहण्यासाठी आणि प्रावृत्त करण्यासाठी आपल्याला जड अन्ना पुरवतात. देवाचे राज्य लवकरच या पृथ्वीचे रूपांतर परादीसमध्ये करील, या सुवार्तेद्वारे टेहळणी बुरूज नम्र लोकांचे सांत्वन करते. शांतीदायक आणि सुरक्षित नवे जग, ह्या देवाच्या अभिवचनावरील आत्मविश्वास सावध राहा! यातून उभारला जातो. या नियतकालिकांचे सार्वत्रिक वितरण हा नम्र लोकांपर्यंत सुवार्ता पोहंचविण्याचा एक वेगवान मार्ग आहे. अलीकडील अंकातील कोणत्या बोलण्याजोग्या मुद्यांना आपण निदर्शनास आणू शकतो?
३ उचित ठिकाणी मे १ “टेहळणी बुरूज” यामधील “दैनंदिन बायबल वाचनातून लाभ मिळवणे” या लेखाचा तुम्ही उल्लेख करून प्राश्न विचारू शकता:
▪ “बायबल वाचनाने कोणता लाभ आपल्याला मिळेल, असे तुम्हाला वाटते? [प्रातिसादासाठी वाव द्या.] रोमकर १५:४, मध्ये बायबल स्वतः या प्राश्नाचे उत्तर देते. [रोमकर १५:४, वाचा.] अनेक लोकांकडे विशेषतः चर्चची पार्श्वाभूमी असणाऱ्यांकडे बायबल आहे; परंतु त्याचे नियमितपणे वाचन करण्यासाठी काहीजणच वेळ काढतात. भवितव्याबद्दलची खात्रीदायक आशा केवळ बायबलमध्ये आढळते आणि आपण ते वाचल्यास आपल्याला आशीर्वाद मिळेल, असा आम्ही विश्वास बाळगतो.” याशिवाय उचित विवेचने मांडा आणि त्यानंतर नियतकालिकांची सादरता करा.
४ मे १५ “टेहळणी बुरूज” यामध्ये “आमच्या पूर्वजांसाठी नवे जीवन,” हा जिज्ञासा निर्माण करणारा लेख आहे. कदाचित तुम्हाला पुढील प्रास्तावनेच्या साहाय्याने आस्था निर्माण करण्यास शक्य होईल:
▪ “अनेकांना त्यांचे पूर्वज कसे होते याबद्दल बहुतेकवेळा कुतूहल वाटले आहे. त्यांचे पूर्वज मरून अस्तित्वविरहित झाल्याने ते कोण होते हे आपल्याला कधीही कळणार नाही, अशा समारोपास अनेकजन येतात. आपले पूर्वज कोण होते हे समजण्याची एखादी शक्यता असल्याचे तुम्हाला वाटते का?” प्रातिसादासाठी वाव द्या. योहान ५:२८, २९ वाचा आणि देवाने त्यांना परादीसमय पृथ्वीमध्ये नवीन जीवन देण्याचे कसे अभिवचन दिले आहे, याचे स्पष्टीकरण करा.
५ तुम्ही मे ८ “सावध राहा!” एक प्राश्न विचारून सादर करू शकता:
▪ “जगण्यास उचित असणाऱ्या जीवनासाठी काय केले पाहिजे, असे तुम्हाला वाटते?” प्रातिसादासाठी वाव द्या. “जीवनाचा काय अर्थ आहे?”, पृष्ठ २६ वरील लेखाचा उल्लेख करा आणि उपदेशक २:११ मध्ये शलमोन काय म्हणाला ते वाचा. त्यानंतर १२ अध्यातील वचन १३ मध्ये असणाऱ्या सल्ल्याकडे लक्ष पुरवा. नियतकालिक स्वीकारण्यासाठी घरमालकाला निमंत्रण द्या.
६ तुम्ही मे १४ तारखेच्या अगोदरच नियतकालिकांसह कार्य करत असल्यास क्र. ३४ राज्य वार्तेच्या प्राती नेण्यासाठी विसरू नका आणि अजूनही या प्राती प्राप्त न झालेल्यांना त्या सादर करा. नियतकालिके तुमच्या सोबत घेऊन जा आणि त्या प्रात्येक वेळी अनौपचारिक साक्षकार्यामध्ये देखील सादर करण्यासाठी तयार राहा. आपले साहित्य कुटुंबातील इतर त्याचप्रामाणे त्यांना भेटी देणाऱ्या मित्रांकडून वाचले जाईल, असा विचार करून आपल्या साहित्याची सहभागिता करण्यासाठी आपण नेहमी तयार असले पाहिजे. (१ तीम. ६:१८) आपण नम्र लोकांपर्यंत सुवार्ता पोहंचविल्याने कदाचित त्यांचे जीवन बचावले जाईल.—१ तीम. ४:१६.