राज्याचे वचन —त्याची समज प्राप्त करणे
१ येशू पेरणी करणाऱ्याच्या दाखल्यात म्हणाला की, “चांगल्या जमिनीत” पडणारे बी जो “वचन ऐकून ते समजतो” त्यास चित्रित करते. (मत्त. १३:२३) राज्याबद्दल ऐकल्यावर, आपल्याला ते ‘समजले आहे का’? त्याचा आपल्या जीवनावर केवढा प्रभाव पडतो? आपण राज्य आस्थांना प्रथम स्थानी ठेवून आपल्याला संदेश समजला आहे हे प्रकट करतो का?
२ राज्य संदेशाबद्दल अचूक समज प्राप्त करण्यासाठी व्यक्तिगत अभ्यासाची गरज आहे. पुरवलेल्या आध्यात्मिक अन्नावर मनन करण्यास आपल्याला वेळ काढण्याची गरज आहे. टेहळणी बुरुज नियतकालिकाचे घाईघाईने वाचन करणे म्हणजे, एखादे स्वादिष्ट आणि पोषक भोजन केवळ गिळण्यासारखे आहे. आध्यात्मिक अन्नाचा पूर्णपणे विचार करण्यासाठी तुम्ही वेळ काढता का? अधिकाधिक लाभ प्राप्त करण्यासाठी, एखादी प्रेरक गोष्ट तसेच आरोग्यपूर्ण आध्यात्मिक भूक असली पाहिजे. यांचा अभाव असल्यास, इतर कार्यहालचाली व्यक्तिगत अभ्यासाचे लाभ कमी करू शकतात किंवा त्यासाठी लागणारा वेळ घेऊ शकतात. अभ्यासाचा चांगला आराखडा टिकवून ठेवणे सोपे नाही. प्राधान्य असलेल्या गोष्टींमध्ये काळजीपूर्वक समतोल राखावा लागत असला, तरी प्राप्त होणारी आध्यात्मिक संपत्ती बहुमूल्य आहे.—नीती. ३:१३-१८; कलस्सै. १:२७.
३ शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे आपल्याला प्रत्येक दिवशी राज्याबद्दल सकारात्मक, उभारणीकारक विचार बाळगण्यास मदत करते. आपल्या ‘आध्यात्मिक गरजेची जाणीव’ राखणारे प्रत्येक दिवशी दैनिक वचन आणि त्यावरील विवेचने वाचण्यासाठी काही मिनिटे काढण्याचे ठरवतात. (मत्त. ५:३) पुष्कळ वचने राज्याच्या विविध पैलूंचे स्पष्टीकरण देतात. उदाहरणार्थ, नोव्हेंबर २२, १९९४ रोजी सादर केलेले वचन मत्तय १३:४ हे होते. विवेचनात राज्य आशेचा विचार करण्यात आला होता आणि त्यात आपल्याला नातेवाईकांसोबत आणि शेजाऱ्यांसोबत अहितावह सहवास ठेवण्याच्या धोक्यांबद्दल आठवण करून दिली होती. सबंध जगभरातील बेथेल गृहांमध्ये, कामाच्या प्रत्येक दिवशी सकाळी दैनिक वचनाची १५ मिनिटांसाठी चर्चा असते ही वस्तुस्थिती दैनंदिन वचनाचा एकत्र विचार करण्यामुळे मिळणारे लाभ व त्याचे गांभीर्य यावर जोर देते. तुमच्या कुटुंबाच्या नित्यक्रमातही असाच दैनिक वचनाचा विचार करण्याची पद्धत आहे का?
४ राज्याबद्दल तुमची गुणग्राहकता वाढेल तशी इतरांसोबत राज्य संदेशाची सहभागिता करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळेल. टेहळणी बुरुज आणि सावध राहा! नियतकालिके आपली मने ताज्या व अद्ययावत माहितीने भरवतात आणि त्यांची तुलना मानसिक इंधनाशी केली जाऊ शकते. जगाला देवाच्या राज्याची किती गरज आहे याची जाणीव राखण्यास ती आपली मदत करतात. ती आपल्याला “ख्रिस्ताचे मन” असणाऱ्या आध्यात्मिक व्यक्ती बनण्यास मदत करतात. (१ करिंथ. २:१५, १६) या सर्व गोष्टी आपली आशा बळकट करू शकतात आणि इतरांसोबत राज्य आशेची सहभागिता करण्यासाठी आपला आवेश वाढवू शकतात.—१ पेत्र ३:१५.
५ आपल्याला व्यक्तिगतपणे राज्य संदेशाची समज प्राप्त करून घेणे अत्यावश्यक आहे. हे राज्य असे माध्यम आहे ज्याद्वारे देव आपले सार्वभौमत्व उंचावेल, दुष्टाईचा अंत करील आणि एक नवीन जग—नंदनवन—उदयास आणील. येशूने त्यास आपल्या जीवनात प्रथम स्थानी ठेवण्यास आज्ञापिले. त्याच्या सत्तेखाली राहण्यासाठी आपल्याला मेंढरासमान प्रजा असले पाहिजे. (मत्त. ६:१०, ३३) त्याच्या आशीर्वादांचा उपभोग घेण्यासाठी त्याचा पूर्ण फायदा घ्या.