त्यांनी साक्ष देण्यात कसूर केली नाही
१ यहोवाचे साक्षीदार, हे आमचे नाव आमची ओळख देते व आम्ही काय करतो त्याचे वर्णन करते. आम्ही आमचा देव यहोवा याच्या श्रेष्ठ गुणांची साक्ष देतो. (यश. ४३:१०, १२) प्रत्येकाने मंडळीचा सदस्य होण्यासाठी ही साक्ष देण्यात सहभाग घेतला पाहिजे. साक्ष देणे हे मुख्यत्वेकरून आपल्या जाहीर सेवाकार्याद्वारे केले जाते. त्यामध्ये घरोघरी जाणे, मार्ग साक्षकार्य करणे, पुनर्भेटी घेणे व पवित्र शास्त्राभ्यास चालवणे हे समाविष्ट आहे. उचितपणे, आम्हा सर्वांना पूर्ण सहभाग घेण्यासाठी आर्जवले जाते.—१ करिंथ. १५:५८.
२ तथापि, मंडळीतील काही सदस्यांना जे काही करणे शक्य आहे त्यावर मर्यादा आहेत. गंभीर आजार किंवा दुर्बलता त्यांना जखडून ठेवू शकेल. विरोध करणारे नातेवाईक अधिक कठीण अडथळे आणू शकतील. एखाद्या तरुण व्यक्तीवर त्याच्या ख्रिस्ती विश्वासात नसणाऱ्या पालकाकडून निर्बंध घालण्यात येतील. एकाकी भागांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना वाहतूकीविना साक्षकार्य करणे अगदीच अशक्य वाटेल. स्वाभाविक लाजाळुपणामुळे बुजरे लोक मागेपुढे करतील. या किंवा अशाच परिस्थितींचा अनुभव घेणाऱ्या ख्रिश्चनांना असे वाटू शकते की, इतरांच्या मानाने व त्यांना जे खरेच करावेसे वाटते त्यापेक्षाही ते फारच कमी करीत असल्यामुळे ते ख्रिस्ती या नात्याने आवश्यक त्या गरजा पूर्ण करीत नाहीत. परंतु त्यांना स्वतःच्या परिश्रमांना कमी लेखण्याची गरज नाही. (गलती. ६:४) कोणत्याही परिस्थितीत असताना, त्यांना जमेल तितके सर्व केल्यामुळे यहोवा संतुष्ट होतो हे जाणून ते सांत्वन प्राप्त करू शकतात.—लूक २१:१-४.
३ सहभाग घेण्यासाठी मार्ग शोधणे: कठीण परिस्थितींमधील व्यक्तींनी, साक्षकार्याला प्रतिबंध घालण्यासाठी अडथळ्यांना कसा वाव दिला नाही, हे दाखवणारे हजारो अनुभव कथित केले गेले आहेत. त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांनी अनौपचारिक साक्षकार्य करण्याचे विविध मार्ग शोधून काढले आहेत. घरी राहण्यास भाग पडलेल्या लोकांनी साक्षकार्यासाठी मोठे द्वार उघडण्याकरता दूरध्वनीचा उपयोग केला. प्रत्येक अभ्यागताकडे, तो भावी ऐकणारा आहे या दृष्टिकोनातून पाहिले जाते. विरोध करणाऱ्या कुटुंबातील पत्नीला घरात साक्ष देण्यास शक्य नसले तरी, शेजाऱ्यांना किंवा तिच्या दैनिक नित्यक्रमात भेटणाऱ्या इतरांना साक्ष देण्यासाठी ती संधींचा फायदा घेते.
४ आपल्या जाहीर साक्षकार्यात सहभाग घेण्यासाठी एका तरुण व्यक्तीला ख्रिस्ती विश्वासात नसणाऱ्या त्याच्या पालकाने बंदी घातली असेल. तेव्हा त्या परिस्थितीला दुर्निवार्य अडथळा असे समजण्याऐवजी, तो त्याच्या वर्गसोबत्यांना व शिक्षकांना त्याचे व्यक्तिगत “क्षेत्र” असे मानू शकतो व एक उत्तम साक्ष देऊ शकतो तसेच तो कदाचित पवित्र शास्त्राभ्यासही चालवू शकतो. एकाकी भागांमध्ये राहणारे पुष्कळ जण पत्रव्यवहाराद्वारे सहभाग घेऊ शकले आहेत. ख्रिस्ती आवेशाने प्रवृत्त झालेले नेहमीच, ‘आपला येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी [अचूक ज्ञान, NW] निष्क्रिय व निष्फळ न ठरण्यासाठी’ कोणता ना कोणता मार्ग शोधून काढतील.—२ पेत्र १:८.
५ साक्षकार्यात सहभाग घेण्याची बाब येते तेव्हा, यहोवाने सर्वांसाठी एकसारखा दर्जा राखला आहे व तो म्हणजे आम्ही “जिवेभावे” असावे. (कलस्सै. ३:२३) आमच्या समयाचा विनियोग आणि आमची साध्यता यांचे प्रमाण भिन्न असले, तरी त्यामागील प्रवृत्त करणारी गोष्ट ही एकच आहे—“संपूर्ण हृदयातून” येणारे खरे प्रेम. (१ इति. २८:९, NW; १ करिंथ. १६:१४) आम्ही आमचे उत्तम ते देत असलो तर, आम्ही करत असलेल्या कार्याचे प्रमाण कमी असल्यामुळे, आम्हाला विश्वास नाही किंवा मंडळीचे निरुपयोगी सदस्य आहोत असे वाटणार नाही. पौलाप्रमाणे, आम्ही खरेपणाने असे म्हणू शकतो की, ‘जे हितकारक ते सांगण्यात व घरोघरी शिकविण्यात आम्ही कसूर केली नाही.’—प्रे. कृत्ये २०:२०.