फेब्रुवारीसाठी सेवा सभा
फेब्रुवारी ६ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ७३ (७१)
१० मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य वा यातील निवडक घोषणा. अलीकडील नियतकालिकांमधील लेख दारोदारच्या कार्यात कसे सादर केले जाऊ शकतात त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.
१७ मि:“प्रचार करणे—एक सन्माननीय विशेषाधिकार.” प्रश्नोत्तरे. जुलै १५, १९९०, टेहळणी रुज नियतकालिकातील पृष्ठ १९ परिच्छेद १३-१६ वर आधारित अधिक विवेचने द्या.
१८ मि:“अनंतकाल जगू शकाल पुस्तक परिणामकारकपणे प्रस्तुत करणे.” प्रशाला मार्गदर्शक पुस्तक (इंग्रजी) पृष्ठे ४६-७, परिच्छेद ९-१२ वरील विवेचनांचा समावेश करून श्रोत्यांशी मुख्य मुद्यांची उजळणी करा. तुमच्या क्षेत्रात कोणत्या प्रकारची प्रस्तावना परिणामकारक ठरेल याची चर्चा करा. एक अथवा दोन सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ८२ (२६) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी १३ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १०३ (८७)
५ मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. संस्थेला मिळालेल्या देणगीच्या पोचपावत्यांचा उल्लेख करा.
१० मि:स्थानिक गरजा. किंवा सप्टेंबर २२, १९९४, सावध राहा! नियतकालिकाच्या पृष्ठे १३-१५ वरील “देवाबद्दल का बोलावे?” या लेखावर आधारित भाषण द्या.
१५ मि:“राज्याचे वचन—त्याची समज प्राप्त करणे.” प्रश्नोत्तरे. दोन किंवा तीन व्यक्तींना ते आपला व्यक्तिगत अभ्यास करण्यासाठी किंवा दैनिक वचनाची उजळणी करण्यासाठी कशी व केव्हा योजना करतात हे कथित करण्यास सांगा.
१५ मि:“इतरांचा विचार करा—भाग २.” भाषण आणि चर्चा वडिलांनी हाताळावी. स्थानिकरित्या पाहण्यात आलेल्या कोणत्याही समस्या सांगा आणि उचित सूचना द्या.
गीत १०९ (११९) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी २० ने सुरु होणारा सप्ताह
गीत १३४ (३३)
१२ मि:स्थानिक घोषणा. ईश्वरशासित वृत्त. स्थानिक क्षेत्रासाठी उचित असतील असे चालू नियतकालिकांतील लेख दाखवा. सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि:“तुम्ही तुमच्या मुलाला यहोवाची निवड करण्यास मदत करीत आहात का?” टेहळणी बुरुज नियतकालिकाच्या ऑक्टोबर १, १९९४ (पाक्षिक आवृत्तींमधील) २६-३० पृष्ठांवरील लेखावर आधारित वडिलांचे भाषण. संभवतः, उदाहरणीय मुले असणाऱ्या वडिलांनी हे भाषण द्यावे.
१८ मि:“तुम्हाला आढळलेल्या आस्थेचा मागोवा घ्या.” श्रोत्यांशी चर्चा करा. अनंतकाल जगू शकाल पुस्तक मिळाल्याबद्दल गुणग्राहकता व्यक्त करणाऱ्या विवेचनांचे कथन करा. (इंग्रजीतील जुलै १५, १९९१ आणि डिसेंबर १, १९९१ च्या टेहळणी रुज नियतकालिकांचे पृष्ठ ३२ पाहा.) सुचवलेल्या प्रस्तावना कशा वापरल्या जाऊ शकतात हे दाखवण्यासाठी एक किंवा दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके ठेवा. सर्वांना आस्थेवाईकांसोबत अभ्यास सुरु करण्याचा प्रयत्न करण्यासाठी उत्तेजन द्या.
गीत १४७ (८२) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी २७ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १८४ (३६)
१५ मि:स्थानिक घोषणा. “सुधारित जाहीर भाषणांपासून लाभ मिळवणे” याची चर्चा करा.
१५ मि:“तो कोणाचा दोष आहे?” फेब्रुवारी १, १९९५ च्या टेहळणी बुरुज नियतकालिकातील २६-२९ पृष्ठांवर आढळणाऱ्या लेखावर आधारित वडिलांचे भाषण. व्यावहारिक अवलंब करा.
१५ मि:मार्च दरम्यान यंग पीपल आस्क पुस्तक सादर करणे. सर्वांना त्याची सादरता करण्यासाठी उत्साहपूर्ण असण्यास उत्तेजन द्या. प्रस्तावनेमध्ये पृष्ठे ५-७ वर स्पष्ट केल्याप्रमाणे त्याच्या प्रकाशनाच्या कारणांची उजळणी करा. पुस्तकाबद्दल गुणग्राहकतेच्या अभिव्यक्तींबद्दल सांगा. (इंग्रजीतील फेब्रुवारी १, १९९१, मार्च १, १९९१ आणि नोव्हेंबर १५, १९९१ टेहळणी रुज नियतकालिकांचे पृष्ठ ३२ पाहा.) “आजच्या समस्यांना यशस्वीपणे तोंड देण्यास तरुण लोकांसाठी काही केले जाऊ शकते असे तुम्हाला वाटते का?” या प्रश्नाने सुरु होणाऱ्या प्रस्तुतीची उजळणी करा आणि संक्षिप्तपणे तिचे प्रात्यक्षिक दाखवा. (त्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे व ते पुस्तक कसे सादर करावे याच्या सुचनांसाठी मार्च १९९४ आमची राज्य वा पृष्ठ ४ पाहा.) या सप्ताहांती सेवेत उपयोग करावा म्हणून सर्वांना प्रती घेऊन जाण्यास आठवण करून द्या.
गीत २०७ (११२) व समाप्तीची प्रार्थना.