प्रचार करणे—एक सन्माननीय विशेषाधिकार
१ सुवार्तेची सेवा यहोवाने आपल्याला दिलेला एक सन्माननीय विशेषाधिकार आहे. (रोम. १५:१६; १ तीम. १:१२) तुम्ही त्याकडे याच दृष्टिकोनातून पाहता का? निघून गेलेला काळ किंवा इतरांचा उपहास अशा कोणत्याही गोष्टींना आपल्या नजरेत त्याचे महत्त्व कमी करण्यास वाव दिला जाऊ नये. देवाचे नाव धारण करण्याचा सन्मान केवळ अल्प जणांनाच दिला जातो. या सुहक्काबद्दल आपण आपली गुणग्राहकता कशी वाढवू शकतो?
२ राज्य संदेशाचा प्रचार केल्याने आपल्याला जगाची पसंती प्राप्त होत नाही. पुष्कळ जण आपल्या कार्याकडे औदासिन्य किंवा भावनाशून्यतेच्या दृष्टीने पाहतात. इतर त्याचा उपहास आणि विरोध करतात. असा विरोध सह-कामगार, शेजारी किंवा कौटुंबिक सदस्यांकडूनही येऊ शकतो. त्यांच्या नजरेत आपली दिशाभूल केलेली असेल किंवा आपण मूर्ख असू. (योहा. १५:१९; १ करिंथ. १:१८, २१; २ तीम. ३:१२) त्यांची निराशाजनक विवेचने आपला आवेश कमी करून आपल्याला मंद करण्यासाठी किंवा आपल्या सन्माननीय विशेषाधिकाराचा त्याग करण्यासाठी बनवली गेली आहेत. नकारात्मक दृष्टिकोनांना सैतानाने चेतवले आहे, त्याने ‘त्यांची मने आंधळी केली आहेत अशा हेतूने की, सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.’ (२ करिंथ. ४:४) त्याबद्दल तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवता?
३ राज्याबद्दलचा प्रचार आपण सर्वजण करत असलेले सर्वात महत्त्वपूर्ण कार्य आहे हे मनात बाळगणे महत्त्वाचे आहे. आपल्याजवळ जीवन बचावणारा संदेश आहे. तो इतर कोणत्याही माध्यमाद्वारे उपलब्ध नाही. (रोम. १०:१३-१५) मनुष्याची नव्हे तर देवाची स्वीकृती असणे महत्त्वपूर्ण आहे. आपल्या प्रचार कार्याबद्दलचा जगाचा नकारात्मक दृष्टिकोन आपल्याला सुवार्तेची धैर्याने घोषणा करण्यास प्रतिबंध घालू शकत नाही.—प्रे. कृत्ये ४:२९.
४ येशूने आपल्या पित्याची इच्छा करण्याच्या सुहक्काला बहुमानाचे समजले. (योहा. ४:३४) त्याने सेवेसाठी स्वतःला पूर्णपणे वाहिले आणि विचलित करणाऱ्या गोष्टींमुळे किंवा विरोधकांमुळे स्वतःला मंद होऊ दिले नाही. राज्य संदेशाचा प्रचार करणे ही गोष्ट त्याच्या जीवनात नेहमी प्रथम स्थानी होती. (लूक ४:४३) त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यासाठी आपल्याला आज्ञापिले आहे. (१ पेत्र २:२१) असे करताना आपण “देवाचे सहकारी” या नात्याने सेवा करतो. (१ करिंथ. ३:९) आपण या सुहक्काचा पूर्ण फायदा घेत आहोत का? इतरांसोबत औपचारिक किंवा अनौपचारिकरित्या सुवार्तेची सहभागिता करण्यासाठी आपण संधी साधतो का? यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण ‘त्याच्या नावाची जाहीर घोषणा’ करण्यासाठी नेहमी तयार असावे.—इब्री. १३:१५.
५ सेवेतील आपला सहभाग अधिककरून आपल्या दृष्टिकोनाने ठरवला जातो. यहोवाने आपल्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींबद्दल आपण खोल गुणग्राहकता बाळगतो का? यहोवाच्या सेवेत होईल तितके करण्यास प्रवृत्त व्हावे म्हणून आपण आपल्या अंतःकरणात त्याच्याविषयी प्रेम विकसित केले आहे का? आपण आता उपभोगत असलेले आशीर्वाद तसेच यहोवाने भवितव्यामध्ये जे काही करण्याचे अभिवचन दिले आहे त्यावर मनन केल्याने आपल्या निर्माणकर्त्याबद्दलचे प्रेम वाढवण्यास आपल्याला मदत मिळते. असे प्रेम आपल्याला कृती करण्यास—आपल्या परिस्थिती मुभा देतात तोपर्यंत राज्य प्रचाराच्या कार्यात चिकाटी आणि नियमितपणा टिकवून ठेवण्यास प्रवृत्त करतात. आपला आवेश यहोवाबद्दल आणि शेजाऱ्याबद्दलच्या आपल्या प्रेमाचा पुरावा देईल.—मार्क १२:३०, ३१.
६ एखाद्या गोष्टीविषयी आपण जे करतो आणि त्याविषयी जे म्हणतो त्यावरून आपण त्याला किती बहुमोलाचे मानतो हे दाखवून देतो. राज्याबद्दल प्रचार करण्याच्या आपल्या सुहक्काला आपण खरेच मोलाचे समजतो का? आपण आपल्या सेवेला मोठेपण देतो का? विरोध असतानाही या अत्यावश्यक कार्यात टिकून राहण्याबद्दल आपण दृढनिश्चयी आहोत का? आपण या सुंदर सुहक्काला बहुमोलाचे समजले तर आपण नक्कीच आवेशी आणि संपूर्ण अंतःकरणाने कार्य करू.—२ करिंथ. ४:१, ७.