ईश्वरशासित वृत्त
भारत: एप्रिल आमच्या कार्याचा उत्तम महिना होता व प्रत्येक क्षेत्रात उच्चांक होते. त्यामध्ये गेल्या दोन वर्षांतील पुस्तके व नियतकालिकांच्या वाटपाचे पहिले उच्चांक तसेच गेल्या तीन वर्षांतील वर्गण्यांमधील पहिला उच्चांक यांचा समावेश होता. पंधरा महिन्यातील एकूण प्रचारकांच्या बाराव्या उच्चांकाशिवाय (१४,१९४), नियमित पायनियर (८१८), केलेल्या पुनर्भेटी (७९,८७१), व चालवलेले पवित्र शास्त्राभ्यास (१२,९६३) यांचे देखील सर्व-वेळेचे नवे उच्चांक होते.
नेहमीप्रमाणे, साहाय्यक पायनियरांचा आमचा वार्षिक उच्चांक एप्रिलमध्ये होता (१,८०१)—मागील वर्षापेक्षा ४१ टक्के अधिक! सेवेत घालवलेला वेळ ३,३३,४८९ तासांपर्यंत गेला. ही मागील उच्चांकापेक्षा १८ टक्क्यांनी वाढ होती. नियतकालिक व पुस्तकांचे वाटप १२ ते १० टक्क्यांनी अनुक्रमे १,३३,२९२ व ७,८३८ एवढे वाढले; ३,२३५ वर्गण्या प्राप्त झाल्या. ही, मागील उच्चांकापेक्षा २६ टक्क्यांनी वाढ होती. त्या महिन्यादरम्यान ७१,९९८ पुस्तिकांचे वाटप केले गेले. फेब्रुवारीमध्येच गाठलेल्या मागील उच्चांकापेक्षा ही आश्चर्यकारक ९७ टक्क्यांची वाढ होती!
आमच्या १९९४ च्या स्मारक विधीची उपस्थिती ३८,१९२ होती व चार जणांनी बोधचिन्हांचा सहभाग घेतला. याद्वारे, मागील वर्षाच्या उपस्थितीवर ९.२ टक्क्यांची वाढ व प्रत्येक मंडळीतील ७९ ची सरासरी उपस्थिती सूचित झाली.