प्रश्न पेटी
◼ आपण सभांसाठी कोणत्या गोष्टी नेल्या पाहिजेत?
प्रात्येक सप्ताहात मंडळीतील सभांद्वारे आपल्याला लाभदायक मार्गदर्शन आणि उत्तेजन मिळते. (यश. ४८:१७; इत्त्वी. १०:२४, २५) तथापि, या सभांपासून मिळणारा लाभ, आपण या सभांसाठी चांगली तयारी करून येतो अगर येत नाही या गोष्टीवर प्रामुख्याने अवलंबून आहे.
कुटुंबातील प्रात्येक सदस्याकडे त्याचे स्वतःचे अभ्यास साहित्य आणि सभांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी असणे उत्तम आहे. यामध्ये बायबल, गायन पुस्तक, अभ्यास घेण्यात येणारे प्राकाशन किंवा प्राकाशने, वही आणि पेन वा पेन्सिलचा समावेश होतो.
ईश्वारशासित सेवा प्राशालेसाठी, ईश्वारशासित सेवा प्राशाला आराखडा आणि ईश्वारशासित सेवा प्राशाला मार्गदर्शक पुस्तक आवश्यक आहे. या गोष्टींमुळे विद्यार्थ्याद्वारे देण्यात येणाऱ्या भाषणाचा विषय लक्षात ठेवण्यास आणि प्राशाला पर्यवेक्षक सल्ला देतो तेव्हा त्याकडे लक्ष देण्यास आपल्याला मदत मिळते. आपले भाषण आणि क्षेत्र सेवेतील सादरतांमध्ये सुधार घडवून आणण्यासाठी आपण सल्ले आणि सूचना स्वतःस लागू करू शकतो. जानेवारी पासून इंग्रजी भाषेच्या आराखड्यातील बहुतेक बोधप्राद भाषणे जेहोवाज विटनेसस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्स किंग्डम यावर आधारित आहेत. कुटुंबातील प्रात्येक सदस्याने या पुस्तकाची व्यक्तिगत प्रात घेऊन जाणे व्यवहार्य ठरणार नाही त्यामुळे एक प्रात आणली जाऊ शकते ज्याद्वारे त्यातील संदर्भ कुटुंबासाठी उपलब्ध होऊ शकेल. अर्थातच, प्रादेशिक भाषेच्या आराखड्याचे अनुसरण करणाऱ्या मंडळ्यांतील प्रात्येकाने, आराखड्यानुसार चर्चेसाठी पवित्रशास्त्र विषय आणि एकमेव खऱ्या देवाच्या उपासनेतील ऐक्य या पुस्तकांची व्यक्तिगत प्रात आणावी.
सेवा सभेसाठी आपल्याकडे अलीकडील आमची राज्य सेवा आणि रिझनींग पुस्तक असण्यास हवे. सभेच्या दरम्यान चर्चा करण्यात येणाऱ्या प्राकाशनांना तुमच्यासोबत घेऊन या जसे की, प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी उपयोगात येणारे साहित्य. वडिलांकडे ऑर्गनायझ्ड टू अकंप्लिश आवर मिनीस्ट्री पुस्तकाची प्रात असली पाहिजे.
मुलांनी शांत बसावे आणि मंडळीच्या सभांमध्ये लक्ष द्यावे यासाठी त्यांच्या पालकांनी प्रायत्न केला पाहिजे. त्यांना वाचता येत नसेल तरीदेखील त्यांच्याकडे टेहळणी बुरूज आणि इतर प्राकाशनांची व्यक्तिगत प्रात दिल्यामुळे त्यांना रस घेण्यास उत्तेजन मिळेल. युवकांना ईश्वारशासित प्राकाशनांचा आदर आणि वापर करण्यासाठी शिकवले जाते तेव्हा त्यांच्या जीवनभर लाभदायक आध्यात्मिक सवयी निर्माण होतात.
पूर्ण तयारी करून आल्यामुळे मंडळीच्या सभांद्वारे आपल्याला मिळणारा आनंद आणि समाधान मोठ्याप्रामाणात वृद्धिंगत होते. (२ तीम. ३:१७) “[देवाचे] आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्याद्वारे . . . त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले,” जाण्याचा हा सर्वात उत्तम मार्ग आहे.—कलस्सै. १:९.